एक पाऊल यशाकडे! एक प्रेरणादायी कथा

Inspiring Story in Marathi

आयुष्यात पाहिजे ते मिळविण्यासाठी आवश्यक आहेत ते म्हणजे आपली मेहनत, कारण जगात अशक्य काहीही नाही आहे. आपण फक्त एखादी गोष्ट ठरवावी लागते आणि त्यानंतर त्या गोष्टीचा पाठलाग करावा लागतो, आणि एक दिवस ती गोष्ट आपल्याजवळ आलेली असते. म्हणतात ना “प्रयत्नांती परमेश्वर” तसेच काहीतरी.

आजच्या लेखात सुध्दा एक अशीच छोटीशी स्टोरी आहे जी आयुष्याच्या वाईट दिवसात जगण्याची एक नवी प्रेरणा देईल. आणि आपण आपल्या लक्षाला आठवून नेहमी मेहनत करत राहणार. तर आशा करतो लिहिलेली ही छोटीशी प्रेरणा देणारी कथा आपल्याला आवडणार. तर चला पाहूया एक छोटीशी स्टोरी.

प्रयत्नांती परमेश्वर, एक प्रेरणादायी कथा – Prayatnanti Parmeshwar Inspirational Story in Marathi

Inspirational Story in Marathi
Inspirational Story in Marathi

एका गावात एक गरीब कुटुंब राहत होते, त्या परिवारामध्ये आई, वडील आणि त्यांची एक मुलगी होती, जीचे नाव संध्या होते, संध्या हुशार, प्रामाणिक, आणि एक गुणी मुलगी होती. अभ्यासात एवढी हुशार होती की कोणतीही गोष्ट तिच्या डोक्यात खूप लवकर जायची. म्हणजेच तिचा मेंदू खूप तेज होता. शाळेतून सर्वात हुशार, प्रश्न विचारल्या बरोबर उत्तर देणारी. अशी संध्या होती. पण तिचे आई वडील गरीब होते, आणि ते शेतात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते.

एकट्या मुलीवर आई वडील खूप प्रेम करत होते. आणि संध्या सुध्दा आपल्या आई वडिलांच्या मेहनतीला जाणून होती. तिला माहिती होते तिचे आई वडील तिच्या साठी किती मेहनत करतात म्हणून. या गोष्टीची जाणीव असल्याने तिचे बरेचशे स्वप्न होते, आणि तिला भविष्यात जिल्हाधिकारी बनायचे होते. आणि आपल्या आई वडील आणि गावचे नाव मोठे करायचे होतं.

तिच्या गावात फक्त १० वी पर्यंतच शाळा होती आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या गावापासून ७-८ किलोमीटर अंतरावर एक गाव होते, जेथे १२ वी पर्यंत शिकण्याची व्यवस्था होती. पण संध्या च्या मनात भीती होती की तिला शिकण्यासाठी घरचे बाहेर पाठवतील का? कारण गावातील बरेच पालक आपल्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर पाठवत नसत आणि त्या वयात त्यांचे लग्न लावून देत असत. म्हणून संध्या या गोष्टीची भीती वाटत असे, पण ती कोणाला सांगत नसे.

दिवसेंदिवस संध्या च्या मनातील भीती वाढत होती. पण म्हणतात ना संकटात आपल्याला मार्ग दाखविण्यासाठी देव आपली मदत करतेच. त्याचप्रमाणे संध्या चे एक शिक्षक होते ज्यांचे नाव रमेश होते. ते विध्यार्थ्यांना नेहमी चांगली शिक्षा देत असतं आणि आयुष्यातील संकटांना तोंड कसे द्यायचे ते शिकवत असत. आणि त्यांना गरिबी विषयी खूप चांगल्या प्रकारे माहिती होती. कारण त्यांनी सुध्दा गरिबी पहिली होती. ते अश्या शिक्षकांपैकी होते ज्यांची गोष्ट सर्व ऐकत असतं.

संध्या दहावीची परीक्षा उतीर्ण झाली होती, तेही चांगल्या मार्कांनी. संध्या शाळेतूनच नाही तर जिल्ह्यातून प्रथम आलेली होती. आणि सगळीकडे तिचे कौतुक होत होत. पण तिच्या मनात तिच्या पुढील शिक्षणाविषयी भीती होती. आणि जेव्हा ती घरी आपल्या आई वडिलांना पुढील शिक्षणा विषयी विचारते तेव्हा तिचे वडील तिला म्हणतात की “हे बघ पोरी आतापर्यंत गावात शाळा होती तर तुला शिकविली आता शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागणार, आणि तिथे जर तुझ्या सोबत काही झाले तर समाजाला तोंड कस दाखवणार”.

तिचे वडील ह्या गोष्टी बोलत असतात तेवढ्यात संध्या च्या शाळेतील शिक्षक संध्या चे अभिनंदन करायला तिच्या घरी येतात, तेव्हा गुरुजींना पाहून संध्या आई वडिलांना गुरुजींविषयी सांगते. तेव्हा गुरुजी तिच्या आई वडिलांना सांगतात, तुमची मुलगी खूप हुशार आहे, ती जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे आणि तुम्ही आता तिला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करायला हवे. आणि बारावी मध्ये ती आपल्या राज्यातून प्रथम आली पाहिजे. असे विचार रमेश गुरुजी मांडतात.

तेच गुरुजींना उत्तर देत संध्या चे वडील म्हणतात, आमची परिस्थिती गरीब आहे गुरुजी, आम्ही संध्या चा पुढील शिक्षणाचा खर्च सोसू शकणार नाही. त्यावर गुरुजी म्हणतात त्याची चिंता तुम्ही करू नका, संध्या च्या शिक्षणाचा खर्च मी घेतो, कारण माझे या जगात कोणीही नाही आहे, आणि मी गरिबीला खूप जवळून पाहिले आहे. आणि जीवनात या सर्व गोष्टींना मी जास्त महत्व देत नाही कारण या गोष्टींविषयी जो व्यक्ती विचार करत राहतो तो नेहमी गरीबच राहतो. मला फक्त एवढंच समजते की आपण कर्म करत रहा देव आपल्याला अवश्य फळ देतो.

गुरुजींच्या या गोष्टींना ऐकून संध्या च्या वडिलांना एक नवीन प्रेरणा मिळते आणि ते संध्याला पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी शिकण्यासाठी परवानगी देतात सोबतच गुरुजींना सांगतात की आम्ही आतापेक्षा अधिक मेहनत करू आणि पोरीला शिकवू आणि आपली मदत लागली तर आपल्याला अवश्य कळवू, संध्या पुढील शिक्षण सुरू करते, आणि बारावी मध्ये संध्या संपूर्ण राज्यातून प्रथम येते त्यांनंतर राज्याची सरकार संध्याचा पुढील शिक्षणाचा सर्व खर्च उचलते. यानंतर संध्या मागे न पाहता खूप मेहनत करते आणि काही वर्षांच्या कालावधी नंतर एक दिवस संध्या जिल्हाधिकारी बनते.

पण जेव्हा ती तिच्या गावाला जाते तेव्हा तिच्या शिक्षकांची बदली झालेली असते. आणि ते आता त्या गावात शिकवायला नसतात. पण गुरुजींनी दिलेली शिकवण संध्या ला नेहमी आठवण राहते आणि ती तिच्या गुरुजींना आपल्या यशाचे श्रेय देते. कारण त्या दिवशी जर संध्या च्या आई वडिलांना गुरुजींनी समजावले नसते तर आज संध्या या ठिकाणी पोहचली नसती. असे संध्याचे म्हणणे असते. आणि ती तिचे शिक्षक तिला एक दिवस भेटावे अशी इच्छा ठेवते.

एक दिवस शाळांचा दौरा करत असताना संध्या ला एक आवाज कानावर येतो, तो असतो एका शिक्षकचा जो मुलांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी शिकवत असतो, जेव्हा संध्या त्या वर्गात जाऊन पाहते तर तिथे तिचे तेच रमेश गुरुजी शिकवत असतात, वयाने वृद्ध झालेले, डोळ्यांवर चष्मा घातलेले, संध्या त्यांना पाहून त्यांच्या जवळ जाते आणि त्यांचे पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते.

तेव्हा ते म्हणतात आपण कोण मी आपल्याला ओळखले नाही, कारण शिक्षकांना ती व्यक्ती अनोळखी वाटली, एवढ्या दिवसानंतर संध्या त्यांना भेटली होती, आता संध्या मोठी झाली होती म्हणून ते संध्याला ओळखू शकले नाही, पण संध्या ने त्यांना ओळखले होते, तेव्हा संध्या ने स्वतःविषयी बोलताना सांगितले की सर मी आपली विद्यार्थिनी, आपण माझ्या आई वडिलांना मला शिकविण्यासाठी प्रेरित केले होते, सर आज मी शिकून एक जिल्हाधिकारी बनली आहे, आणि हे सर्व तुमच्यामुळे होऊ शकले सर.

तेव्हा गुरुजींनी तिला ओळखून तिची पाठ थोपटली, आणि आनंदी होऊन म्हणाले की तुझ्या सारखी विधार्थ्यांला मला शिकविण्याचे भाग्य मिळाले आणि संध्या ची पाठ थोपटत तिला भरपूर आशीर्वाद दिले.

या गोष्टीला वाचून आपल्याला कळतं की जर आपण एखाद्या गोष्टीला करण्याचे ठरवले तर आपण त्या गोष्टीला काहीही करून मिळवू शकतो, कारण आपले प्रयत्न प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनात अशक्य काहीही नाही फक्त अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला योग्य रित्या पूर्ण करण्याचा मार्ग शोधणे आवश्यक आहे मग अशक्य सुध्दा शक्य होतं.

आशा करतो आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आपल्याला आवडली असेल आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top