जीवन जगतांना येणाऱ्या अडथळ्याचे निवारण “कालभैरवाष्टक”

Kaal Bhairav Ashtakam

मित्रांनो, आदि शंकराचार्य द्वारा संपादित कालभैरवाष्ट्क हे संस्कृत भाषेत संपादित केल्या  गेलेले अष्टक असून, या अष्टकात कालभैरव यांच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन तसचं, त्यांची स्तुती करण्यात आली आहे.

या कालभैरव अष्टकाबाबत अशी मान्यता आहे की, कलयुगात जीवन जगतांना येणाऱ्या अडथळ्याचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजे साक्षात भगवान महादेव रुपी कालभैरव होत.   

मित्रांनो, आज आपण देखील या लेखाच्या माध्यमातून भगवान कालभैरव यांची पूजा करण्यासाठी, तसचं त्यांना प्रसन्न करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या कालभैरव अष्टकाचे लिखाण करणार आहोत. तसचं, त्यासंबंधी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कालभैरवाष्टक – Kalabhairava Ashtakam in Marathi

Kalabhairava Ashtakam
Kalabhairava Ashtakam

देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्। 

नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥1॥

भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम्।

कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥2॥

शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम्।

भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥3॥

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम्।

विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥4॥

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम्।

स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥5॥

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम्।

मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥6॥

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम्।

अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥7॥

भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम्।

नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥8॥

भैरवअष्टकाचे नियमित पठन केल्याने होणारे फ़ायदे – Kalabhairava Ashtakam Benefits

भगवान कालभैरव यांची आराधना केल्याने भूतबाधा, तांत्रिकबाधा या सारख्या समस्या नष्ट होतात. भगवान कालभैरव हे वैरागी असल्याने ते आपल्या भक्तांपासून दूर स्मशानांत निरंतर ध्यानिस्त बसलेले असतात, म्हणून त्यांना कालवैरागी देखील म्हटल जाते. भगवान कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आपण नियमित भैरवअष्टकाचे नियमित पठन केले पाहिजे. या भैरव अष्टकाचे नियमित पठन केल्याने आपणास त्वरित लाभ होतो.

शिवाय, आपल्यावर असलेल्या कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तींपासून, तसचं, भूत बाधा यासारख्या वाईट शक्तींपासून आपली सुटका होते.

भगवान कालभैरव यांचे पूजन केल्याने आणि त्यांच्या अष्टकाचे पठन केल्याने आपल्या कुंडलीत असलेले राहू केतू यासरखे ग्रह देखील शांत होवून जातात. यासारख्या अनेक प्रकारच्या भावना लोकांच्या या कालभैरव अष्टकाबाबत आहेत.

भगवान कालभैरव बद्दल दंतकथा – Kaal Bhairav Story

नारद पुराणामध्ये भगवान कालभैरव यांची पूजा केल्याने मिळणाऱ्या लाभाचे वर्णन केले असून भगवान कालभैरव यांच्या उत्पत्ती संबंधित एक कथा देखील सांगण्यात आली आहे. त्यानुसार, एके दिवशी भगवान ब्रह्म, विष्णू, आणि महेश यांच्यात आपल्या तिघांपैकी सर्वशक्तिमान कोण याबाबत चर्चा सुरु होती.

त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी सर्व देवांची एक सभा बोलवण्यात आली. या सभेत त्रिदेवांपैकी सर्वश्रेष्ठ कोण विषयावर खूप चर्चा झाल्यानंतर देवतांनी दिलेल्या निष्कर्षाबाबत भगवान शिव आणि विष्णू सहमत होते. परंतु, भगवान ब्रह्म देव यांना हा निष्कर्ष अमान्य होता तसचं, त्यांनी भगवान महादेव यांना अपमानित सुद्धा केल होत.

तेंव्हा भगवान महादेव यांनी भगवान ब्रह्म देव यांनी केलेल्या अपमानाच्या रागाच्या भारत विशाल महाकाय रूप धारण केले. त्यांचे वर्णन करावे तितके कमीच, शरीर पूर्णतः काळ्या कोळश्यासमान काळे भोर होते, तर डोळे जणू आग ओकल्या सारखे लाल भडक दिसत होते.

हातात धातूचा दंड घेऊन ते काळ्याभोर रंगाच्या कुत्र्यावर स्वार होत त्या ठिकाणी प्रकट झाले होते. त्यांचे ते रूप पाहून सर्व देवगण धरधर कापू लागले. भीती पायी ते भगवान महेद्व यांची आराधना करू लागले.

ब्रह्म देवांनी केलेल्या अपमानाच्या रागात त्यांनी ब्रह्म देवाचे एक शीर कापून टाकले. तेंव्हा ब्रह्म देव भगवान महादेव यांना माफी याचना करू लागले.

भगवान शंकर यांनी ब्रह्म देव  यांना माफ करीत आपण धारण केलेल्या कालभैरव रुपा सह या भूलोकात वावरू लागले. कारण ब्रह्म देवाचे एक शीर कापल्याचे पाप त्यांना लागले होते. या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी ते भटकत भटकत वाराणशी येथे आले त्याठिकाणी त्यांना आपण केलेल्या पापापासून मुक्ती मिळाली. अश्या प्रकारे भगवान शंकर यांच्या कालभैरव या अवताराबाबत पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. 

भगवान कालभैरव यांना महाकालेश्वर या नावासोबत दंडाधिपती देखील म्हटल जाते. वाराणशी या ठिकाणी भगवान कालभैरव यांना आपल्या पापा पासून दंडामुळे मुक्ती मिळाल्याने त्यांना दंडपाणी सुद्धा म्हटल जाते. मित्रांनो, नारद पुराणामध्ये सांगितल्यानुसार, कलाष्ट्मीच्या दिवशी भगवान शंकर यांच्या कालभैरव या रूपाचा जन्म झाला होता.

भगवान कालभैरव या नावाचा अर्थ होतो, भीती ला दूर पळविणारी देवता. यामुळे कलाष्ट्मीच्या दिवशी जे भाविक मनोभावे कालभैरव यांची आराधना करतात तसचं, कालभैरव अष्टकाचे पठन करतात त्यांची सर्व दुखे, पापे नष्ट होतात.

तसचं, भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे कि जर एखादा भाविक खूप काळापासून एकाद्या आजाराने त्रस्त असेल, तर त्याने या कालभैरव अष्टकाचे पठन केल्यास त्यांची सर्व पिडा नष्ट होवून तो पूर्ववत चांगला होतो.

मित्रांनो, आपण सुद्धा या लेखात सांगितल्या प्रमाणे कालभैरव अष्टकाचे पठन केल्यास आपणास देखील त्याचा लाभ मिळू शकतो. वरील लेखात नमूद केलेली संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून, खास आपल्या करिता या लेखाचे लिखाण केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here