“कोजागरी पौर्णिमा” जाणुया काय आहे या सणाच महत्व?

Kojagiri Purnima in Marathi

अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला आयुर्वेदात अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे. या रात्री 12 वाजेनंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले गेले आहे.

Kojagiri Purnima

“कोजागरी पौर्णिमा” जाणुया काय आहे या सणाच महत्व? – Kojagiri Purnima Information in Marathi

पुर्ण वर्षभरात फक्त याच दिवशी चंन्द्र सोळा कलांनी परिपुर्ण असल्याने या रात्रीचे हिंदु धर्मात खुप महत्व आहे. या रात्री कोजागरी व्रत आणि कौमुदी व्रत करण्यात येते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने महारास आयोजित केला होता.

कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याने कितीतरी औषधींचे सेवन या रात्री केल्यास त्याचा फार उपयोग होत असल्याचे सांगीतले आहे.

लंकाधीपती रावण या अश्वीन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणं आरश्याच्या सहाय्याने आपल्या नाभिव्दारे ग्रहण करीत असे. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तारूण्य प्राप्त  होत असल्याची आख्यायिका पुराणात सांगीतली आहे.

लक्ष्मीदेवी या रात्री आकाशातुन भ्रमण करते आणि ’’कोजागरती’’ अर्थात कोण कोण जागरण करतय हे पाहाते. आणि जागरण करणाऱ्यावर प्रसन्न होते त्यामुळे त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहातो म्हणुन देखील या दिवशी जागरण करण्याची प्रथा आहे.

अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवुन त्यात केशर आदी मसाला घालुन ग्रहण केल्यास आरोग्यास खुप लाभ मिळत असल्याने या दुधसेवनाचे देखील फार महत्व आहे. एका संशोधनानुसार दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्व असतं हे तत्व चंद्राच्या किरणांमधुन अधीक मात्रेत शक्ति खेचण्याचे काम करतं. तांदुळामध्ये स्टार्च असल्याने ही प्रक्रिया आणखीन सुलभ होते. यामुळेच पुर्वीपासुन ऋषीमुनींनी दुध चंद्रप्रकाशात आटवण्यासंबंधी सांगीतले आहे. एकुणच ही प्रक्रीया विज्ञानावर आधारीत आहे.

पावसाळा संपल्यानंतर येणारी ही पहिलीच पौर्णिमा. पावसाच्या चार महिन्यांमधे आकाश स्वच्छ आणि निरभ्र नसतं परंतु अश्विनातल्या या पौर्णिमेला आकाश खुप दिवसांनी अगदी स्वच्छ असतं आणि चंद्र सुध्दा प्रथमच एवढा मोठा आणि समिप भासतो त्यामुळे या स्वच्छ आणि कोरडं वातावरण फार दिवसांनी वाटयाला आल्याने त्याचे अप्रुप वाटणे अगदी साहजिक असते.

रात्रभर आप्तेष्ट आणि मित्रमंडळी चंद्राच्या प्रकाशात गप्पा गोष्टी करत गाण्यांच्या भेंडया, भजनं म्हणत दुधाच्या अवतीभवती बसतात. चंद्राची किरणं त्या दुधात पडतायेत नां याची काळजी घेतल्या जाते आणि दुध आटल्यानंतर यथेच्छं त्याचे सेवन करण्यात एक वेगळीच मजा येते.

अस्थमा, दमा असणाऱ्याकरीता ही रात्र अत्यंत महत्वाची आणि उपयोगी समजली जाते. या रात्री दम्याचे औषध खीरीत मिसळुन चंद्राच्या प्रकाशात ठेवतात आणि पहाटे 4 वाजता ग्रहण केले जाते. रोग्याला संपुर्ण रात्र जागरण करावे लागते औषध ग्रहण केल्यावर 2 कि.मी. चालणे आरोग्याकरता लाभदायक ठरते.

पौराणिक कथा – Kojagiri Purnima Katha

पुर्वी एक सावकार होता त्याला दोन मुली होत्या त्या दोघीही शरद पौर्णिमेचे व्रत करायच्या. मोठी कन्या व्रत संपुर्ण भक्तिभावाने पुर्ण करायची आणि धाकटी व्रत अर्धवट सोडायची.

पुढे दोघींचा विवाह झाला धाकटी कन्या व्रत अर्धवट करत असल्याने तिला होणारे मुल जन्मल्याबरोबर मरून जायचे. ब्राम्हणाजवळ याची विचारपुस केल्यानंतर शरद पौर्णिमेचे व्रत अर्धवट केल्याने तिच्यावर ही आपत्ती आल्याचे तिला कळले.

ब्राम्हणांनी सांगीतल्याप्रमाणे तीने व्रत पुर्ण केले. तीला संतान प्राप्ती झाली पण ते मुल देखील लगेच मृत झाले तीने त्या मुलाला एका पाटावर ठेवले आणि त्याला व्यवस्थीत झाकले. तीने आपल्या मोठया बहिणीला बोलावले आणि तोच पाट बसावयास दिला.

ज्याक्षणी मोठया बहिणीच्या वस्त्रांचा स्पर्श बाळाला झाला ते जीवंत होवुन मोठमोठयाने रडावयास लागले.

ती धाकटीला म्हणते “ज्या पाटावर बाळाला ठेवतेस तोच मला बसायला दिला माझ्या बसण्याने त्याचा जीव गेला असता तर?” त्यावर धाकटी बहिण म्हणाली तुझ्या स्पर्शामुळेच तर तो जिवंत झालाय…

या प्रसंगानंतर तीने त्या नगरात सर्वांनाच शरद पौर्णिमेचे व्रत करावयास सांगीतले…

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी कोजागरीपौर्णिमेबद्द्ल माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here