महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी

Maharashtra Utsav

भारतामध्ये प्रत्येक राज्यात त्याची वेगवेगळी संस्कृती, परंपरा आणि सन (Festivals in Maharashtra) आहेत. महाराष्ट्र हे खूप मोठ राज्य आहे महाराष्ट्र मधले सन हे रंगीबेरंगी असतात. सर्व समुदायातील लोक सर्व सन आनंदाने साजरे करतात यात कोणीच जात, धर्म, संप्रदाय यात मतभेद करत नाही. महाराष्ट्रातील लोक आपल्या संस्कृतीला एकदम उत्तमपणे सांभाळतात.

महाराष्ट्र हि समृद्ध वारसा असलेली भूमी आहे.

महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी – Festivals in Maharashtra in Marathi

  • गणेश चतुर्थी – Ganesh Chaturthi

महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवडीचा असा हा सन आहे. महाराष्ट्रात गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात करण्यात येते लहानांन पासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांचा आवडीचा सन आहे. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, नगरांमध्ये खूप आनदाने गणपती बाप्पा चे आगमन होते. प्रत्येक ठिकाणी सुंदर अशी रोशनाई केली जाते. ऑगस्ट महिन्या मध्ये गणपती बापांचे आगमन होते. ११ दिवसांचा हा सन होतो. गणपती बाप्पांचा आवडीचा पदार्थ म्हणून मोदक बनवले जातात. त्यांच्या आवडीचे फुल म्हणून त्यांना जास्वंदी चे फुल चढवतात आणि २१ दुर्वा वाहतात. त्याच्या आगमनासोबत त्यांचा समारोप सुद्धा खूप थाटामाटात केला जातो ढोल ताशांच्या गजरात त्यांचा निरोप घेण्यात येतो. त्या मध्ये ढोल पथकाचा सुद्धा समावेश असतो.

  • कृष्ण जन्माष्ठमी – Janmashtami

गोकुळ अष्टमीला आणि जन्माष्टमी ला कृष्ण जन्म होतो आणि त्या दिवशी रात्री १२ ला महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी कृष्ण जन्माष्टमी मनवतात रात्री १२ ला भजन कीर्तन यांच्या गजरात कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात आणि दुसरी दिवशी गोकुळ अष्टमीला मनवतात या दिवशी कृष्णाच्या आवडीचे दही,  दुध, लोणी याचा प्रसाद असतो या मध्ये दहीहंडी चा कार्यक्रम असतो या मध्ये दहीहंडी मध्ये दही, दुध,लोणी हे ठेवण्यात येते आणि हि हंडी खूप उंच बांधण्यात येते आणि युवा दहीहंडी फोडण्यासाठी पिर्यामिड तयार करून हंडी फोडण्याचा पर्यत करतात महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी या साठी स्पर्धा पण घेतल्या जातात व जी टीम जिंकेल त्यांना बक्षिसे देण्यात येतात. हा सन खूप थाटामाटा साजरा करण्यात येतो. लोणी चोरण्यासाठी भगवान कृष्ण आणि त्याचे मित्र ज्या प्रकारे गोपीच्या घरात जाऊन माखन चोरायचे त्याच प्रकारे मानवी पिर्यामिड तयार करून युवा त्याचा आनंद घेतात. गोकुळाष्टमी पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी जमते.

  • गुडी पाडवा – Gudipadwa

गुडी पाडवा म्हणजेच कि महाराष्ट्रातील लोकांचे नवीन वर्ष हिंदू दिनदर्शिका प्रमाणे या दिवशी पासून नवीन वर्ष सुरु होते. या दिवशी प्रत्येक जन आपल्या घरी गुढी उभारतो. महाराष्ट्राच्या या पारंपारिक उत्सवात अनेक भागातून दिंड्या काढल्या जातात. विशेष पदार्थ बनवले जातात. जसे कि पुरणपोळी, भजे, वडे, वरण भात, भाजी, गुलाबजामून या सोबत तच घरे हार, फुल, रांगोळी यांनी सजवली जातात. घरी गुढी उभारली जाते.

गुढी विजयाचे प्रतिक आणि सुख, शांती, समृद्धी, चांगले आरोग्य याचे प्रतिक मानले जाते.

या दिवशी बरेच जन मौल्यवान वस्तू घेतात जसे गाडी, सोने.

धार्मिक महत्व असलेला हा सन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

  • मकर संक्रांति – Makar Sankranti

मकर संक्रांतीला दुसर्या राज्यांमध्ये उत्त्नारायन किवा पोंगल सुधा म्हटले जाते. मकर संक्रांतीला काइट फेस्टिवल सुद्धा म्हटले जाते. संक्रांति हि हिवाळयामधल्या उत्सवाचा सन आहे. या दिवशी सूर्य आपला दक्षिण गोलार्थ सोडतो आणि उत्तर गोलार्थ वरती आपला प्रवास सुरु करतो. या दिवशी पूर्ण आकाशात आपल्याला पतंग पाहायला मिळतात. या दिवशी तिळगुळाचे लाडू, वडी करतात आणि लहान मुल आपल्या शेजारी नातेवाईकांमध्ये हे लाडू वाटतात. आणि “तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला”असे म्हटले जाते.

तसेच या दिवशी देवाला नैवद्य दाखवण्यासाठी तिळगुळाची पोळीचा मान असतो. तसेच या दिवशी लहान मुल आणि आणि नवविवाहित महिला काळे कपडे आणि लहान लहान गोड पदार्थांनी बनलेले दागिने घालून. गाणे, डान्स करून मोठ्या थाटामाटात मकरसंक्रांति साजरी करतात. या दिवशी महिला हळदी कुंकू याचा कार्यक्रम ठेवतात आणि दुसऱ्या महिलांना हळदी- कुंकू लावून भेटवस्तू देतात.

  • आषाढ़ी एकादशी – Ashadhi Ekadashi

या दिवशी भगवान विठ्ठ्ल यांच्या जन्मानिमित्त पंढरपुरची वारी काढली जाते ज्या मध्ये महाराष्ट्रातील भाविकांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

पंढरपूर हे शहर चंद्रभागा या नदीच्या काठी वसलेले आहे.

या दिवशी वेगवेगळ्या शहरातून वारी निघते आणि बऱ्याच ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात येते.

यादिवशी भजन, कीर्तन आणि टाळ, मृदुंग यांच्या गजरात विविध भागातून दिंड्या काढल्या जातात यामध्ये भाविकांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

या दिवशी चंद्रभागेच्या तीरी खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.

खूप दुरून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमतात. तर अश्या प्रकारे महाराष्ट्रात खूप उत्साहाने हा सन साजरा करण्यात येतो.

  • पोळा – Pola

हा सन मुख्य तर शेतकरी राजांचा असतो.

या दिवशी ज्याला बळीराजा म्हंटले जाते म्हणजेच कि बैल यांचा हा दिवस असतो या दिवशी त्यांना चं अंघोळ घालून सजवतात आणि पुरणपोळीचे जेवण जेऊ घालतात.

पोळ्याच्या आदल्या दिवशी बळीराजाला आमंत्रण दिले जाते आणि दुसर्या दिवशी त्यांनी जेवण म्हणजेच कि नेवैद्य दिला जातो. खेडोपाडी बैलांची जत्रा भरवली जाते. आणि मोठ्या उत्साहाने शेतकरी बांधव हा सन साजरा करतात.

  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती – Shivaji Maharaj Jayanti

१९ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच कि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मानिम्मित हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

शिवाजी महाराज हे एक महान राज्यकर्ता होते. त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि साहसाने त्यांनी हिंदू साम्राज्य इंग्रजांच्या ताब्यात येण्यापूर्वी दोन शतके टिकवले.

संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या या महान कार्याबद्दल आदर आणि सन्मान आहे.

या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने मिरवणुका काढल्या जातात.

रस्त्यावर उतरून जनता त्यांच्या नावाचा जल्लोष मोठ्या आनंदाने साजरी करते. या दिवशी त्यांच्या कथा, पोवाडे आणि त्यांचे गीत दाखवल्या जातात.

  • दिवाळी – Diwali


दिवाळी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सन आहे. हा सन १५ दिवस चालतो.

या दिवशी भगवान राम हे १४ वर्ष वनवास करून घरी आले होते त्या निम्मित हा सन संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा साजरा केला जातो या १५ दिवस संपूर्ण ठिकाणी दिवे लावले जातात, या दिवशी आपल्या घरातील सर्व वाहने, अवजारे यांचे पूजन करतात.

आणि लक्ष्मी मातेचे पूजन करतात.

लायटिंग, फुल, रांगोळी, दिवे यांनी घर सजवले जातात. तसेच सर्व जणांना नवीन कपडे घेतले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण बनवले जातात.

जसे कि चिवडा, चकली, लाडू, शेव आणि बरेच काही. या दिवशी फटके फोडण्यात येतात. तसेच लक्ष्मी पूजन झाले कि मोठ्या लोकांचे दर्शन घेतल्या जाते. दिवाळी झाली कि भाऊबीज ला लहान मुल आणि बायका माहेरी जातात.

भाऊबीज झाली म्हणजेच कि भाव बहिणीचा सन यादिवशी बहिण आपल्या भावाला नारळ टोपी देऊन औक्षवंन करते आणि भाऊ आपल्या बहिणीला आशीर्वादाच्या स्वरुपात एक भेट वस्तू देतो.

तर अश्या प्रकारे हा सन फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

तर अश्या प्रकारे महाराष्ट्रात सर्व सन (Festivals in Maharashtra) फार मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
धन्यवाद!

महाराष्ट्रातील सणांविषयी विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About Festivals in Maharashtra

Q1. महाराष्ट्रातील सर्वात फेमस सन कोणता?

Ans: राम नवमी, हनुमान जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, दिवाळी, दसरा, पोळा, मकर संक्रांति, गुडीपाडवा, कोजागिरी, गणेश उत्सव, होळी.

Q2 . मुंबई मधील फेमस सन कोणता?

Ans: मुंबई मध्ये गणेश उत्सव हा सर्वात मोठा सन आहे.

Q3. महाराष्ट्रातील नवीन वर्ष कधी सुरू होते?

Ans: महाराष्ट्रातील नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरु होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top