हिंदु संस्कृतीमधला महत्वाचा सण दिवाळी … लक्ष्मीपुजन.

Lakshmi Pujan in Marathi

दिवाळी हा हिंदु संस्कृतीमधला अत्यंत महत्वाचा सण… हा आनंदोत्सव संपुर्ण भारतात अतिशय हर्षोल्हासात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो…

दिपावली… दिवाळी… दिपोत्सव… ही नावं तर या सणासंबंधीत आपण ऐकलीच आहेत परंतु दिपप्रतिपदुत्सव… यक्षरात्री… दिपमाला ही नावे तुम्ही ऐकली आहेत का? अहो या नावांनी देखील कधीकाळी आपला दिपोत्सव ओळखला जायचा..

दिपावलीचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा समजला जाणारा दिवस म्हणजे लक्ष्मीपुजन!

दिवाळीच्या पाचही दिवसांचं वातावरण अत्यंत मांगल्याने आणि पावित्र्याने भरलेले असते आणि त्यातल्या त्यात लक्ष्मीपुजनाला तर विचारायलाच नको!

पाच दिवसांमधे या दिवशी तर अधिकच स्वच्छता, तोरणं, प्रकाश केला जातो… माता लक्ष्मीची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहावी म्हणुन तिची आराधना करण्याचा हा दिवस…..

लक्ष्मीपुजन मराठी माहिती – Lakshmi Pujan in Marathi

Lakshmi Pujan in Marathi
Lakshmi Pujan in Marathi

लक्ष्मीपुजन माहिती – Lakshmi Pujan Information in Marathi

तसे पाहाता अमावस्या ही शुभ समजली जात नाही परंतु आश्विन महिन्यातील लक्ष्मीपुजनाची ही अमावस्या शुभ समजली जाते आणि याच पर्वावर माता लक्ष्मीचे पुजन देखील केले जाते…

या अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी सगळीकडे संचार करत असते व स्वतःच्या वास्तव्याकरता योग्य असं घर शोधत असते…

धर्मनिष्ठ, आस्तिक, कर्तव्यदक्ष, चारित्र्यवान, संयमी, क्षमाशील पुरूष व पतीव्रता आणि गुणवान स्त्रिचा ज्याठिकाणी वास असतो अशा ठिकाणी लक्ष्मीला वास करावासा वाटतो…

लक्ष्मीपुजन आणि दिपावली साजरी करण्यामागे काही पौराणिक कथा सांगीतल्या जातात त्यातल्या महत्वाच्या कथा याप्रमाणे आहेत.

महाकाली रूप धारण करून देवीने दैत्यांचा नाश केला… राक्षसांचा वध करूनही देवीचा राग शांत होत नव्हतां त्यावेळी देवाधीदेव शंकर देविच्या चरणाशी लिन झाले… भगवान शंकरांचा स्पर्श होताच देवीचा क्रोध शांत झाला… या प्रसंगाचे स्मरण म्हणुन देवी लक्ष्मीची पुजा केली जाते

या दिवशी भगवान विष्णुंनी माता लक्ष्मीसह सर्व देवांची बळीच्या कैदेतुन मुक्तता केली म्हणुन लक्ष्मीपुजन करण्याची परंपरा सुरू झाली.

भगवान श्रीकृष्णाने नरकासुरासारख्या दैत्याचा वध केल्यामुळे आनंदीत होऊन गोकुळातील प्रजाजनांनी दिवे पेटवुन रोषणाई केली होती.

प्रभु रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढय शत्रुचा पराभव केला त्यामुळे अयोध्येला परतत असतांना लोकांनी त्यांच्या वाटेत दिवे लावुन रोषणाई केली आणि दिपावली साजरी केली..

पुर्वी कुबेराचे आणि त्याची पत्नी इरितीचे पुजन देखील या दिवशी करण्याची प्रथा होती कालांतराने इरिती या कुबेराच्या पत्नीऐवेजी लक्ष्मीची पुजा होवु लागली आणि कुबेरा ऐवेजी श्रीगणेशाचे पुजन होउ लागले.

लक्ष्मीपुजन विधी – Lakshmi pujan vidhi

घराचे अंगण तोरणाने आणि सुरेख अश्या रांगोळीने सजविले जाते.

लक्ष्मीपुजनाला लक्ष्मीच्या फोटोची, मुर्तीची, चलनात असणाऱ्या नोटा आणि नाण्यांची,सोन्याचे दागिने,चांदीची भांडी यांची पुजा करण्यात येते.

झेंडुची फुलं या काळात मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचे तोरण आणि पुजेत देखील या फुलांचा समावेश केला जातो…

पुजेत काजु, बदाम, नारळ, लवंग, वेलची, खडीसाखर, सर्वप्रकारची फळं, ठेवली जातात.

साळीच्या लाहया, बत्तासे, गुळ धणे, पेढयांचा नैवेद्य दाखवुन प्रसाद वितरीत केला जातो… दिवाळीच्या निमीत्ताने केलेल्या फराळाचा नैवेद्य देखील लक्ष्मीला दाखविला जातो.

या दिवशी केरसुणीचे देखील फार महत्व आहे… या केरसुणीला हळद कुंकु फुले वाहुन तीचे पुजन केले जाते (स्वच्छतेला पुजेत अग्रक्रम असल्याने देखील केरसुणीच्या पुजेचा मान असावा).

सुगंधी उद्बत्त्या आणि धुप लावुन वातावरण मंगलमय बनविले जाते.

पुजा विधी संपन्न झाल्यानंतर फटाके उडवुन आनंद साजरा केला जातो.

पावसाळा संपुन शरदऋतुच्या ऐन मध्यात या सणाचे आगमन होते… नवी पिकं घरात येण्याचा हा काळ… सगळीकडे आबादी आबाद झालेली असते… शेतकरी समाधानी असतो… घरातील वातावरण आलेल्या नव्या पिकामुळे समाधानी असते आणि अश्या सकारात्मकतेच्या वातावरणात दिपावली सण साजरा करतांना अत्यंत आनंद होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here