Home / Religion / विठ्ठ्लाच्या दर्शनासाठी पंढरपूर वारी | Pandharpur Wari Information

विठ्ठ्लाच्या दर्शनासाठी पंढरपूर वारी | Pandharpur Wari Information

“भेटी लागी जिवा लागलीसे आस”

Pandharpur Wari

विठ्ठ्लाच्या दर्शनासाठी पंढरपूर वारी – Pandharpur Wari Information

वारी . . . . . . . . संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक अजब जादूगरी . . . प्रत्येकवर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळेभरून पाहाणे ही सच्च्या वारक.याची ओळख! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊसपाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात . . . . शेकडो कोस पायी वारी करून फक्त विठोबाचे डोळे भरून दर्शन घेणे हेच या वारीचं साध्य!

“हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास
पंढरीचा वारकरी। वारी चुको न दे हरी।।”

अनेक जण वर्षानुवर्ष वारीला जातात . . . एकदाही न चुकता! कुठुन येतं त्यांच्यात हे बळ ? कुठल्या आध्यात्मिक शक्तीने ते भारले जातात? देहभान विसरायला लावणारं कोणतं रसायन या चैतन्यात दडलेलं असतं?

पंढरीची वारी हे खरं म्हणजे भक्ती आणि ज्ञानाधिष्ठीत व्रत आहे समतेचं, एकतेचं. जगातील एकमेवाव्दितीय असं लोभसवाणं रूप आहे, आणि विठोबा म्हणजे चैतन्याचा गाभा. विनोबांनी विठ्ठलाला “विश्वदेव” असं संबोधलं आहे.

“बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव ।।”

वारी म्हणजे विशिष्ट दिवशी नियमानं पंढरपुरी जाणे . . . ज्ञानेश्वरीत वारी हा शब्द निरनिराळया अर्थाने घेतलेला आहे उदाहरणच द्यायचं झालं तर . . .तरी संकल्पाची सरे वारी, सरे अहंकाराचाी वारी, सारितसे वारी संसाराची, आता कर्मठा कैची वारी, मग रात्रीची वारी उरे या ठिकाणी वारी म्हणजे ’फेरा ’ अश्या अर्थानी आलेला आहे.

वारकरी हा शेतकरी आहे तो शेतातल्या उभ्या पिकातही विठ्ठल पाहातो. काळया मातिला विठ्ठलाचे अभंग मानतो, सावता माळयाची परंपरा सांगतो.

“दिंडया पताकांनी दुमदुमली पंढरी। तरी मी श्रीहरी कासाविस
बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा। कुणब्यांचा मळा उभा राहो।”

महाराष्ट्रात भक्ती संप्रदायाचा इतिहास इतर राज्यांच्या तुलनेत खुप वेगळा आहे. महाराष्ट्रात सुमारे तेराव्या शतकात भागवत संप्रदायाचा साहित्य या अंगांनी उदय झाला त्याकाळात यादवांचे राज्य होते. त्या राज्यात कमालीचा जातीभेद आणि कर्मकांडाला स्थान होते. संत नामदेव महाराजांनी त्याकाळी कर्मकांडाच्या अंधारात चाचपडणा.या समाजाला बाहेर काढण्याकरता प्रबोधनाची चळवळ या वारीच्या माध्यमातुन सुरू केली.

आजच्या वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणा.या जगात अखंड सुरू असलेली वारी बघीतली की गहिवरायला होतं. कोणत्या मातीची बनलेली असावीत ही माणसं? असा विचार त्यांना पाहील्यावर मनाला शिवल्याशिवाय राहात नाही . . . लहानांपासुन मोठयांपर्यंत सर्वांचं आराध्य दैवत असलेला विठोबा! त्याच्या भेटीची ओढ वारक.याला आषाढाच्या सुरूवातीपासुनच वेध लावते आणि पाउलं पोहोचतात थेट पंढरपुरात!

आषाढी वारीबाबत काही महत्वाच्या गोष्टी

नारायण महाराज या तुकाराम महाराजांच्या तिस.या मुलाने 1685 साली पहिली वारी केली. तेव्हां ते आळंदीहुन संत ज्ञानेश्वरांच्या आणि देहूवरून संत तुकारामांच्या पादुका घेऊन पंढरपुरला गले होते.

सध्याची वारीची रचना हैबतबाबा यांनी केलेली आहे. ते सातारा जिल्हयातील आरफळ गावचे देशमुख होते. त्यांनी वारीला लावलेल्या शिस्तीनुसार त्याकाळच्या 27 दिंडया पालखीपुढे चालतात आणि त्यानंतर अस्तित्वात आलेल्या दिंडया पालखीमागे चालतात. आज एकुण 200 पेक्षा जास्त नोंदणी केलेल्या दिंडया आहेत.

दोन लाख भाविकांनी सुरू होणारा हा पालखी सोहळा आषाढी एकादशीला जवळपास 10 लाख वारक.यांच्या उपस्थितीत संपन्न होतो ज्यात गोवा, गुजरात आणि कर्नाटक मधील दिंडया ही सहभागी होतात.

इतर काळात सरासरी 600 रूपयांचा रोज होणारा व्यवसाय वारीच्या काळात जवळपास 15 ते 20 पटीने वाढतो.

धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपुरला पायी जात असतांना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाश्या टेकडीवरून विðलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विðलाच्या दर्शनाच्या ओढीने ते तिथुन पंढरपुर पर्यंत धावत गेले, याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.

पंढरपुरची वारी निश्चित केव्हां सुरू झाली हे सांगणे कठीण आहे पण पंढरपुरच्या वारीला किमान एक हजार वर्षांची परंपरा आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पुर्वी होती, त्यांचे वडील विðलपंत पंढरीचे वारकरी होते, ज्ञानदेवांना पंढरीच्या वारीचा मार्ग त्यांचे गुरू आणि वडीलबंधु निवृत्तीनाथांनी दाखवला.
ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात एकाच मार्गावर येतात आणि नंतर थेट नातेपुते मार्गावर पुन्हा एकत्र येतात तेथे दोन संतांची भेट होते.

वारी सोहळयाच्या वाटचालीत काही ठिकाणी रिंगण केले जाते. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळयात काही ठिकाणी उभे रिंगण तर काही ठिकाणी गोल रिंगण केले जाते. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदंगवादक, विणेकरी गोलाकार उभे राहुन नामगजर करतात तर मध्यभागी अश्व ( घोडा ) गोलाकार प्रदक्षिणा घेऊन माऊलींना अभिवादन करतो.

आषाढी वारीचे आणि पांडुरंगाचे आणखीन एक वैशिष्टय असे की सर्वसामान्यांचा देव असणारा विठूराया हाच एक असा देव आहे की ज्याच्या चरणी प्रत्येक भाविक विनम्रतेने मस्तक टेकवु शकतो. परमार्थात भक्ती हीच संपदा असुन धनसंपदेला दुय्यम स्थान दिल्या गेलं आहे. भक्तीला ह्नदय लागते, धनाची आवश्यकता नाही, आषाढीची पंढरीवारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे.

“माझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तिरी।
बाप आणि आई। माझी विठ्ठल रखुमाई।।”

एकमेकांना “जय हरी विठ्ठल” म्हणत लहानथोरपण विसरून एकमेकांच्या पायी डोकी ठेवली जातात. पाया पडतांनाचे हे दृश्य वारी व्यतिरिक्त आपल्याला इतरत्र कुठेही पहायला मिळणार नाही. सर्व जातीभेद विसरून एकमेकांना माऊली माऊली च्या नावानं हाका मारत वारकरी धर्म, पंथ, जात, लहान थोर या सगळयाच्या पार निघुन गेला असतो आणि प्रत्येकजण प्रत्येकात जणु परमेश्वर बघत असतो.

आषाढी एकादशीला सामाजिक समता आणि विश्वबंधुत्वाची प्रचिती देणारा आषाढी वारीचा अनुपम्य अमृत सोहळा कळसाला पोहोचतो . . . विठ्ठल नामाच्या गजरानं भुवैकुंठ पंढरपुर दुमदुमतं . . लाडक्या विठुच्या विलक्षण ओढीनं देहभान हरपुन लाखो वारकरी भक्तीरसात चिंब न्हातात. आदल्या दिवशी म्हणजे दशमीला शेवटचे ठिकाण म्हणजे वाखरी दळावरून ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू संत तुकोबांच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या संध्याकाळी पंढरीत दाखल होतात . . . .

चंद्रभागेचं वाळवंट . . नदिकाठ . . .आणि भक्तीच्या वाटा भगव्या पताक्यांनी फुलतात . . . विटेवरच्या लावण्यशोभेची आभा चंद्रभागेच्या प्रवाही पाण्यात मिसळते आणि हरीसंकीर्तनात रमलेल्या त्या रात्री वारक.यांच्या पापण्या मिटता मिटत नाहीत . . . . . . . राजस सुकुमार मदनाचा पुतळा अशा त्याच्या रूपानं प्रसन्नतेची मांगल्याची पहाट उजळते.

महाराष्ट्राची खरी ओळख संतांची भुमी अशीच आहे. दरवर्षीचा पंढरीचा ’वारी’ उत्सव हा तर समर्पण वृत्तीचा कळसाध्याय. लाखो वारक.यांच्या शिस्तबध्दतेचे असे उदाहरण जगात दुसरे नाही. वारी केल्यानं भेदाभेदाची आवरणे गळुन पडतात, सात्विक आहार विहारातुन चांगले आचरण मनावर रूजते, जीवनाचा अर्थ गवसतो, सदाचरणी वर्तन, संतुष्टता, सात्विक आचरण या कृती म्हणजेच वारी.

आज विज्ञानानं जग जवळ आणलं पण माणसं माणसाजवळ आली नाहीत हे वास्तव आहे आजच्या जगाचं, वारी त्यात परिवर्तन करण्यास सक्षम आहे . . . दिवसेंदिवस वारक.यांच्या संख्येत वाढ होते आहे, स्नेह आणि ज्ञानाची जीवनमुल्यं अधिक वाढावीत सर्वांमधला चैतन्याचा अंश एकच आहे ही मनोधारणा वाढावी हाच वारीचा संदेश आहे.

पांडुरंगाच्या आरतीत शेवटच्या कडव्यात “आषाढी कार्तिकी भक्त जन येती। चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती। दर्शन हेळा मात्रा। तया होय मुक्ति। केशवासी नामदेव भावे ओवाळती।। असा उल्लेख सापडतो. अशी पुर्वापार चालत आलेली ही परंपरा यापुढेही अशीच अखंड अव्याहत वाहत्या चंद्रभागेप्रमाणे अविरत सुरू राहणार आहे . . . . . .

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी विठ्ठ्लाच्या दर्शनासाठी पंढरपूर वारी ची आणखी असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा स्वयंपाकासाठी काही खास टिप्स तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट: Kitchen tips – स्वयंपाकासाठी काही खास टिप्स या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *