“कुबेर मंत्र” दररोज या मंत्राचा जाप केल्यामुळे होईल धनप्राप्ती!

Kubera Mantra

मित्रांनो, हिंदू धार्मिक पौराणिक ग्रंथात आणि वेदांमध्ये सुमारे ३३ कोटी देवी देवतांचा उल्लेख करण्यात आला असून प्रत्येक देवी देवतांचे महत्व वेगवेगळ आहे. त्यामुळे प्रत्येक देवी देवतांचे सन उत्सव तसचं, पूजा विधी करण्याची परंपरा देखील खूप वेगळी आहे. त्यामुळे आपण आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये वर्णिल्या प्रमाणे आपण या देवी देवतांची पूजा विधी तसचं, सन उत्सव साजरे करीत असतो.

जसे की, सोमवार या दिवशी भगवान शिव यांची पूजा केली जाते. याप्रकारे प्रत्येक देवी देवतांचे विशेष असे वार असून त्या दिनानुसार आपण त्यांची पूजा अर्चना करीत असतो. तसचं, प्रत्येक देवी देवतांची पूजा अर्चना करण्यासाठी आणि त्यांची आराधना करण्यासाठी त्यांची स्तुती आणि ध्यान करण्याकरिता आपण धार्मिक ग्रंथात नमूद केलेल्या विशेष मंत्राचे उच्चारण करीत असतो.

जेणेकरून देवी देवतांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहील. मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून अश्याच प्रकारच्या एका देवते बद्दल जाणून घेणार आहोत शिवाय, त्यांची  उपासना करण्यासाठी उच्चारण करण्यात येणाऱ्या महान मंत्राचे लिखाण देखील करणार असून या मंत्राच्या उच्चारणाचे फायदे सुद्धा जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, कुबेर महाराज तर आपण सर्वांना माहिती आहेत. त्यांना भगवंतांच्या धनाचे कोषागार म्हणून संबोधलं जाते. आपण दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी या देवतेची आराधना करीत असतो.

हिंदू धर्मात देवी महालक्ष्मी माते प्रमाणेच कुबेर महराजांचे देखील अनन्य साधारण महत्व आहे. भगवान कुबेर यांच्या विषयी माहिती सांगणाऱ्या अनेक कथांचा उल्लेख आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे.

“कुबेर मंत्र” दररोज या मंत्राचा जाप केल्यामुळे होईल धनप्राप्ती! – Kubera Mantra in Marathi

Kubera Mantra
Kubera Mantra

ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥
ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥
ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये॥
धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥

भगवान कुबेर यांच्याबद्दल असे सांगण्यात येते की,  भगवान कुबेर यांची महानता इतकी मोठी होती की, खुद भगवान विष्णू पत्नी देवी महालक्ष्मी मातेला कुबेर महाराजांकडून कर्ज घ्याव लागलं होत.  याची परतफेड म्हणून तिरुपती बालाजीला सोने, चांदी, हिरे, मोती, आदी संपत्ती दान केली जाते.

भगवान कुबेर यांच्याबद्दल कहाणी – Kuber Story

धनाची देवता असलेल्या कुबेर महाराज यांच्याबद्दल पौराणिक कथा आहे की,  भगवान कुबेर महाराज हे पूर्व जन्मी एक चोर होते.

स्कंद पुराण कथेनुसार, कुबेर महाराज हे पूर्व जन्मी गुणनिधी नामक एक ब्राह्मण पुत्र होते. तसचं, त्यांच्या वडिलांचे नाव सोमदत्त दीक्षित असे असून ते एक ब्राह्मण होते. ब्राह्मण पुत्र असलेल्या गुणनिधी यांच्या अंगी लहानपणापासूनचं वाईट गुण होते. परिणामी ते वाईट संगतीत राहून चोरी करू लागले.

गुनानिधीची ही वृत्ती पाहून वडिल सोमदत्त दिक्षित यांनी त्यांना घराबाहेर काढले. परंतु, या गोष्टीचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. गुणनिधी यांच्या चोरी करण्याच्या वृत्तीला कंटाळून राज्याच्या राजाने त्यांना आपल्या राज्या बाहेर कडून दिले.

तहान भूकीने व्याकूळ असलेला गुणनिधी दुसऱ्या राज्यात जात असतांना त्यांची दृष्टी जवळच असलेल्या एक मंदिरावर गेली. आपली भूक शमविण्यासाठी त्यांनी त्या मंदिरातील प्रसाद चोरी करण्याचा विचार केला आणि मंदिराच्या गाभाऱ्यात दाखल झाले.

मंदिरात झोपल्या असलेल्या पुजाऱ्यांची दृष्टी आपल्यावर पडली नाही पाहिजे याकरिता त्यांनी आपली लंगोट दिव्याच्या समोर धरली. यानंतर गुणनिधी प्रसादाची चोरी करून त्या मंदिरातून पलायन करीत असतांना ते काही लोकांच्या नजरेस पडले. लोकांनी त्यांना पकडले आधीच भूकीने व्याकूळ आणि त्यात धावपळ झाल्याने गुणनिधी यांचा मृत्यू झाला.

भगवान शिव आणि यम यांचे दूत त्यांना घेण्यासाठी आले तेव्हा भगवान शिवांचे दूत त्यांना घेऊन भगवान शिवाच्या समक्ष गेले. भगवान शिवा नी गुणनिधी यांना त्यांच्या कर्माचा पाडा वाचून दाखवला. भगवान शिव गुनानिधीला म्हणतात, तू संपूर्ण आयुष्य चोरी करण्यात गमावलं, परंतु, या सर्व पपांच्या कर्मात तू एक पुण्याचं काम देखील केलं ते म्हणजे, धनत्रयोदशीच्या दिवशी तू आपल्या लंगोटच्या साह्याने माझ्या मंदिरात प्रज्वलित असलेल्या दिव्याचे विझण्यापासून बचाव केला. तेव्हा तू माझा पार्षद झाला आहे, यामुळे मी तुला आशीर्वाद देतो की,   ज्या धनाच्या लालचेपायी तू आयुष्यभर चोरी करीत राहिला त्या धनाचा मी तुला अधिपती करतो.

आज पासून संपूर्ण विश्व तुला धनाची कुबेर देवता म्हणून ओळखेल. भगवान शिवा नी गुणनिधी यांना यक्षांची देवता आणि सर्व देवतांच्या खाजीनाचे कोषाध्यक्ष पद बहाल केलं. अश्या प्रकारे कुबेर देवता यांच्या संबंधी दंतकथा प्रचलित आहे.

याच प्रकारे काही पौराणिक कथानुसार, भगवान कुबेर हे महान ऋषी विश्रवा यांचे पुत्र होते. ऋषी विश्रवा यांचे दोन विवाह झाले असल्याने कुबेर महाराज हे त्यांची पहिली पत्नी इडविडा यांचे पुत्र होते.

तर, विश्रवा ऋषी यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कैकसी होते. तसचं, त्यांच्या पुत्रांचे नावे, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण असे होते तर शुर्पणखां नावाची एक कन्या होती. त्यामुळे रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे भगवान कुबेर यांचे सावत्र बंधू होते.

प्रभू कुबेर यांचा विवाह सूर्य देवता आणि छायादेवी यांची कन्या भद्रा यांच्याशी झाला होता. आपला सावत्र बंधू रावण दृष्ट्पणे अनेक लोकांवर अत्याचार करत असल्याने कुबेर महाराजांनी आपले दूत राक्षस राज रावण यांच्या राज दरबारात पाठवले व त्यांना आपले अत्याचार थांबविण्याची विनंती केली. परिणामी रावणाने त्या दुतांचा वध केला आणि यक्षराज कुबेर यांच्यासोबत युद्ध पुकारले.

यक्ष हे बाळाच्या साह्याने युद्ध करीत असतं तर राक्षस हे मायावी वृत्तीने युद्ध लढत होते. रावणाने मायावी वृत्तीने छल करून कबीर महारांच्या डोक्यावर वर केला परिणामी कबीरजी बेशुद्ध पडले आणि रावणाने त्यांचे पुष्पक विमान चोरले तसेच प्रभू महादेव यानी त्यांना दिलेली सोन्याची लंका आपल्या ताब्यात घेतली.

यानंतर कुबेर महाराज वडिलांकडे गेले आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांनी महादेवाची आराधना केली. फलस्वरूप त्यांना विश्वातील संपूर्ण धनाची देवतेची पदवी, पत्नी आणि पुत्र प्राप्त झाली. गोमती नदीच्या किनारी असलेले हे स्थळ धनदतीर्थ म्हणून ओळखलं जाते.

भगवान शिव यांच्या आशीर्वादामुळे त्यांना संपूर्ण देवतांच्या संपत्तीचे कोषाध्यक्ष असण्याचा आशीर्वाद मिळाला.

मित्रांनो, आपण देखील या धनाची देवता असलेल्या कुबेर महाराजांची दरवर्षी आपल्या घरी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या तिथीवर धनत्रयोदशी निमित्ताने पूजा करीत असतो. या वर्षी पितळच्या धातूची भांडी विकत घेण्याचा मान असतो.

या धनाची देवता असलेल्या कुबेर देवाची आपल्यावर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवर सदैव कृपादृष्टी राहावी याकरिता आपण या लेखात लिहिलेल्या कुबेर मंत्राचा नियमित १०८ वेळा जप करावा.

अनेक लोकांची अशी धारणा आहे की, या मंत्राच्या उच्चाराने आपले दारिद्य नष्ट होवून घरात सदैव लक्ष्मीचा वास राहतो. आपणास कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव वाटत नाही. मित्रांनो, आश्या आहे की, भगवान कुबेर यांची महंती सांगणारा आणि त्यांची आराधना करण्यासाठी लिखाण करण्यात आलेला कुबेर मंत्र आपणास आवडला असेल.  धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top