महामृत्युंजय मंत्र

Mahamrityunjaya Mantra Lyrics

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून यजुर्वेद ग्रंथात वर्णीत भगवान शिव यांना अर्पित महामृत्युंजय मंत्र याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहोत. तसचं,  महामृत्युंजय मंत्रांचे लिखान देखील करणार आहोत. ते खालील प्रमाणे..

महामृत्युंजय मंत्र – Maha Mrityunjaya Mantra in Marathi

Mahamrityunjaya Mantra
Mahamrityunjaya Mantra

“ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्
ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ।”

महामृत्युंजय मंत्र म्हणजे भगवान शिव यांची स्तूती करण्याहेतू केली गेलेली एक प्रकारची वंदनाच आहे. या महामृत्युंजय मंत्रांचा अर्थ ‘मृत्यूवर विजय पावणारा परमात्मा’ असा सांगण्यात आला आहे. तसचं, हिंदू धर्मातील प्रसिद्ध गायत्री महामंत्राप्रमाणे महामृत्युंजय मंत्र देखील खूप व्यापक स्वरुपात प्रचलित आहे.

आपल्या हिंदू धर्मांत भगवान शिव यांची खूप भक्ती केली जाते. अनेक लोक त्यांना आपले इष्ट देवता मानतात. आपले सर्व दु:ख, दरिद्रे तसचं आरोग्याचे निवारण करण्यासाठी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो, अशी लोकांची धारणा आहे. भगवान शिव यांची अनेक नावे प्रसिद्ध आहेत. आपल्या भक्तांच्या हाकेला पटकन धावून येणारे देव म्हणून त्यांना भोलेनाथ देखील म्हटल जाते.

मित्रांनो, महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. तसचं, या मंत्राचे अनेक नावे आणि प्रकार आहेत. जसे की, या मंत्राला रुद्र असे म्हटल जाते. महामृत्युंजय मंत्राचा अर्थ म्हणजे साक्षात प्रभू शिव यांचे संपूर्ण वर्णन जसे की,

त्र्यंबकम मंत्र हा भगवान शिवाचे त्रिनेत्र दर्शवितो.याच मंत्राला कधी कधी मृत संजीवनी मंत्र ही म्हणतात. कारण, या महामृत्युंजय महामंत्रामध्ये गेलेले प्राण परत आणण्याची क्षमता आहे. महामृत्युंजय म्हणजे मरनावर विजय मिळविणे होय.

महामृत्युंजय मंत्राचे फ़ायदे – Mahamrityunjaya Mantra Benefits

मित्रांनो, या महामृत्युंजय मंत्राचा जप  निरोगी आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी करतात. महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर. श्री त्र्यंबकेश्वराला दुखाचा आणि दानवाचा विनाशक म्हणतात. अश्या प्रकारची धार्मिक भावना सर्व शिव भक्तांची असल्याने आपण देखील या महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. धन्यवाद..

हिंदू धर्मातील ग्रंथ, वेद पुराण आणि शास्त्रांमध्ये भगवान शिव यांचे महात्म्याचे विविध स्वरुपात वर्णन केलं आहे. तसचं, भगवान शिव यांना हिंदू संस्कृती चे प्रणेता आदिदेव महादेव अस म्हटलं जाते.

आपल्या हिंदू सांस्कृतिक मान्यतेनुसार,  ३३ करोड देवतांमध्ये भगवान शिवा यांना ‘शिरोमणी’ मानलं जाते. म्हणूनच आपण त्यांना देवाधिदेव महादेव असे म्हणतो. सृष्टीतील तिन्ही  लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ असे अलौकिक शक्ती असणारे भगवान शिव हे महान देव आहेत.

अश्या भगवंताचे वर्णन करावे तितके कमीच. भगवान शिव यांना मृत्यूवर विजय पावणारे देव म्हणून ओळखले जाते. कारण, समुद्र मंथनातून प्रकट झालेल विष त्यांनी स्व:ता प्राशन केलं होत. म्हणून त्यांना नीलकंठ देखील म्हटल जाते.

यजुर्वेद ग्रंथात लिखित महामृत्युंजय मंत्रात त्यांच्या सर्व शक्ती सिध्दी चे वर्णन केलं आहे. शिवभक्त आपले सर्व दु:ख दरिद्रे नाहीसे करण्यासाठी नियमित या महामृत्युंजय मंत्राचा जप करीत असतात.

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मन प्रसन्न होवून जाते. भगवान शिवाची आराधना करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्यात तसचं, महाशिवरात्री, आदी प्रसंगी या मंत्राचे पठन मंदिरात सतत सुरु असते.

आपल्या सर्व दुःखाचे निवारण करणारे आपल्या जीवनांत सुख शांती आणि चांगले आरोग्य लाभ देणाऱ्या या महामृत्युंजय मंत्राचे  आपण नियमित पठन करावे. आम्ही देखील खास आपल्यासाठी या लेखाच्या माध्यमातून महामृत्युंजय मंत्राचे लिखाण केलं आहे. तरी, आपण त्यांचे नियमित वाचन करा व इतरांना देखील पाठवा. धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top