Sunday, December 10, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • नोकरी
  • योजना
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

समर्थ रामदासस्वामी रचित मनाचे श्लोक

Manache Shlok

समर्थ रामदासस्वामी रचित मनाचे श्लोक आपण लहानपणापासून म्हणत आलो आहे. सायंकाळी  प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आपण मनाचे श्लोक म्हणत असतो. याचप्रमाणे, अनेक संप्रदायातील शिष्य भिक्षा मागतांना मनाच्या श्लोकांचे पठन करीत असतात.

मानवी जीवनास अनुसरून रचलेले हे श्लोक खुपचं मार्गदर्शनपर आहेत. आज आम्ही देखील समर्थ रामदासस्वामी यांनी मानवी जीवनाला अनुसरून रचलेल्या मनाच्या श्लोकांचे लिखाण केलं आहे. त्याचबरोबर समर्थ रामदासस्वामी यांच्या बद्दल थोडक्यात माहिती देखील नमूद केली आहे.

समर्थ रामदासस्वामी रचित मनाचे श्लोक – Manache Shlok

Manache Shlok
Manache Shlok

श्री मनाचे श्लोक – १ ते २५ (Manache Shlok)

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥

मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥

मना राघवेंवीण आशा नको रे।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
नको रे मना यातना तेचि मोठी॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥

मना वासना चूकवीं येरझारा।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥
मना यातना थोर हे गर्भवासीं।
मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥

मना सज्जना हीत माझें करावें।
रघुनायका दृढ चित्ती धरावें॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥

न बोलें मना राघवेवीण कांहीं।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥

रघुनायकावीण वांया शिणावे।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।
अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥
सुखाची घडी लोटतां सूख आहे।
पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥

पुढील पानावर आणखी श्री मनाचे श्लोक – २६ ते ४५ …

Page 1 of 10
12...10Next
Editorial team

Editorial team

Related Posts

Mantra

श्री गणपति नामावली (गणपतीची 108 नावे)

108 Ganpati Names in Marathi अनेक प्राचीन हिंदू ग्रंथ आणि धर्मग्रंथांमध्ये 108 ही संख्या अनेक वेळा आढळते. सनातन धर्मात 108...

by Editorial team
August 15, 2022
Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics in Marathi
Mantra

“धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची” दत्त गुरूंची प्रदक्षिणा

Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics आपण नेहमी मंदिरात गेल्यानंतर आपली आजी, आई किवा वडीलधारे लोक आपल्याला नेहमी प्रदक्षिणा घालायला सांगतात...

by Editorial team
October 1, 2022
Sada Sarvada Yog Tuza Ghadava Lyrics in Marathi
Mantra

“सदा सर्वदा योग तुझा घडावा” श्लोक

Sada Sarvada Yog Tuza Ghadava Shlok सदा सर्वदा हा श्लोक सर्व श्लोकांमध्ये महत्वपूर्ण आहे हा श्लोक सहसा सर्व आरत्यांच्या शेवटी...

by Editorial team
October 1, 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • नोकरी
  • योजना
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved