Trending
Home / History / मीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास | Minakshi Mandir History In Marathi

मीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास | Minakshi Mandir History In Marathi

Minakshi Mandir – मीनाक्षी अन्नम मंदिर हे एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. जे भारतातील तामिळनाडू राज्यातील मदुराई शहरात वाहणाऱ्या वैणाई नदीच्या किनाऱ्यावर स्थापीत आहे. हे मंदिर माता पार्वतीला समर्पित आहे. पार्वती मातेस मीनाक्षी असेही म्हटले जाते. शिवांना सुन्दरेश्वर नावाने ओळखले जाते. हे मंदिर २५०० वर्ष जुने असून मदुराई शहराचे हृदय मानले जाते. हे तामिळनाडू येथील सर्वात महत्वाचे आकर्षण मानले जाते.

Minakshi Mandir

मीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास – Minakshi Mandir History In Marathi

असे म्हटले जाते कि ह्या मंदिराची स्थापना व निर्माण स्वयं इंद्रदेवानी केली आपल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी ते तीर्थयात्रेस निघाले तेव्हा भगवान शिव आणि पार्वती यांनी त्यांना मार्गदशन केले. तेव्हा या स्थानावर इंद्र्देवांनी एक पवित्र मंदिराची स्थापना केली. येथे दर्शन दिल्यावर भगवान शिव व देवी पार्वती एका शिवलिंग मध्ये विलीन झाले. ह्या लिंगाची स्थापना स्वयं इंद्रदेवानी केली अशी मान्यता आहे. इंद्रदेव नित्यनियमाने लिंगाची पूजा अर्चना करायचे. इंद्र देव कमलपुष्प अर्पित करून शिव पार्वतीस प्रसन्न करायचे.

सेवा दर्शन्शास्त्राचे प्रसिद्ध हिंदू संत धीरुग्ननासम्बदर यांनी या मंदिराचे वर्णन ७ व्या शतकाआधीच केले होते. १५६० मध्ये राजा विश्वनाथ नायक यांनी मंदिरातील अनेक वस्तूंची निर्मिती केली होती. त्यामध्ये वसंत मंडपम,किलीकुंदू मंडपम आणि मीनाक्षी नायकर मंडपम यांचा समावेश आहे.

प्राचीन पांडियन राजा या मंदिराच्या देखरेख व दुरुस्तीसाठी जनतेकडून कर वसुली करत लोक त्यावेळी सोने व चांदीमध्ये आपला कर चुकवत लोकांच्या घरी स्वतः राजा वर्षातून एकदा जावून तांदळाची शिक्षा मांगायचे व जमा धान्य मंदिरास दिले जाई. लोक भावनिक दृष्ट्या ह्या मंदिराशी जुळलेले होते.

या मंदिराच्या वर्तमान स्वरूपास इ.स.१६२३-२५ च्या आसपास बनविले गेले होते. मूळ मंदिराची दुरुस्ती ६ व्या शतकास कुमारी कदम राणीच्या पूत्रांद्वारा केला होता. १४ व्या शतकात यांची मुघलांनी लूटमार केली होती. मंदिरातील मौल्यवान रत्न व दागिने तो सोबत घेवून गेला.

१६ व्या शतकाच्या शेवटी विश्वनाथ नायक द्वारा या मंदिरास पुनर्निर्मित केले गेले. हे मंदिर शिल्प शास्त्रानुसारच बनविले गेले. त्यामुळे भारतातील कलात्मक दृष्ट्या याचे शिल्प सर्वोत्तम मानले जाते.याचे १४ प्रवेशद्वार ४५-५० मीटर उंचीचे आहेत. याचा सर्वात उंच स्तंभ ५१.९ मीटर उंच आहे.मंदिर बाहेरून फारच सुंदर व कलात्मक आहे.

मीनाक्षी अन्नम मंदिरातील उत्सव

मंदिराशी जुळलेला एक महत्वाचा उत्सव येथे साजरा होतो. त्यास “मीनाक्षी थिरूकल्यानम” ( मीनाक्षीचा दिव्य सोहळा ) असे म्हणतात.
स्थानिक लोक प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात ह्या परम दिव्य जोडप्यास सजवून, त्याचे रीतीवत व विधिवत लग्न लावतात. घ्या विवाह प्रथेस लोक आपला विवाह करताना अंगिकारतात. हि प्रथा “मदुराई विवाह प्रथा” म्हणून ओळखली जाते. पुरुषप्रधान विवाह प्रथेस “चिदंबरम विवाह प्रथा” असे म्हणतात. हा शिव पार्वतीचा विवाह सोहळा पाहण्यास शैव आणि वैष्ण व दोन्ही पंथाचे लोक उत्साहाने येतात.

काल्पनिक कथेनुसार या विवाहात देव, देवी, मनुष्य, पाताळवासी व स्वर्गवासी लोक हजर होते. हा पर्व एक महिना चालतो. मोठ्या आनंदाने लोक हा उत्सव साजरा करतात. पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिव अत्यंत सुंदर रुपात देवी मीनाक्षीशी विवाह करण्या हेतू येथे पृथ्वीवर आले होते. देवी मीनाक्षी ने मदुराई राजाच्या पुत्रीच्या रुपात अवतार घेतला होता. देवी मीनाक्षीने शिवांना पती म्हणून स्वीकार केला होता. घोर तपस्या केली होती. प्रसन्न होवून शिवांनी देवी मीनाक्षी सोबत विधिवत लग्न केले.

दर दिवशी २०००० हून अधिक लोक या मंदिरास भेट देतात. विशेषतः शुक्रवारी ३०००० पर्यंत लोक दर्शनासाठी येतात.

वर्षातील महाशिवरात्री येथील लोक मोठ्या आनंदाने साजरी करतात. या मंदिरात एकूण ३३००० मुर्त्या आहेत. “न्यू सेवन वंडर ऑफ द वर्ल्ड” मध्ये या मंदिराचा समावेश आहे.

भारतातील प्रमुख ३० जागेपैकी एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराची ख्याती आहे. दरवषी एप्रिल व मे महिन्यातील मीनाक्षी तीरुकल्यानम महोत्सवात लोक दूर दुरून येतात. यावेळी येथे प्रतिदिन १ लाखापेक्षा लोक दर्शनास येतात.

हे मंदिर भारतातील सर्वात सुंदर व पांरपारिक प्रतिक मानले जाते.

Read Also –

Nalanda History

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी मीनाक्षी अन्नम मंदिर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा मीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास  – Minakshi Mandir History In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट : Minakshi Mandir History – मीनाक्षी अन्नम मंदिर या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराज – Shivaji Maharaj History in Marathi

Shivaji Maharaj History in Marathi भारत देशानं आपल्या हृदयात अनेक विरपुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकांपासुन जतन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *