आईविषयी उत्कृष्ट असा निबंध

Mother Day Speech in Marathi

Mother Day Speech in Marathi
Mother Day Speech in Marathi

आईविषयी उत्कृष्ट असा निबंध – Mother Day Speech in Marathi

म्हणतात ना समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद करून सुध्दा आईच वात्सल्य आणि प्रेम हे शब्दात मांडता येणे अशक्यच, जन्माच्या आधी अपार पीडा सहन करून नऊ महिने जी माऊली आपल्याला पोटात घेऊन आपल्याला सांभाळणारी. आणि आपण पोटात असताना सुध्दा आपल्याला कोणत्या गोष्टीची इजा होऊ नये याकडे लक्ष देणारी आपली आईच असते. आपल्या जन्माच्या वेळी सगळा त्रास सहन करत करत आपली आई एक दिवस आपल्याला जन्म देते, जन्म दिल्यावर हातावरच्या फोडासारखं आपल्याला जपते.

कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासू देत नाही, रात्री लेकराला निवांत झोप लागो म्हणून रात्र भर जागून काळजी घेणारी. लेकराला जर ताप भरला तर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवून लेकरासाठी आपली झोप मोडणारी, तीच लहान बाळाने अंथरुण ओले केल्यावरही त्याला कोरड्या जागी झोपवून आपण त्या ओल्या जागी झोपणारी आईच असते.

जेव्हा घरी एखादी भाकरी कमी पडली तर ती तिला भूक असून सुध्दा भूक नाही असं सांगणारी ती आईच असते. लेकराला जर काहीही इजा झाली तर तीच हृदय भरून येत. लेकराला स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी फक्त आपली आईच असते. लेकराला मांडीवर झोपवणारी आईच असते. जीवनात दुःखाचे अश्रू पुसणारी सुध्दा आईच असते. आणि लेकराने नाव कमावले तरीही मनभरून कौतुक फक्त आईच करते.

माझ लेकरू खूप मोठं होवो असा आशीर्वाद सुध्दा आईच देऊ शकते, लेकरासाठी जीवाचे रान सुध्दा आईच करू शकते. आईवर कितीही लिहिले तरीही थोडेच आहे, असे बरेच प्रॉफेशन आहेत ज्यामध्ये आठवड्यातील सहा दिवस आठ तास काम करून रविवारी सुट्टी मिळते पण आई अशी असते की तिला वर्षातील ३६५ दिवसही कामच असते आणि हो आपण काम करून त्या कामाच्या मोबदल्यात पैसे घेतो पण आई कोणताही मोबदला न घेता फक्त घरच्यांच्या प्रेमासाठी वर्षातील ३६५ दिवस काम करते.

आपल्याला आपली वस्तू एकवेळ मिळणार नाही पण आईला ती वस्तू हमखास माहिती असते, म्हणूनच घरात कधीही आपली वस्तु मिळाली नाही की आईला लगेच आपली हाक जाते. आणि आईला हाक दिल्यावर एका मिनिटा मध्ये ती वस्तू आपल्या हाती असते. आई आपल्या परिवारासाठी तसेच लेकराच्या भलाईसाठी काहीही करायला तयार असते, आणि आपलं सर्व जीवन ती आपल्या परिवारासाठी आणि लेकरांसाठी दान करते.

आईशिवाय घर म्हणजे चांदण्यांशिवाय आकाश होय, ती घरी नसेल तर आपल्याला सर्व घर खायला उठत तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आईशिवाय घराला घरपण लाभत नाही. म्हणून जीवनात आईला फक्त Mother Day पुरते आठवण न करता प्रत्येक दिवस हा Mothers Day म्हणून साजरा करा. तिला वेळ द्या तिच्याजवळ बसुन गप्पा करा, तिला घरकाम करण्यासाठी कोणते वेतन तर मिळत नाही ना मग त्या वेतनाच्या मोबदल्यात थोडस प्रेमाने बोलून पहा, तिलाही बरं वाटेल,

वेळ जाण्याच्या आधी त्या गोष्टींचं महत्व समजून घेणे आवश्यक असते. कारण प्रत्येकाला आईच प्रेम मिळत नाही, आपल्याला आईच प्रेम मिळतंय आपण खूप भाग्यवान आहात. म्हणून आईला कधीही दुखुवू नका आणि तुमच्या जीवनात तिचे किती महत्व आहे हे तिला नेहमी सांगत राहा, कारण आईला लेकरच्या प्रेमाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट पाहिजे नसते.

आशा करतो आईविषयी लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल, आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्याला मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top