देव पण त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करतात. एक उत्साहवर्धक स्टोरी

Marathi Bodh Katha

आपण “मांझी द माऊंटन मॅन” हा दशरथ मांझी यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट होता, त्यामध्ये एक बेस्ट डायलॉग आपल्याला पाहायला मिळाला होता, तो म्हणजे

“भगवान के भरोसे ना बैठो क्या पता भगवान आपके भरोसे बैठा हो”

म्हणजेच देव सुध्दा त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतात. तर आज आपण अश्याच प्रकारची एक प्रेरणा देणारी स्टोरी पाहणार आहोत जी जीवनात स्वतः कोणावर अवलंबून न राहता प्रयत्न करत राहू शकणार. आशा करतो आपल्याला मोटिवेशनल स्टोरी आवडणार, तर चला पाहूया एक प्रेरणा देणारी स्टोरी.

मराठी प्रेरणादायी बोधकथा – Motivational Story in Marathi

Motivational Story in Marathi
Motivational Story in Marathi

समुद्र किनारी एक गाव होते, त्या गावात एक श्यामलाल नावाची व्यक्ती राहत असे, दररोज पूजा पाठ करणे, देवाला अंघोळ घालणे, व्रत वैकल्य करणे, या सर्व गोष्टी श्यामलाल करत असे. त्याची देवावर नितांत श्रध्दा आणि विश्वास होता. तो एक दिवस सुध्दा देवाची पूजा अर्चना चुकवत नसे. दररोज नित्यनेमाने देवाला पूजत असे.

एक दिवस समुद्रात जोराचे वादळ आले आणि त्या वादळात जोराचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला पावसाची तीव्रता कमी होती, पण पावसाची धार सतत पडत होती. आणि त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. लोकांच्या घरात पाण्याने प्रवेश करणे सुरू केले होते, लोक स्वतःला वाचविण्यासाठी धडपड करत सैरावैरा मदतीसाठी धावत होते.

पाण्याचा स्थर वाढल्यानंतर लोकांना वाचविण्यासाठी रेस्क्यु टीम आली आणि लोकांना वाचवू लागली, बरेच लोक रेस्क्यु टीम च्या सोबत सुरक्षित ठिकाणी जात होते. रेस्क्यु टीम श्यामलाल जवळ सुध्दा गेली पण श्यामलाल म्हणाला,

“मला तुमची काही गरज नाही मला तर माझा देव वाचवणार”

आणि तो तिथेच राहिला आणि रेस्क्यु टीम पुढे निघून गेली. पाण्याचा स्थर वाढतच होता. आता पाणी त्याच्या घराच्या पूर्ण भागात पसरल्या मुळे तो त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला, तेव्हा ही त्याच्या जवळ एक नाव आली ज्यामध्ये काही लोक जात होते त्यांनी श्यामलाल ला म्हंटले की चला या नावेत बसून सुरक्षित ठिकाणी जाऊया तेव्हा श्यामलाल पुन्हा म्हणाला की,

“मला नावेची गरज नाही, मला तर माझा देव वाचवणार आहे”

आणि हे शब्द ऐकून नावेतील व्यक्तींनी आपली नाव पुढे घेतली आणि तेथून निघून गेले. पाण्याचा स्थर वाढतच होता, आता पाणी श्यामलाल च्या वरच्या मजल्यावर सुध्दा पोहचले होते, हे पाहून श्यामलाल घराच्या वरच्या छतावर जाऊन बसतो, तेव्हा त्या भागात लोकांना वाचविण्यासाठी एक हेलिकॉप्टर येते आणि त्या हेलिकॉप्टर मधील रेस्क्यू टीम श्यामलाल ला म्हणते की हेलिकॉप्टर मध्ये येऊन जा तुझा जीव वाचून जाईल. पण तरीही या सर्व गोष्टींना टाळून श्यामलाल त्यांना म्हणतो

“मला तुमची गरज नाही मला तर देव येणार वाचवायला”

हे शब्द ऐकून हेलिकॉप्टर सुध्दा तेथून निघून जाते. सगळ्यांच्या मदतीला श्यामलाल हुसकावून लावतो आणि शेवटी पाण्याचा स्थर एवढा वाढतो की श्यामलाल त्या पाण्यात बुडतो आणि मरण पावतो. मरण पावल्या नंतर श्यामलाल देवाजवळ पोहचतो. आणि रागारागाने देवाला म्हणतो की मी तुझ्यावर किती विश्वास केला, किती पूजा अर्चना केली, व्रत वैकल्य केले. पण तू मला वाचवायला आला नाही. मला मरायला तेथे सोडलं. पण तू काही वाचवायला आला नाही.

तेव्हा देव त्याला म्हणतो तुला काय वाटते तुझ्या जवळ जहाज हेलिकॉप्टर कोणी पाठवले होते. मी तर तुला वाचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पण तूच माझी मदत ओळखु शकला नाही,आणि तिथेच मरण पावला. माझ्यावर या प्रमाणे विश्वास करणे योग्य नाही आहे, माझ्यावर विश्वास करण्या अगोदर तुला स्वतःवर विश्वास असायला हवा होता आणि माझी मदत ओळखता यायला हवी होती. कारण मी त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतात.

तर मित्रहो, या गोष्टीवरून आपल्याला एक शिकवण मिळते की देव सुध्दा त्यांचीच मदत करतो जे स्वतःचही मदत करतात, म्हणजे आपल्यामध्येच देव आहे फक्त आपण ओळखायला हवे, तर संकटकाळात न घाबरता त्या संकटाला तोंड देण्यासाठी नेहमी तयार रहा देव सुध्दा आपल्या सोबत असेल.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेली ही छोटीशी बोधकथा आवडली असेल आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आवडल्यास या स्टोरी ला आपल्या मित्रांना शर्यत करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी तसेच स्टोरींसाठी जुळलेले रहा, माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here