नैवद्यम मंत्र  – Naivedyam Mantra

Naivedyam Mantra

आज आपण या लेखातून देवी देवतांना नैवद्य अर्पण करतांना म्हटल्या जाणाऱ्या नैवद्यम मंत्राचे लिखाण करणार आहोत तसचं, त्याबाबत थोडक्यात माहिती देखील जाणून घेणार आहोत.

नैवद्यम मंत्र  – Naivedyam Mantra

Naivedyam Mantra
Naivedyam Mantra

नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं में ह्यचलां कुरु ।

ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।।

शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च ।

आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।

 (2) वैदिक मन्त्र

ॐ नाभ्या आसीदन्तरीक्षँ शीर्ष्णो द्यौ: समवर्तत ।

पद्भ्यां भूमिर्दिश: श्रोत्रातथा लोकाँ अकल्पयन् ।।

ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा ।

ॐ समानाय स्वाहा ।

ॐ उदानाय स्वाहा ।

ॐ व्यानाय स्वाहा । नैवेद्यं समर्पयामि

मित्रांनो, आपण आपल्या पूर्वजांपासून शिकत आलो आहे की, घरात कुठलाही नवीन पदार्थ बनवला की प्रथम तो नैवद्य म्हणून देवाला अर्पण केला पाहिजे. देवाला नैवद्य अर्पण करण्याची ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आली आहे.

देवाला नैवद्य अर्पण करतांना नेहमी हात जोडून श्लोक किंवा मंत्राचे उच्चारण केलं पाहिजे. देवाला नैवद्य अर्पण करण्यामागे लोकांची अशी धारणा आहे की, जी माणसे देवाला नैवद्य दाखवत नाहीत त्यांचा राक्षस योनीत जन्म होतो.

तसचं, त्यांना जीवनांत अनेक प्रकारच्या संकटाना सामोरे जावे लागते.  देवाला नैवद्य अर्पण करण्याच्या अनेक पद्धती आपल्या ग्रंथांतून सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार,  आपण नैवद्य हा आहुतीच्या स्वरुपात किंवा तांब्याच्या पात्रात वाढून देवाला अर्पण करत असतो. मंदिरात गेल्यास आपणास या गोष्टीची अनुभूती येईल.

भगवंताला नैवद्य अर्पण करण्याचे अनन्य साधारण महत्व असल्याने आपण नियमित नैवद्य अर्पण केला पाहिजे. कुठल्याही शुभ प्रसंगी आपण प्रथम देवाची आराधना करून आरतीचे पठन केल्यानंतर स्वच्छ तांब्याच्या पत्रात नैवद्य ठेवून देवाला अर्पण केले पाहिजे आणि त्या पत्राच्या गोलाकार चंचुपात्राच्या साह्याने पाणी फिरवले पाहिजे. यानंतर हात जोडून नैवद्य मंत्राचे पठन केले पाहिजे.

असे करण्याबाबत लोकांची मान्यता आहे की, असे केल्याने आपला नैवद्य देवाला पावन होतो. त्याचप्रमाणे देवाने आपल्या हातचे अन्न ग्रहण केल्याचे आपल्याला पुण्य देखील लाभते. हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक देवी देवतांना विशेष अश्या अन्न पदार्थांचे नैवद्य अर्पण केले पाहिजात. जसे की, भगवान कृष्ण यांना दही दुध लोणी या सारखे पदार्थ आवडत असल्याने त्यांना त्यांच्या आवडीच्या पदार्थाचा भोग चढवला पाहिजे.

हिंदू धार्मिक देवी देवतांच्या मंदिरात गेल्यास आपणास वेगवेगळ्या देवी देवतांच्या मंदिरात त्यांच्या आवडीच्या पदार्थ नैवद्य म्हणून अर्पण केलेले दिसतील. हिंदू धार्मिक प्रथेनुसार, हिंदू धार्मिक बांधव आपल्या घरी स्वयंपाक बनवताना प्रथम अग्नी देवाला नैवद्य अर्पण करण्यासाठी चुलीच्या अग्नीत पोळी ठेवत असत तसचं आपण ठेवलेले अन्न देवाला पावन झाले पाहिएज याकरिता ते नैवद्यम मंत्राचे उच्चारण करित असतात.

असे करण्यामागे त्यांचा उद्देश हा असतो की, ज्या अग्निदेवाच्या साह्याने आपण आपले अन्न शिजवतो त्या अग्निदेवाची जठर अग्नी तुप्त झाली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण आपल्या देवघरातील देवाला आपण बनवलेल्या अन्नाचा नैवद्य म्हणून भोग लावतो. असे केल्याने अन्न देवता आपल्यावर प्रसन्न राहून आपल्या घरी कधीच दारिद्र्यता येवू  नाही.

देवाला नैवद्य अर्पण करण्याच्या अनेक पद्धती आपल्या ग्रंथांत दिल्या आहेत. त्यानुसार भाविक आपआपल्या प्रथेनुसार देवी देवतांना नैवद्य अर्पण करीत असतात. वैदिक काळापासून चालत आलेली ही परंपरा आज देखील जोपासली जाते. देवी देवतांना नैवद्य अर्पण करण्यासोबत सर्वात महत्वाची बाब असते ती म्हणजे नैवद्य मंत्राचे उच्चारण  करणे.

मित्रांनो, वरील लेखातून नैवद्यम आरतीचे महत्व जाणून घेऊन आपण सुद्धा नियमित या नैवद्यम मंत्राचे पठन करीत जा.

1 thought on “नैवद्यम मंत्र  – Naivedyam Mantra”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top