नवनाग स्तोत्र

Navnag stotra

हिंदू धर्मामध्ये नागाला देवता मानलं जाते. तसचं, नागपंचमीच्या दिवशी त्यांची मनोभावे पूजा सुद्धा केली जाते. शेतकरी तर त्यांना आपले प्रिय मित्र मानतात. कारण, (साप) नाग हे शेतात बीळ करून राहतात. त्यामुळे ते शेतात राहून उंदरांकडून होणाऱ्या धान्याच्या नासाडीपासून ते एकाप्रकारे शेतकऱ्यांची मदत करतात. म्हणून त्यांना शेतकऱ्यांचे मित्र मानले जाते.

आपल्या पुराणात देखील नागाला विशेष महत्व देण्यात आलं आहे. कारण, नाग हा भगवान शंकर यांच्या गळ्यातील महत्वाचा दागिना आहे. तर, भगवान विष्णू यांचे आसन म्हणून भगवान विष्णू शेष नागदेवतेवर विराजमान झाले आहेत.

याप्रमाणे, आपण आपले पौराणिक ग्रंथ वाचल्यास आपणास नागदेवते संबंधी अनेक दंत कथा आणि त्यांचे महत्व समजेल. मित्रांनो, आज आपण या लेखांच्या माध्यमातून नाग देवातीचे आराधना करण्यासाठी म्हणण्यात येत असलेल्या नवनाग स्तोत्राचे लिखाण करणार आहोत. तसचं, हे नवनाग स्तोत्र पठन केल्याने मिळणाऱ्या लाभाचे महत्व समजून घेणार आहोत. जेणेकरून आपणास देखील या नवनाग स्तोत्राचे पठन करण्याचा लाभ मिळावा.

नवनाग स्तोत्र – Navnag stotra

Navnag stotra
Navnag stotra

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं

शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा

एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं

सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः

तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत

ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll

~~*~~~*~~~*~~~*~~~

॥ नाग गायत्री मंत्र ॥

~~~~~~~~~~~

ॐ नव कुलाय विध्महे विषदन्ताय धी माहि

तन्नो सर्प प्रचोदयात ll

 मित्रांनो, आपल्या धार्मिक पुराणामध्ये नवनाग स्तोत्र मंत्राची रचना करण्यात आली आहे. ज्यामध्ये नागदेवतेची स्तुती करण्यात आली आहे. तसचं, या नवनाग स्तोत्राचे पठन केल्याने होणाऱ्या लाभाचे वर्णन देखील केलं गेल आहे. या स्तोत्रामध्ये एकूण नऊ महत्वपूर्ण नाग देवतांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे.

पद्मनाभ, अनंत, वासुकी, शंखपाल, शेष, कम्बल, धुतराष्ट्र, तक्षक आणि कालिया नाग, अश्या प्रकारे एकूण नऊ नाग देवतेच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. भाविकाने या स्तोत्राचे मनोभावे पठन केल्यास आपल्या मनातील नाग देवतेसंबंधी असलेली भीती नाहीशी होते.

ज्योतिष शास्त्रात देखील नवनाग स्तोत्र पठन करण्यास विशेष महत्व देण्यात आलं आहे. भारतीय इतिहासानुसार, इ.स. पू. ३००० साली आर्य कालखंडा दरम्यान भारतात नागवंशाच्या जमाती वास्तव्य करीत असल्याची ऐतिहासिक माहिती देखील मिळते. तसचं, त्यांची इष्ट देवता हे नाग होते.

याच कारणामुळे प्रमुख नाग देवतेच्या नावावर विभिन्न प्रकारच्या नाग देवतेचे नामकरण करण्यात आलं आहे. या नागदेवातांच्या नावरून ते वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणीची ऐतिहासिक माहिती मिळते.

धार्मिक पुराणानुसार पूर्वी कश्मीर येथे कश्यप ऋषी राज्य करीत होते. कश्यप ऋषीं यांची पत्नी कद्रू यांच्याकडून त्यांना आठ पुत्र रत्न प्राप्त झाले होते. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक,पद्म, महापद्म, शंख, आणि कुलिक इत्यादी. तसचं, कश्मीर येथील अनंतनाग हे स्थळ पूर्वी अनंतनाग समुदायाचे वास्तव्याचे ठिकाण होते.

अश्या प्रकारे कश्मीर येथील इतर भागात विविध समुदायाचे वास्तव्य होते. नागवंशीय समुदाया धर्म हा खूप प्राचीन वंश असून अश्या स्वरुपात त्याबाबत ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे.

नवनाग स्तोत्राचा जाप केल्याने होतात हे फायदे – Navnag Stotra Benefits

याचप्रमाणे, नवनाग स्तोत्राबाबत ज्योतिष शास्त्राची अशी मान्यता आहे की, या स्तोत्राचे पठन केल्याने आपल्या राशीत असलेला कालसर्प योग नष्ट होतो. ज्योतिष शास्त्रात वर्णिल्याप्रमाणे जेंव्हा सर्व ग्रह राहू आणि केतू या ग्रहांच्या मध्यभागी येतात तेंव्हा कालसर्प दोषाची बाधा उत्पन्न होत असते. त्यामुळे आपले कोणतेच काम सुरळीत होत नाहीत.

तसचं, आपल्याला जीवनांत अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. परिणामी,  ज्योतिषकार आपणास नवनाग स्तोत्राचे पठन करण्याचा सल्ला देतात. नवनाग स्तोत्राचे पठन करण्याचे अनन्य साधारण महत्व असून आपण नियमित त्याचे पठन केलं पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here