पद्मनाभस्वामी मंदिर

Sree Padmanabhaswamy Mandir Mahiti

आपल्या भारत देशात अनेक मंदीरं आहेत, प्रत्येक राज्याच्या मंदीरांची ओळखही वेगळी बघायला मिळते त्या मंदीरांची ठेवण, तिथल्या मुर्ती, तिथल्या पुजाअर्चना, पध्दती, या त्या त्या प्रांतानुसार आपल्याला पहायला मिळतात शिवाय भाषेचा संस्कृतीचा देखील एक पगडा त्या भागात बघायला मिळतो.

केरळातील मंदीरे देखील आपल्या विशेष स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहेत.

केरळात असंख्य मंदीरे आहेत, त्यांची कारागिरी त्यांची निर्मीती त्या मंदीरांना एक सन्मान मिळवणारी आहे, तसेच प्रत्येक मंदीराची आपली एक कहाणी देखील आहे.

तिरूवनंतपुरम येथील पद्मनाभ मंदीर (Padmanabhaswamy Temple) देखील एक असेच मंदीर आहे, लाखो भाविक या मंदीराला बघण्याकरता दरवर्षी आकर्षीत होतात.

भारतातील सगळयात जुन्या मंदीरांपैकी हे एक मंदीर आहे आणि विशेष म्हणजे सर्वात श्रीमंत मंदीरांपैकी हे एक मंदीर आहे.

“पुरातन काळातील अद्भुत मंदिरांपैकी एक पद्मनाभस्वामी मंदिर” – Sree Padmanabhaswamy Temple Information in Marathi

Padmanabhaswamy Temple

पद्मनाभस्वामी मंदिराची माहिती – Padmanabhaswamy Temple Story

पद्मनाभस्वामी मंदीर भारतातील केरळ राज्यात तिरूवनंतपुरम इथं स्थित आहे या मंदीराच्या निर्माणात बऱ्याच शैलींचा उपयोग केल्याचे आपल्याला आढळते.

मंदीराच्या निर्माणात केरळची स्वतःची पारंपारीक शैली आणि द्रविड शैलीचा संयुक्त पणे वापर झाल्याचं आपल्याला दिसतं.

तामिळनाडु पासुन जवळ असुन १६ व्या शतकात बनलेल्या या मंदीराच्या भिंती उंचच उंच असुन मनाला मोहीत करतात. अशीच कला अनंतपुरम मंदीरात देखील बघायला मिळते हे आदिकेश्वा पेरूमल मंदीर कन्याकुमारीत असुन जगातील सर्वात श्रीमंत मंदीरापैकी एक मंदीर आहे.

अपार धनसंपत्ती सोने चांदी हिरे माणके यामुळे या मंदीराने इतिहासात नाव कोरलय.

मंदीराच्या गर्भगृहात भगवान विष्णुंची विशाल मुर्ती आहे. भगवान विष्णु शेषनागावर विराजमान आहेत.

इथं भगवान पद्मनाभस्वामी त्रावणकोरच्या राजपरीवाराचे शासक होते, त्या वेळचे शासक त्रावणकोर चे महाराज मूलं थिरूनल रोम वर्मा मंदीराचे सेवक आणि ट्रस्टी होते.

या मंदीरात फक्त हिंदुनाच प्रवेश मिळतो आणि त्या करता विशेष वेशभुषा करावी लागते.

पद्मनाभस्वामी मंदीराचा इतिहास – Padmanabhaswamy Temple History

पद्मनाभस्वामी मंदीरात ब्रम्ह पुराण, मत्स्य पुराण, वराह पुराण, स्कन्द पुराण, वायु पुराण, भागवत पुराण आणि महाभारताचा उल्लेख सापडतो.

इतिहासकार याला स्वर्ण मंदीर म्हणतात. अद्भुत आणि अविश्वसनीय संपत्तीकरता हे मंदीर नेहमीच चर्चेत असतं.

इ.स ९ मधील तामीळ साहित्य आणि कविता तसेच संतक वी नाम्माल्वर यांच्या नुसार मंदीरातील तसेच शहरात सोन्याच्या भिंती आहेत.

ही ठिकाणं, मंदीर, आसपासचा परिसर पाहुन स्वर्गात आल्याचा भास होतो.

ई. स. ६ आणि ९  मधल्या तामिळ साहित्य आणि सिध्दांतात आढळलेल्या उल्लेखाप्रमाणे हे मंदीर प्रमुख १०८ मंदीरांपैकी एक आहे आणि इथल्या एकुण व्यवस्थेला बघता आपण चकीत होतो.

या मंदीराची महिमा मलाई नाडु येथील १३ धार्मिक स्थळामधुन एक आहे.

इ.सन ८ मधे होऊन गेलेले संत कवी नाम्माल्वर पद्मनाभाची स्तुती गायचे.

अन्न्तपुरम मंदीर कासरगोड यांचा विश्वास मंदीरातील मुळस्थानी होता.

अनंथापुरम मंदीराजवळ राहाणारे पंडीत विल्वामंगालात्हू स्वमियर यांनी कासरगोड जिल्हयात भगवान विष्णुची खुप प्रार्थना केली आणि त्यांचे दर्शन प्राप्त केले.

त्यांनी सांगीतले की भगवान विष्णु छोटया नटखट बालक रूपात आले होते त्यांनी मुर्ती दुषीत केली यामुळे मंदीरातील पंडीत रागावले आणि त्यांनी त्या बालकाचा पाठलाग केला परंतु बालक अदुश्य झाले.

खुप शोधल्यानंतर जेव्हां ते अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांनी पुलाया महीलेचा आवाज ऐकला ती आपल्या पुत्राला म्हणत होती की ती त्याला अनंथान्कदुत फेकुन देईल.

त्या क्षणी पंडीतांनी अनंथान्कदु हे शब्द ऐकताच ते आनंदीत झाले त्यानंतर त्यांनी त्या स्त्रीशी बोलुन अनंथान्कदु कडे प्रस्थान केले.

तिथे पोहोचल्यानंतर त्या बालकाचा ते शोध घेवू लागले त्यांनी पाहीले की तो बालक इलुप्पा वृक्षात अंतर्धान पावला.

Padmanabhaswamy Temple Story

त्यानंतर तो वृक्ष उन्मळुन पडला आणि त्या ठिकाणी अनंता सयाना ची मुर्ती तयार झाली परंतु ती मुर्ती आवश्यकतेपेक्षा खुप मोठी बनली जीचे शीर थिरूवाल्लोम इथं, नाभी तिरुअनंतपुरम इथं, आणि चरणकमल थ्रिप्पदापुरम मधे.

याची लांबी १२ किलोमिटर इतकी झाली हे पाहता पंडीतांनी भगवान विष्णुंना प्रार्थना केली आणि त्यांना आपले रूप लहान करण्याची विनंती केली.

त्या क्षणी भगवंतांनी स्वतःला तिन पट लहान करून घेतलं.

सध्या वर्तमानस्थितीत जी मुर्ती विराजीत आहे ते हेच रूप आहे.

परंतु भगवंत पुर्ण दिसत नव्हते कारण इलुप्पा वृक्षाची आडकाठी येत होती.

पंडीतांनी भगवंतांना थिरूमुक्हम, थिरूवुदल आणि थ्रिप्पदम या तीनही भागांना पाहिलं त्यांनी पद्मनाभ भगवंताना क्षमा मागितली, त्यांनी राइस कांजी आणि उप्पुमंगा खोबऱ्याच्या कवचाच्या आत पुलाया महिलेकडुन प्राप्त करून भगवंतांना अर्पण केले.

ज्या स्थळी भगवंतांनी गुरूजींना दर्शन दिले ते स्थान कुपक्कारा पोट्ठी आणि करूवा पोट्ठी शी संबंधीत आहे.

त्या वेळी तीथे शासन करत असलेल्या राजांनी आणि तिथल्या ब्राम्हणांनी सोबत मिळुन मंदीराचे निर्माण कार्य केले.

पद्मनाभस्वामी मंदीराच्या उत्तर पश्चिमी भागात अनंथान्कदु नागराजा मंदीर आहे.

स्वामींची समाधी पद्मनाभ मंदीराच्या बाहेर पश्चिमेला स्थित आहे.

समाधीच्या वरती कृष्ण मंदीर बनलेले आहे. हे मंदीर विल्वामंगलम श्री कृष्ण स्वामींच नावाने ओळखले जाते जे थ्रिस्सुर नादुविल मधोम शी संबंधीत आहे.

पद्मनाभ मंदीरासंबंधीत काही आश्चर्यकारक गोष्टी – Facts About Padmanabhaswamy Temple

  • शाही मुकुट मंदीरात ठेवला आहे – Royal Crown In Temple

भगवान विष्णु इथले प्रमुख देव आहेत तसेच पद्मनाभस्वामी मंदीराचे आणि त्रवंकोरे चे शासक सुध्दा.

हा मुगुट इ.स १८ मधल्या त्रवंकोरे राजा चा आहे आणि शाही परिवारातील सदस्य त्यांच्या वतीने राज्यकारभार करतायेत.

हा मुकुट नेहमी त्रवंकोरे मंदीरात सुरक्षित असतो.

  • मंदिराची शैली – Temple Structure

या मंदीराचे निर्माण संमिश्र आहे द्रविड आणि केरळ शैली यात आपल्याला बघायला मिळते.

आपण व्यवस्थित बघितल्यास आपल्या लक्षात येतं की केरळातील कुठलेही मंदीर याइतके मोठे नाही बऱ्याचशा मंदीराचे छत उतरते आहे यांच्या बऱ्याच आख्यायिका देखील ऐकायला मिळतात.

या भागातील बरेच मंदीरं पद्मनाभ मंदीराच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या द्रविड शैली पासुन प्रभावित झालेले बघायला मिळतात.

बरेच मंदीर जवळच्या तामिळनाडु राज्या पासुनही प्रभावीत आहेत.

  • मंदिराची संपत्ती – Temple Property

बऱ्याच काळापासुन मंदीरात नृत्य चालत आले आहे, यामुळे कुणाच्या ही मदतीशिवाय मंदीराची संपत्ती दुसऱ्या कुणापेक्षाही सगळयात जास्त आहे.

२०११ साली या मंदीरातील तळघर उघडण्यात आले तेव्हां इतके धन सापडले की हे मंदीर जगातील सगळयात श्रीमंत मंदीर बनले.

या आधी मुगल खजाना जो सापडला होता तो ९० बिलीयन डॉलर हा सगळयात जास्त होता.

  • लक्षा दिपम उत्सव – Laksh Deepam Festival

लक्षा दिपम उत्सव हा उत्सव दर सहा वर्षांनी मंदीरात साजरा होतो हा या मंदीराचा सगळयात मोठा उत्सव असतो.

या उत्सवात मंदीरात हजारो लाखे दिवे लावले जातात. हा उत्सव मकर संक्रांतीला साजरा होतो.

अन्न धान्य खुप असल्याचे संकेत हा उत्सव देतो या दिवशी पद्मनाभ नरसिंह आणि कृष्णाच्या प्रतिमांना खुप सजवुन विशाल शोभा यात्रा या परिसरातुन निघते.

तर ह्या होत्या काही महत्वपूर्ण गोष्टी ज्या इतिहासात होऊन गेल्यात अश्याच नवनवीन गोष्टीसाठी माझी मराठी शी जुळलेले रहा,

जर हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top