मनोवांचीत फळाची पूर्तता करणारा “भगवान परशुराम मंत्र”

Parshuram Mantra

हिंदू धार्मिक वेद ग्रंथांमध्ये अनेक मंत्राचे लिखाण करण्यात आलं आहे. त्यामुळे या मंत्रांचे विशेष महत्व असून हिंदू धार्मिक बांधव या मंत्राचे नियमित पठन करत असतात. हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार ३३ कोटी देवी देवता असून प्रत्येक देवतांची आराधना करण्यासाठी विशेष मंत्राचे लिखाण करण्यात आलं आहे. त्यामुळे आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून भगवान परशुराम यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या परशुराम मंत्राचे लिखाण करणार आहोत.

मनोवांचीत फळाची पूर्तता करणारा “भगवान परशुराम मंत्र” – Parshuram Mantra

Parshuram Mantra
Parshuram Mantra

कराभ्यां परशुं चापं दधानं रेणुकात्मजं ।

दग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकं ॥१॥
नमामि भार्गवं रामं रेणुका चित्तनन्दनं ।

मोचितंबार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनम् ॥२॥

भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम् ।

गतगर्वप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम् ॥३॥

वशीकृतमहादेवं दृप्त भूप कुलान्तकम् ।

तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम् ॥४॥

परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनुः ।

रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम् ॥५॥

शुद्धं बुद्धं महाप्रज्ञापण्डितं रणपण्डितं ।

रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनम् ॥६॥

मार्गणाशोषिताभ्ध्यंशं पावनं चिरजीवनम् ।

य एतानि जपेन्द्रामनामानि स कृति भवेत् ॥७॥

॥ इति श्री प. श्री वासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्री परशुराम स्तोत्रं संपूर्णम् ॥

भगवान परशुरामाची कथा – Parshuram Story

भगवान परशुराम हे एक महान शिव भक्त आणि भगवान विष्णू यांचा सहावा अवतार होते. त्यांच्या जन्माबाबत अशी आख्यायिका आहे की, भगवान परशुराम यांचा जन्म वडिल ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय तृतीयेला) झाला होता. भगवान परशुराम यांनी आपल्या वडिलांकडून वेदांचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर भगवान महादेव यांची आराधना करण्यासाठी ते गंधमादन पर्वतावर गेले. त्याठिकाणी त्यांनी कठोर तपश्चर्या केली व भगवान शिव यांना प्रसन्न करून घेतले. भगवान महादेव यांनी त्यांना शास्त्र विद्येचे ज्ञान दिले व आपल्या जवळील परशु हे शास्त्र भेट दिले.

भगवान परशुराम मुळात ब्राह्मण ऋषी असल्यावर सुद्धा त्यांच्या अंगात सर्व क्षेत्रीय गुण होते, म्हणूनच त्यांना शरादपि शापादपि असे म्हणतात. भगवान महादेव यांच्याकडून शस्त्र विद्येचे ज्ञान घेतल्यानंतर त्यांनी त्या शक्तीच्या बळावर दुष्ट आणि प्रजेला त्रास देणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. तसचं, सहस्त्रार्जुनाला ठार मारले. भगवान परशुराम यांनी अनेक राजांना पराभूत करून त्यांची जमीन बळकावली व ती जमीन त्यांनी ऋषिकुलाला भेट दिली.यानंतर ते महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी गेले.

पुराणात वर्णिल्या कथेनुसार, चित्ररथ गंधर्वला पाहून माता रेणुका यांचे मन विचलित झाले. त्यामुळे ऋषी जमदग्नी यांना राग अनावर झाला. त्यांनी आपल्या पाची पुत्रांना माता रेणुका यांचा वध करण्याची आज्ञा दिली. त्यावेळी केवळ पुत्र परशुराम यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञाचे पालन करतांना माता रेणुका यांचा शिरच्छेद केला.

जमदग्नी पुत्र परशुराम यांच्या कर्तुत्वाने संतुष्ट झाले. त्यांनी पुत्र परशुराम यांना वर मागण्यास सांगितला, तेव्हा त्यांनी आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्याचा वर मागितला. अश्या तऱ्हेने माता रेणुका पुन्हा जिवंत झाल्या.

अश्या प्रकारच्या अनेक कथा भगवान परशुराम यांच्या बाबतीत पुराणात कथन केल्या आहेत. सहस्त्रार्जुन यांचा वध केल्यामुळे आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी त्यांनी सर्व तीर्थ स्थळी तपश्चर्या केली.

भगवान गणेश यांचे एकदंत हे नाव भगवान परशुराम यांच्यामुळेच पडले आहे. याचप्रकारे ते एक महान दानशूर व्यक्ती सुद्धा होते. भगवान परशुराम यांच्या दानशूरते बद्दल सांगायचं म्हणजे ऐक वेळेस त्यांनी ऋषी कश्यप यांना पूर्ण पृथ्वी दान दिली होती. त्यांच्या शिष्यत्वाचा लाभ केवळ दानवीर कर्णचं घेऊ शकले. भगवान परशुराम यांच्याकडून ब्रह्मास्त्राची विद्या ग्रहण करणारे कर्ण हे एकमेव शिष्य होते.

अश्या या महान पराक्रमी शिव भक्ताची आराधना केल्याने तसचं, वेदांमध्ये लिखित परशुराम मंत्राचे नियमित पठन केल्याने आपणास त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. तसचं, आपल्या धन, संपत्ती, जमीन, ज्ञान, इच्छित सिद्धी, दारिद्र्य, विवाह यासारख्या जीवनावश्यक गोष्टीचा आपणास लाभ मिळू शकतो.

भगवान परशुराम मंत्राचे पठन करण्याबाबत अश्या प्रकारच्या मान्यता असून ते नियमित या मंत्राचे पठन करीत असतात. आपण सुद्धा या लेखात लिखाण करण्यात आलेल्या भगवान परशुराम मंत्राचे पठन करून आपले मनोइच्छित फळाची पूर्तता करून घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top