भगवान पार्श्वनाथ यांची आराधना करण्यासाठी पार्श्वनाथ स्तोत्र

Parshwanath Stotra

हिंदू धर्मात ज्याप्रमाणे देवी देवतांची आराधना करण्यासाठी मंत्र उच्चारण करण्यास विशेष महत्व दिल आहे. त्याप्रमाणे जैन धर्मात स्तोत्राचे पठन करण्यास विशेष महत्व देण्यात आलं आहे.

जैन ग्रंथांनुसार जैन धर्मात एकूण २४ तीर्थकर झाले आहेत. जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांच्यापासून चालत आलेली तीर्थाकाराची प्रथा भगवान महावीर यांच्या कारकीर्दीपर्यंत जोपासली गेली आहे. या सर्व तीर्थकारांनी आपल्या कारकिर्दीत देशांतील जन सामान्यांच्या मनात जैन समुदायाची शिकवण रुजवण्याचे महत्वपूर्ण काम केलं.

कलयुगी जीवन जगतांना जैन तीर्थकारांनी दिलेली शिकवण खूप फायदेशीर असून आपण तिचा अंगीकार केला पाहिजे. आज आपण या लेखात जैन धर्मियांचे २३ वे तीर्थकर भगवान पार्श्वनाथ यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या पार्श्वनाथ स्तोत्राचे लिखाण करणार आहोत.

भगवान पार्श्वनाथ यांची आराधना करण्यासाठी पार्श्वनाथ स्तोत्र – Parshwanath Stotra

Parshwanath Stotra
Parshwanath Stotra

|| पार्श्वनाथ स्तोत्र ||

नरेन्द्रं फणीन्द्रं सुरेन्द्रं अधीशं,

शतेन्द्रं सुपुजै भजैनाय शीशं।

मुनिन्द्रं गणेन्द्रं नमो जोडे हाथंम्,

नमो देव देवंम् सदा पार्श्वनाथं॥1॥

गजेन्द्रं मृगेन्द्रं गह्यों तु छुडावे,

महा आगतै नागतैतु बचावे।

महावीरतै युद्ध मैं तु जितावे,

महा रोगतै बंधतै तु छुडावे॥2॥

दुःखी दुःखहर्ता सुखी सुखकर्ता,

सदा सेवको कोमहा नन्द भर्ता।

हरे यक्ष रक्षस् भूत पिशांचं,

विषम डकिनीविघ्न के भय अवाचं॥3॥

दरिद्री निकोद्र विके दान दिने,

अपुत्रीन को तुभले पुत्र कीने।

महासंकटो से निकारे विधाता,

सबे सम्पदा सर्वको देहि दाता॥4॥

महाचोर को वज्र को भय निवारे,

महापौन के पुंजतै तु उबारे।

महाक्रोध की अग्नि को मेघधारा,

महालोभ शैलेशको वज्र भारा॥5॥

महामोह अंधेर को ग्यान भानं,

महा कर्म कांतार को धौ प्रधानं।

किये नाग नागिन अधो लोक स्वामी,

हरयों मान तु दैत्य को हो अकामी॥6॥

तुही कल्पवृक्षंम् तुही कामधेनंम्,

तुही दिव्य चिंतामणि नाग एनं।

पशु नर्क के दुःखतै तु छुडावे,

महास्वर्गते मुक्तिमें तु बसावे॥7॥

करे लोह को हेम पाषाण नामी,

रटे नाम सो क्योना हो मोक्षगामी।

करै सेव ताकी करै देव सेवा,

सुन बेन सोही लहेग्यान मेवा॥8॥

जपे जाप ताको नही पाप लागे,

धरे ध्यान ताके सबै दोष भागे।

बिना तोहि जाने धने भव घनेरे,

तुम्हारी कृपातै सरे काज मेरे॥9॥

दोह – गणधर इंन्द्र न कर सके,

तुम बिनती भगवान।

ध्यानत प्रीत निहारी के,

किजे आप समान॥10॥

जैन ग्रंथांनुसार, जैन धर्माचे एकूण २४ तीर्थकर झाले असून भगवान पार्श्वनाथ हे जैन धर्माचे २३ वे तीर्थकर होते. जैन धर्माचे २२ वे तीर्थकर अरिष्टनेमी यांच्यानंतर जवळपास १००० वर्षानंतर भक्त झाला होता.

भगवान पार्श्वनाथ यांचे वडिल अश्र्वसेन हे काशी राज्याचे राजा होते तर आई वामा देवी या त्यांच्या पत्नी होत्या. माता वामा देवी यांच्या गर्भात भगवान पार्श्वनाथ असतांना त्यांच्या स्वप्नांत एक फणधारी साप दिसला होता. त्यामुळे वामा देवीने आपल्या बाळाचे नाव पार्श्वनाथ ठेवले.

अश्या प्रकारची आख्यायिका भगवान पार्श्वनाथ यांच्या जन्माबाबत जैन धर्मात प्रचलित आहे.  भगवान पार्श्वनाथ यांचा जन्म राजघराण्यात झाला असल्याने त्यांचे बालपण राजेशाहीत गेले. कालांतराने भगवान पार्श्वनाथ यांनी पौष महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीच्या तिथीवर वाराणसी या ठिकाणी जैन शिक्षा प्राप्त केली.

भगवान पार्श्वनाथ तीस वर्षाचे झाले असता त्यांनी सर्व सुख सुविधांचा त्याग करून संन्याशी जीवन जगण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी वाराणसी येथील सम्मेद शिखरावर जावून ८३ दिवस कठोर तपश्चर्या केली.

८३ दिवस कठोर तपश्चर्या केल्यानंतर ८४ व्या दिवशी त्यांना वैकल्य ज्ञानाची प्राप्ती झाली. वैकल्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सर्व सामन्य लोकांना जैन धर्माची शिकवण देण्यास सुरुवात केली. भगवान पार्श्वनाथ यांनी अनेक स्त्री पुरुषांना आपले अनुयायी बनवले.

भगवान पार्श्वनाथ यांनी दिलेली सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रहाची शिकवण आपण आपल्या आचरणात आणली पाहिजे. जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत भगवान पार्श्वनाथ यांनी इ.स. पू. ७७२ साली वयाच्या १०० व्या वर्षी सम्मेद शिखरावर निर्वाण केले.

भगवान पार्श्वनाथ यांनी निर्वाण केलेल्या सम्मेद शिखरावर जैन धर्मांच्या एकूण १९ तीर्थकाराणी निर्वाण केलं आहे.

मित्रांनो, भगवान पार्श्वनाथ यांच्या बद्दल लिहावं तितक कमीच आहे. जैन धर्मियांचे ग्रंथ वाचल्यास आपणास त्यांची महानता समजेल. वरील लेखाचे लिखाण करण्याचा उद्देश्य हाच की आपणास भगवान पार्श्वनाथ यांची आराधना करण्यासठी पठन करण्यात येत असलेल्या पार्श्वनाथ सोत्राचे महत्व कळावे. या लेखतील संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून आपण या लेखाचे महत्व समजून या स्तोत्राचे पठन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here