संत ज्ञानेश्वर महाराज रचित “पसायदान”

Pasaydan in Marathi Lyrics

नमस्कार मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज रचित पसायदान तर आपण सर्वांना माहिती आहे. आपण आपल्या बालवयात शाळेत प्रार्थनेच्या वेळी गात होतो. असे, असलं तरी आपणास या पसायदानाचा फारसा अर्थ समजला नसेल.

मित्रांनो, आम्ही खास आपल्यासाठी या लेखाच्या माध्यमातून पसायदानाचे संपूर्ण लिखाण केलं आहे. तरी आपण या लेखाचे वाचन करून संत ज्ञानेश्वर महाराज लिखित पसायदानाचा लाभ घ्या.

संत ज्ञानेश्वर महाराज रचित “पसायदान” – Pasaydan in Marathi

Pasaydan in Marathi
Pasaydan in Marathi

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

संत ज्ञानेश्वर महाराज लिखित ज्ञानेश्वरीच्या सुरुवातील वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरुपात वसलेल्या ज्या रूपांचे वर्णन करतांना,  शेवटच्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज आपलं विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळ्या) देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरी रुपी वाग यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात…

जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||

या ओवीचा अर्थ असा होतो की, जे व्यक्ती खळ आहेत त्यांच्यातील कुवृत्ती(वाईट) नष्ट होवो. इतकेच नाही तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्ती परावर्तित व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत. इतकेच नाही तर संत ज्ञानेश्वरांनी सर्व प्राणिमात्रांसाठी पसायदान स्वरूपी प्रसाद मांगीतला.

या पसायदानांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी सर्व प्राणी मात्रांमध्ये प्रेमाची आपुलकीची भावना निर्माण व्हावी आणि सर्व प्राणी मात्रांच्या मनातील एकमेका प्रती असणारी द्वेषाची भावनेचा नाश व्हावा. अशी विनंती संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या पसायदानाच्या माध्यमातून भगवंताला करतात.

मित्रांनो, पसायदानाचे नियमित पठन केल्याने आपल्या मनात चांगले विचार येवू लागतात आणि आपण सत्कर्मी लागतो. म्हणून आपण सर्वांनी नियमित पसायदानाचे पठन करावे. धन्यवाद..

मित्रांनो, आपण आपल्या लहानपणापासून नियमित पसायदान म्हणत आणि ऐकत आलो आहे. आपल्या बालवयात आपण शाळेत असतांना प्रथानेच्या वेळी तसचं, मंदिरात हरिपाठाच्या समयाला आपण पसायदान हे ऐकत आणि म्हणत असतो.

पसायदानाचे नियमित पठन करत असतांना आपल मन कसं प्रसन्न होवून जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये वर्णीत हे पसायदान भूलोकावरील सर्व प्राणिमात्रांना अनुसरून लिहिले असून त्यातून खूप काही शिकण्यासरख आहे. म्हणून शाळेत दरोरोज प्रार्थनेच्या वेळी त्यांचे पठन केले जाते. लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावे तसचं, त्यांची विचार क्षमता ही सत्कर्मी व्हावी याकरिता हे पठन करण्यात येते.

तसचं,  संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नावातच ‘ज्ञान’ आणि ‘ईश्वर’ असे शब्द आहेत. ज्ञान+ईश्वर = ज्ञानेश्वर. म्हणजेच ज्ञानाचा ईश्वर. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताकडे स्वत:साठी काहीही मागितलेले नाही जे काही मागितले ते त्यांच्या लेकरांसाठी. त्यांनी या पसायदानाच्या माध्यमातून जगात असणाऱ्या दृष्ट, खळ, दुर्जन लोकांचे वर्णन केलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊली अश्या लोकांसाठी देवाकडे प्रार्थना करतात की, देवा ह्या लोकांना चांगली बुद्धी दे. त्यांच्याकडे चांगली विचार करण्याची क्षमता नाही त्यांना सतबुद्धी दे अश्या स्वरुपात ते देवाकडे मागणी करीत आहेत.

मित्रांनो, आपण देखील या पसायदानाचे नियमित पठन करावे, जेणेकरून आपले विचार देखील चांगले होतील. याकरिता आम्ही या लेखात पसायदानाचे लिखाण केलं आहे. तरी आपण या लेखाचा सद उपयोग करून इतरांना देखील पाठवा. धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here