स्वाभिमान (सेल्फ रिस्पेक्ट) स्टेटस आणि कोट्स

Self-respect Quotes in Marathi

स्वाभिमान प्रत्येक माणसामध्ये असणे खुप महत्त्वाचे असते. स्वाभिमान असेल तर ताठ मानेने जगता येते. आपल्या पैकी बऱ्याच जणांचा असा गैरसमज कि स्वाभिमान म्हणजेच अहंकार. पण हे पूर्णपणे चुकीच आहे कारण अहंकार आणि स्वाभिमान यामध्ये खूप फरक आहे. प्रत्येक मनुष्याने आपला स्वभिमान जपलाच पाहिजे नाहीतर वाईट लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपला फायदा घेतात तर कधी कधी स्वाभिमान नसलेल्त्यांया मनुष्याला अपमानही सहन करावा लागतो. त्यामुळे आपला स्वाभिमान जपन खूप महत्वाच आहे. आणि स्वतः चा स्वाभिमान जपान हे स्वतःच्याच हातात असत.

आजच्या या लेखात आम्ही तुमच्या साठी स्वाभिमान स्टेटस आणि कोट्स आणले आहेत. आशा करतो तुम्हाला नक्की आवडतील.

स्वाभिमान (सेल्फ रिस्पेक्ट) स्टेटस आणि कोट्स – Self-respect Quotes in Marathi

Best Self Respect Quotes
Best Self Respect Quotes

“अहंकार हा खोटा आत्मविश्वास आहे तर स्वाभिमान हा खरा आत्मविश्वास आहे.”

“अहंकार नक्कीच नकारात्मक आहे, पण स्वाभिमान हा सकारात्मकच आहे.”

“इतरांकडून तुम्ही तुमच्या स्वाभिमानासाठी आदर मिळवला असेल तर ते नक्कीच तुमच्यासाठी चांगले आहे. मात्र अहंकारात त्याचा बदल होऊ देऊ नका.”

Marathi Quotes on Self Respect

marathi quotes on self respect
Marathi Quotes on Self Respect

“कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही कधीही देऊ नका. कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहचते ती स्वाभिमानाला.”

“तुमच्या भूतकाळाला तुमच्या भविष्यावर कधीही मात करू देऊ नका. कारण असं झालं तर तुमचा स्वाभिमान डळमळायला लागेल आणि सर्वात जास्त त्रास तुम्हालाच होईल.”

“स्वाभिमानापेक्षा महाग जगामध्ये कोणतीच गोष्ट असू शकत नाही. कारण तो जपण्यासाठी सर्वात जास्त मेहनत करावी लागते.”

Quotes on Self Respect in Relationships

Quotes on Self Respect in Relationships
Quotes on Self Respect in Relationships

“अहंकारापेक्षा नात्याला जपणं नक्कीच महत्त्वाचं आहे पण तुमचा स्वाभिमान सोडून नातं जपणं नक्कीच महत्त्वाचं नाही.”

“स्वाभिमान जपण्यासाठी तुम्हीच कणखरपणे उभं राहायला हवं. तुम्हाला मदत करायला कोणीही येणार नाही.”

“स्वतःला सुधारण्यासाठी जास्त काम करा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही. सुधारण्यासाठी काम केल्यास, स्वाभिमान जपला जातो आणि सिद्ध करताना अहंकार बळावतो.”

Quotes on Self Respect

Quotes on Self Respect
Quotes on Self Respect

“स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचे सर्वात महत्त्वाचे स्वरूप आहे हे नेहमी लक्षात ठेवा.’

“कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्णविराम दिलेलाच चांगला.”

“आपण सगळेच स्वतःवर जास्त प्रेम करतो. मग काळजी करताना नेहमी दुसऱ्याच्या मताचा जास्त विचार का करतो? मताचा आदर करा पण स्वाभिमान जपून स्वतःला जास्त महत्त्व द्या.”

Self Respect Quotes in Marathi

Self Respect Quotes in Marathi
Self Respect Quotes in Marathi

“स्वाभिमानाशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही.”

“ज्या क्षणी तुम्ही नात्यासाठी कोणाकडे तरी आर्जव करायला लागता, त्याचवेळी तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावता. त्यामुळे कधीही नात्यात आर्जव करू नका.”

Self Respect Quotes

Self Respect Quotes
Self Respect Quotes

“नातं वाचविण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्कीच प्रयत्न करा. पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षी स्वाभिमान जपा.”

“कोणत्याही नात्यासाठी तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी करू नका. स्वाभिमान असेल तर त्या नात्याला अर्थ आहे अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे.”

Self Respect Status in Marathi

Self Respect Status in Marathi
Self Respect Status in Marathi

“स्वाभिमानाशी तडजोड करत नातं जपायचं असेल तर मी आयुष्यात एकटं राहण्याला प्राधान्य देईन.”

“कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास, आदर आणि स्वाभिमानावर टिकून असतो.”

Self Respect Status

Self Respect Status
Self Respect Status

“नात्यात केवळ प्रेमालाच जपणं गरेजचं नाही तर नात्यात एकमेकांचा आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणंही तितकंच गरजेचे आहे.”

“कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं हे कधीही योग्य नाही. कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलाच नाहीत तर कोणतंही नातं तुम्ही जपू शकत नाही.”

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top