शनि देव ला प्रसन्न करण्यासाठी करा या मंत्राचा जाप

Shani Dev Mantra

आपण सर्वांना शनि देव हे माहिती आहेत. आपण दर शनिवारी त्यांची मंदिरात जावून पूजा अर्चना करीत असतो. भगवान शनि देव यांना कर्म आणि न्यायाची देवता म्हटलं जाते. आप आपल्या कर्मानुसार शनि देव हे सर्वांना न्याय देत असतात. तसचं, त्यांना सर्व नऊ ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ गणले जाते.

भगवान शनि देव यांच्याबाबत आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. भगवान शनि देव यांची कृपादृष्टी भूलोकांतील सर्व प्राणिमात्रांप्रमाणे देव लोकांतील देवी देवतांवर देखील असते. आपल्या जीवनांत होणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनेमागे त्यांचीच कृपादृष्टी असते अशी लोकांची मान्यता आहे.

भाविक दर शनिवारी शनि मंदिरात जावून शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी रुईच्या फुले तेल, आणि उडीद अर्पण करीत असतात. असे करण्यामागे त्यांची धारणा असते की, शनि देव आपल्यावर प्रसन्न होवून आपल्याला क्षमा करतील.

याव्यतिरिक्त, आपल्यावर असलेली ग्रहांची वाईट दशा सरळ करण्यासाठी भाविक गरिबांना अन्न पदार्थ आणि फळांचे वाटप करतात. शनि महिमेत दान धर्माला विशेष महत्व देण्यात आलं आहे.

मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून न्यायाची देवता असलेल्या शनि देव यांच्याबाबत थोडक्यात माहिती लिहिणार असून त्यांना प्रसन्न करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या शनि मंत्राचा लिखाण करणार आहे. तरी आपण या लेखाचे महत्व समजून या मंत्राचे नियमित पठन करावे.

शनि देव ला प्रसन्न करण्यासाठी करा या मंत्राचा जाप – Shani Mantra in Marathi

Shani Mantra
Shani Mantra

– “ॐ शं शनैश्चराय नमः”

– “ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः”

– “ॐ शन्नो देविर्भिष्ठयः आपो भवन्तु पीतये। सय्योंरभीस्रवन्तुनः।।”

मित्रांनो, शनि महाराज यांच्या जन्माबाबत अनेक दंत कथा प्रचलित आहेत. आपल्या पवित्र ग्रंथांमध्ये शनि महाराज यांच्या जन्माबद्दल सांगण्यात येते की,  सूर्य देव यांची पत्नी छाया  यांच्या गर्भातून शनि महाराजांचा जन्म झाला आहे.

तसचं, शनि महाराज यांच्या कृष्णवर्णीय रंगाबद्दल अशी मान्यता आहे की, जेंव्हा शनि देव आपली आई छाया यांच्या गर्भात होते तेंव्हा त्या भगवान शंकर यांच्या भक्ती करण्यात इतक्या मग्न झाल्या होत्या की त्यांना अन्न पाणी ग्रहण करण्याचे सुद्धा भान राहिले नाही.

परिणामी त्याचा परिणाम माता छाया यांच्या गर्भात असलेल्या बाळावर झाला. त्यामुळे भगवान शनी देव यांचा रंग कृष्णवर्णीय झाला. सूर्य देव यांनी भगवान शनि देव यांचे ते बालरूप पाहून पत्नी छाया यांच्यावर आरोप लावला की, हे कृष्णवर्णीय बाळ माझा नाही. तेंव्हापासून शनी देव आपले पिता सूर्य देव यांचा तिरस्कार करतात. पिता सूर्य देव यांनी आपला आणि आपल्या आईचा केलेला अपमान शनी देव यांना सहन झाला नाही.

त्यांनी भगवान महादेव यांची कठोर उपासना केली आणि भगवान शिव यांना प्रसन्न केले. भगवान शंकर शनि देव यांची कठोर तपस्या पाहून प्रसन्न झाले आणि त्यांनी शनि देव यांना वर मागण्यास सांगितला. तेंव्हा शनि देव यांनी भगवान महादेव यांना उद्देशून म्हटलं की, माझी आई छाया यांचा अनेक युगांमध्ये पराभव होत आला आहे. तसचं, पिता सूर्य देव यांनी देखील त्यांना अनेक वेळ अपमानित केलं आहे.

त्यामुळे एक पुत्र म्हणून माझी आई छाया यांची इच्छा आहे की मी, पिता सूर्य देव यांच्यापेक्षा बलवान बनून त्यांच्या अपमानाचा बदला घेवू. भगवान शंकरजी यांनी शनि देवाचे म्हणने एकूण त्यांना आशीर्वाद दिला की, सर्व नऊ ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रह म्हणून तुझीच पूजा केली जाईल. शिवाय, भूलोकांतील सर्व प्राणीमात्रांप्रमाणे स्वर्ग लोकांतील सर्व देवी देवता तुझ्या अधीन राहतील.

मित्रांनो, शनि महाराज यांच्या बद्दल अश्या प्रकारे दंत कथा प्रचलित असली तरी त्यांचे अस्तित्व आपल्या जीवनांत खूप मौल्यवान आहे. म्हणून आपण दर शनिवारी शनि मंदिरात जावून त्यांची आराधना केली पाहिजे. तसचं, या लेखात लिखाण करण्यात आलेल्या शनि मंत्राचे पठन केलं पाहिजे. जेणेकरून आपल्यावर असलेल्या सर्व संकटाचा अंत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here