“शांती मंत्र” आनंदी जीवन जगण्याची किल्ली

Shanti Mantra

हिंदू धर्मांतील पवित्र वेद पुराण ग्रंथांमध्ये अनेक प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक मंत्राचा अर्थ आणि उपयोग वेगवेगळा आहे. हिंदू धर्मात कुठलेही शुभ कार्य करतांना प्रथम ब्राह्मणाच्या हस्ते पूजा विधी करून मंत्र उच्चारण केले जातात.

भारतीय हिंदू धर्मीय प्रथेनुसार मंत्र उच्चारण करण्याची प्रथा फार प्राचीन कालीन असून आज देखील तीच परंपरा सुरु आहे. वेद पुराणांत वर्णिल्यानुसार, मंत्र उच्चारण केल्याने घरात एका प्रकारची सकारात्मक उर्जा निर्माण होऊन आपले मन प्रसन्न होते शिवाय, चांगले आरोग्य देखील लाभते.

आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून आपल्या मनाला आल्हाददायक आनंद देणाऱ्या आणि मन शांत आणि स्थिर राहणाऱ्या महत्वपूर्ण “शांती मंत्राचे” लिखाण करणार आहोत. तरी आपण या लेखाचे वाचन करून शांती मंत्राचे महत्व आणि मंत्र उच्चारण करण्याचे फायदे माहिती करून घ्या. शांती मंत्र केवळ शांती मंत्र नसून हे मंत्र आनंदी जीवन जगण्याची किल्ली आहे.

“शांती मंत्र” आनंदी जीवन जगण्याची किल्ली – Shanti Path Mantra

Shanti Mantra
Shanti Mantra

ॐ द्यौ: शान्तिरन्तरिक्षँ शान्ति:,

पृथ्वी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति: ।

वनस्पतय: शान्तिर्विश्वे देवा: शान्तिर्ब्रह्म शान्ति:,

सर्वँ शान्ति:, शान्तिरेव शान्ति:, सा मा शान्तिरेधि ॥

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥

आपले पौराणिक ग्रंथ, वेद, आणि पुराण आदी पवित्र साहित्याचे वाचन केल्यास आपणास मंत्र उच्चारण करण्याचे अनेक फायदे प्राप्त होतील. चारही वेदांमध्ये वर्णीत मंत्रांची निर्मिती ऋषी मुनींनी आपल्या साधनेच्या बळावर केली असल्याने ते सिद्ध मंत्र आहेत अशी लोकांची मान्यता आहे.

ऋषी मुनींनी आपल्या तपसेच्या बळावर सिद्ध केलेल्या मंत्रांमध्ये विविधता असल्याने प्रत्येक मंत्राचा अर्थ वेगवेगळा होतो. त्यामुळे, आपणास वेगवेगळ्या कार्यप्रसंगी वेगवेगळी मंत्रे ऐकायला मिळतात.

जसे की, वास्तुशांती कार्यक्रमा निमित्त भडजी(ब्राह्मण)वास्तू शांतीसंबंधित मंत्राचे उच्चारण करतात, तर नामकरण प्रसंगी नामकरण संबंधित मंत्राचे उच्चारण केले जाते. असे कुठलेच शुभ कार्य नाही जे मंत्राचे उच्चारण केल्याशिवाय पार पडत असेल. याव्यतिरिक्त, ज्योतिष शास्त्रांमध्ये अनेक प्रकारच्या मंत्राचे वर्णन करण्यात आलं आहे ज्यांचे उच्चारण केल्यामुळे आपणास लाभ होईल. तसचं, आपल्या घर परिवारात निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण होईल.

मित्रांनो, आजचे जीवन हे खूप धावपळीचे झाले असल्याने सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत आपल्याला कामानिमित्त नुसती धावपळ करावी लागते. अश्या प्रकारचे धावपळीचे जीवन जगत असतांना आपले मानसिक स्वस्थ व्यवस्थित राहत नाही. शिवाय, रात्रीला चांगली झोप सुद्धा येत नाही.

परिणामी आपला स्वभाव चिडका होवून घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद उद्भवतात. अश्या वेळी काय करावे हेच आपणास कळत नाही. या प्रकारच्या अनेक समस्यांमुळे आपणास आपल्या परिसरात मानसिक रोगी पाहायला मिळतात.

मानसिक स्वस्थ बिघडणे ही समस्या आज मोठ्या प्रमाणात उद्भवत चालली आहे. या समस्यांमधून स्वत:ला लवकर सावरणे खूप महत्वाचे असते. आजचे युग हे वैज्ञानिक युग असल्याने अनेक मानसिक रोगी डॉक्टरांचा साल घेतात. तसचं,  अश्या रोग्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक मानसोपचार केंद्र देखील स्थापित झाली आहेत.

असे असले तरी, अश्या प्रकारच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या वेद पुराणामध्ये अनेक प्रकारच्या मंत्रांचे वर्णन करण्यात आलं आहे. तसचं, या मंत्राचे उच्चारण करण्याची विधी आणि नियमांचे वर्णन सुद्धा सांगण्यात आलं आहे. सांस्कृतिक, धार्मिक तसचं, होम हवन कार्यक्रमा व्यतिरिक्त आरोग्या संबंधी देखील मंत्राचे उच्चारण करण्यात आलं आहे.

आयुर्वेदात या मंत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. चारी वेदांमध्ये वर्णीत मंत्र मानवी जीवनाशी संबंधित असल्याने आपण त्यांचे नीट चांगल्या प्रकारे अध्ययन करून त्यांचे महत्व समजून घ्यायला पाहिजे. तसचं त्या संबंधी माहिती इतरांना देखील सांगावी.

शांती मंत्राचे महत्व सांगायचे म्हणजे या शांती मंत्राचे उच्चारण पुरोहित यज्ञ पूजन सुरु करण्याच्या आरंभी आणि शेवटी करीत असतात. या मंत्रामध्ये समस्त प्राणिमात्रां, जीव जंतू आणि वनस्पती यांना चांगले स्वास्थ मिळून त्यांना उत्तम प्रकारचे मानसिक स्वस्थ लाभावे अशी भगवंताला विनंती करण्यात आली आहे.

या मंत्राचा शब्दशः अर्थ घेतल्यास चारी दिशांना तसेच आकाशात आणि जमिनीवर आणि या भूलोकातील सर्व स्थळी आणि प्राणिमात्रांच्य अंगी शांतता राहावी याकरिता परमेश्वराकडे मनोभावे केलेली प्रार्थना आहे. आपणास देखील आपले मानसिक आरोग्य चांगले राखायचे असल्यास आपण नियमितपणे या शांती मंत्राचा जप करावा. आश्या आहे आपणास आमचा हा लेख आवडला असेल. धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here