भगवान श्री कृष्णाष्टकम्

Shri Krishnashtakam

भगवान कृष्ण यांना भगवान विष्णू यांचा अवतार मानलं जाते. द्वापार युगांत भगवान विष्णू यांनी मथुरा येथील राजा कंस यांचा वध करण्यासाठी माता देवकी यांच्या पोटी जन्म घेतला होता. याबाबत भागवत गीतेमध्ये सविस्तर वर्णन करण्यात आलं आहे.

कलयुगी जीवन जगतांना मानवाला आतोनात कष्ट सहन करावे लागतात. तसचं, अनेक प्रकाच्या दु:खांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या कलयुगात जर कोणाचा आधार मिळत असले तर तो म्हणजे भगवान कृष्ण यांचा.

भागवत गीतेमध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसचं, आदी शंकराचार्य यांनी सुद्धा भगवान कृष्ण यांच्या भक्तीची महिमा सांगितली आहे. भगवान कृष्ण यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी श्री कृष्णाष्टकम् ची रचना केली आहे. या अष्टकाचे नियमित पठन केल्याने आपण भगवान कृष्ण यांना प्रसन्न करू शकतो. जन्माष्टमी किंवा भगवान कृष्ण यांना प्रिय असणाऱ्या कोणत्याही दिवशी या अष्टकाचे पठन केल्यास आपणास लाभ होतो.

भगवान श्री कृष्णाष्टकम् – Shri Krishnashtakam

Shri Krishnashtakam
Shri Krishnashtakam

 श्री कृष्णाष्टकम्

वसुदॆव सुतं दॆवं कंस चाणूर मर्दनम् ।
दॆवकी परमानन्दं कृष्णं वन्दॆ जगद्गुरुम् ॥१॥

अतसी पुष्प सङ्काशं हार नूपुर शॊभितम् ।
रत्न कङ्कण कॆयूरं कृष्णं वन्दॆ जगद्गुरुम् ॥२॥

कुटिलालक संयुक्तं पूर्णचन्द्र निभाननम् ।
विलसत् कुण्डलधरं कृष्णं वन्दॆ जगद्गुरम् ॥३॥

मन्दार गन्ध संयुक्तं चारुहासं चतुर्भुजम् ।
बर्हि पिञ्छाव चूडाङ्गं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥ ४ ॥

उत्फुल्ल पद्मपत्राक्षं नील जीमूत सन्निभम् ।
यादवानां शिरॊरत्नं कृष्णं वन्दॆ जगद्गुरुम् ॥५॥

रुक्मिणी कॆलि संयुक्तं पीताम्बर सुशॊभितम् ।
अवाप्त तुलसी गन्धं कृष्णं वन्दॆ जगद्गुरुम् ॥६॥

गॊपिकानां कुचद्वन्द कुङ्कुमाङ्कित वक्षसम् ।
श्रीनिकॆतं महॆष्वासं कृष्णं वन्दॆ जगद्गुरुम् ॥७॥

श्रीवत्साङ्कं महॊरस्कं वनमाला विराजितम् ।
शङ्खचक्र धरं दॆवं कृष्णं वन्दॆ जगद्गुरुम् ॥८॥

|| इति श्री कृष्णाष्टकम् ||

मथुरा नगरीचे राजा कंस आपल्या शक्तीच्या बळाने उन्मत होवून आपल्या राज्यांतील ऋषी मुनींना तसचं, देव लोकांतील देवतांना नाहक त्रास देत असत.

कंसाच्या त्रासाला कंटाळून सर्व लोक भगवान विष्णू यांची आराधना करू लागले व त्यांना राजा कंस यांच्या त्रासापासून आपणास मुक्त करण्याची त्यांना विनंती करू लागले. तेंव्हा भगवान विष्णू यांनी त्यांची विनंती स्वीकारून माता देवकी यांच्या पोटी जन्म घेतला. भगवान कृष्ण हे माता देवकी यांचे आठवे पुत्र होते.

भगवान कृष्ण यांच्या जन्मापुर्वी माता देवकी यांचे सात पुत्र राजा कंस यांनी ठार मारले होते. कारण, माता देवकी या राजा कंस यांच्या धाकट्या बहिण होत्या व त्यांच्या लग्नाच्या वेळी आकाशवाणी झाली होती की, देवकी यांच्या आठव्या पुत्राच्या हातून राजा कंस तुझा वध होईल. त्यामुळे आपल्या मृतुच्या भीतीने भयभीत होवून राजा कंस यांनी माता देवकी यांच्या सात पुत्रांचा वध केला होता.

भगवान कृष्ण यांचा जन्म जरी माता देवकी यांच्या पोटी झाला असला तरी त्यांचे संगोपन माता यशोदेने केलं होत. राजा कंस यांच्यापासून लपवून त्यांना माथुरेपासून दूर द्वारका या ठिकाणी आणल होत. याच ठिकाणी त्यांचे बालपण गेल. या ठिकाणी लहानाचे मोठे होत त्यांनी अनेक चमत्कार केले.

राजा कंस हे भगवान कृष्ण यांचे मामा होते त्यांनी भगवान कृष्ण यांना मारण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी भगवान कृष्ण यांनी त्यांना ठार मारल. भगवान कृष्ण यांच्या जीवन गाथेवर आधारित महर्षी व्यास रचित भगवतगीता ग्रंथाचे वाचन केल्यास आपणास भगवान कृष्ण यांच्याबाबत सविस्तर माहिती मिळेल.

भगवान कृष्ण यांचा जन्म जरी द्वापार युगात झाला असला तरी त्यांची कारकीर्द कलयुगापर्यंत पसरली आहे. महाभारतात त्यांनी शिष्य अर्जुनाला उपदेश देतांना आपल्या अखंड स्वरूपाचे दर्शन दिले होते. भगवान कृष्ण हेच कलयुगी जीवनाचे आधार असून आपण नियमित त्यांची भक्ती केली पाहिजे.

तरी आपण अष्टकाचे महत्व समजून नियमित पठन करावे. वरील लेखातील संपूर्ण माहिती इंटरनेट च्या माध्यमातून मिळवली असून आपणास या अष्टकाचे महत्व समजावे याकरिता या लेखाचे लिखाण केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here