सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती

Sindhudurg Fort Information in Marathi

सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं कि डोळ्यासमोर उभं राहत निसर्ग सौंदर्य. हिरवागार निसर्ग, अथांग समुद्र आणि आंबोली घाट हे सिंधुदुर्गचे मुख्य आकर्षण. केवळ नैसर्गिक सौंदर्यच नाही तर फार मोठा ऐतिहासिक वारसा देखील या जिल्ह्याला लाभलेला आहे.

असाच एक ऐतिहासिक वारशाचा नमुना म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या भुईकोट, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग यांपैकी जलदुर्ग प्रकारातील किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग. मालवण येथील एका खडकाळ बेटावर सुमारे ४८ एकर क्षेत्रफळात पसरलेला हा किल्ला. किल्ल्याची तटबंदी अशाप्रकारची आहे कि शत्रू असो किंवा खवळलेला समुद्र, कुणीही तिला भेदू शकत नाही.

सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला अशाप्रकारे या किल्ल्याचे नामकरण झालेले आहे.

“सिंधुदुर्ग किल्ला” समुद्राने वेढलेला आणि नैसर्गिक सौंदर्याने बहरलेला – Sindhudurg Fort Information in Marathi

Sindhudurg Fort Information in Marathi
Sindhudurg Fort Information in Marathi

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास – Sindhudurg Fort History in Marathi

स्वराज्यामध्ये पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि इतर परकीय सत्तांची नजर होती. हे परकीय लोक विशेषतः समुद्रमार्गाने हल्ला करत होते. मग स्वराज्याला आणि येथील रयतेला सुरक्षित ठेवायचे म्हणजे सर्वप्रथम समुद्रकिनारे सुरक्षित करावे असा महाराजांचा हेतू असावा. आणि मग सुरुवात झाली सिंधुदुर्गच्या निर्माणकार्याची.

कुणी समुद्रात एखादी वास्तू निर्माण करायची म्हटले तर ते शक्य आहे का? परंतु हा इतिहास छत्रपतींनी घडविलेला आहे. समुद्रात किल्ला बांधणे ही संकल्पना नवीन होती. या निर्माणकार्यासाठी अरबी समुद्रातील एक खडकाळ बेट निवडण्यात आले. यानंतर हजारो मजूर, शेकडो स्थापत्यकलातज्ञ यांनी सुमारे तीन वर्षे सतत मेहनत करून उभा केला सिंधुदुर्ग.

या किल्ल्याने अनेक मोहीमा आणि अनेक युद्ध बघितले आहेत. परंतु त्याने कधीही मराठयांची साथ सोडली नाही. सरतेशेवटी १७६५ साली ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला. आजही सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्रामध्ये मोठ्या डौलाने आणि ताठ मानेने उभा आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे – Tourist Place on Sindhudurg Fort

सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल म्हटले तर सर्वात पाहण्याजोगे आहे किल्ल्याचे बांधकाम. किल्ल्याचा भक्कम पाय उभारण्यासाठी ‘शिसे’ या धातूचा उपयोग करण्यात आला. गडाच्या भिंती जवळजवळ ३०-३५ फूट उंच आणि सुमारे १२-१५ फूट जाड आहेत. एकूण ४८ एकरात या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे.

यांशिवाय किल्ल्याचे प्रचंड मोठे प्रवेशद्वार, किल्ल्यावरील अनेक बुरुज हे देखील आकर्षक आहेत. किल्ल्यावरील देखरेखेकरिता असलेले दोन उंच मनोरे आहेत. किल्ल्याच्या आत गोड पाण्याच्या विहिरी आणि घरे आहेत. तसेच समुद्रातील पाणी आतमध्ये साचणार नाही याकरिता योग्य योजना केलेली दिसते.

या सर्व कारणांनी सिंधुदुर्ग किल्ला हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेला दिसतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात.

सिंधुदुर्ग किल्ल्याशेजारील इतर पाहण्यासारखी ठिकाणे – Near places to visit Sindhudurg Fort

  • टरकली समुद्रकिनारा
  • कोळंब समुद्रकिनारा
  • रामेश्वर मंदिर
  • रॉक गार्डन
  • मालवण सागरी अभयारण्य
  • त्सुनामी बेट
  • रघुनाथ मार्केट इ.

सिंधुदुर्ग किल्ला सुरु असण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क – Sindhudurg Fort Timing and Entry Fee

सिंधुदुर्ग किल्ला सकाळी १० ते सायंकाळी ५:३० पर्यंत पर्यटकांकरिता सुरु असतो. भारतीय पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क ५० रु. असून विदेशी पर्यटकांसाठी हे शुल्क २०० रु. आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याला कसे जाल – How to reach Sindhudurg Fort

येथे येण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सिंधुदुर्गला पोहचावे लागेल. येथून मालवण करीत बस किंवा टॅक्सी सहज मिळते. येथून किल्ल्यापर्यंत आपल्याला बोटीने किंवा होडीने प्रवास करावा लागेल.

सिंधुदुर्गला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी – Best Time to visit Sindhudurg Fort

खरं तर वर्षभर येथे पर्यटकांची लगबग पाहायला मिळते. परंतु नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Quiz on Sindhudurg Fort

१. सिंधुदुर्ग किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे?

उत्तर: सिंधुदुर्ग जिल्हा.

२. सिंधुदुर्ग किल्ला कुणी बांधला ? (who built sindhudurg fort?)

उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज.

३. सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती कधी करण्यात आली?

उत्तर: १६६४ ते १६६७

४. सिंधुदुर्ग किल्ल्याची उंची किती आहे?

उत्तर: सुमारे ३०-३५ फूट.

५. सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती का करण्यात आली?

उत्तर: परप्रांतीयांच्या हल्ल्यापासून स्वराज्य जनतेच्या रक्षणासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली.

६. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भिंतींची जाडी किती आहे?

उत्तर: सुमारे १२-१५ फूट.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top