लोकसंख्या वाढ याविषयीची घोषवाक्ये

Population Slogans

लोकसंख्या वाढ ही आपल्या देशातील सर्वात मोठी समस्यां बनत चाली आहे. दिवसांदिवस यात वाढ होतचं आहे, यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वेळीच यावर योग्य पर्याय शोधला नाही तर, भविष्यात प्रचंड मोठी समस्या उद्भवण्याचे नाकारता येणार नाही. जागतिक लोकसंखेच्या तुलनेत भारताची लोकसंख्या जवळपास १७.७% आहे. म्हणजेच २०२० साली मिळालेल्या लोकसंख्या वाढीच्या आकडेवारीनुसार देशातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण सुमारे १ अब्ज ३४ कोटी आहे.

जागतिक लोकसंखेच्या बाबतीत आपल्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. जर ही आकडेवारी अशीच वाढत राहली तर २०२५ सालापर्यंत आपला देश सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनेल. लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या उद्भवतात याची जाणीव आपल्या असणे खूप महत्वाचे आहे.

जनसंख्यावर आधारित स्लोगन – Slogan on population In Marathi 

Loksankhya Ghosh Vakya

लोकसंख्या ठेवा नियंत्रित, गरजा भागतील सुरळीत

Effects of Population

लोकसंख्या वाढीचे परिणाम मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण करतात. जसे की,

बेरोजगारी – Unemployment

दिवसांदिवस होत असलेल्या लोकसंखेच्या वाढीमुळे बेरोजगारी समस्या निर्माण होत आहे. लोकसंख्येतील ० ते १४ वर्षे वयोगट आणि ज्येष्ठ नागरिक इ. घटक वगळल्यास जी लोकसंख्या उरते ती कार्यकारी लोकसंख्या होय. बेरोजगारीमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते. बेकारीमुळे देशातील सकल राष्ट्रीय उत्पन्न कमी राहते आणि समाज हा गरीब व मागासलेला राहतो. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो.

देशाच्या आर्थिक विकास आणि प्रगती करता देशातील लोकसंख्या नियंत्रणात असणे आवश्यक असते. ज्या देशातील लोकसंख्येचे प्रमाण मर्यादित आहे ते देश आज सर्वगुण संपन्न आहेत. शिक्षण जरी मिळाले तरी नोकरी मिळत नाही व गरिबी असल्यामुळे जीवन व्यवस्थित जगता येत नाही, त्यामुळे गुन्हेगारी व अत्याचाराचे प्रमाण वाढते.

  • गरिबी – Poverty

Population Slogans in Marathi

कुटुंब लहान सुख महान”

परिवार जर छोटा असेल तर आपल्या सर्वच गरजा पूर्ण होऊ शकतात. शिवाय महागाईची समस्या आपल्याला भेडसावत नाही. लोकसंख्या वाढीमुळे गरिबीची समस्या खूप मोठया प्रमाणत वाढली आहे. भारतातील गरीबीचे प्रमुख कारण हे वाढती लोकसंख्या होय. यामुळे, निरक्षरतेच्या प्रमाणात, आरोग्याच्या सुविधांमध्ये आणि वित्तीय संसाधनाच्या संख्येत मोठया प्रमाणात कमतरता निर्माण होते.

ज्याप्रमाणे देशातील लोकसंख्या वाढत आहे त्यानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेत कुठल्याच प्रकारची सुधारणा होतांना दिसत नाही आहे. याचा मूळ परिणाम हा नोकर वर्गावर होत आहे. जर नोकरीच्या संख्येत वाढ नाही केली गेली तर देशात गरिबी वाढतच जाईल.

  •  महागाई – Inflation

देशातील महागाई वाढण्यामागे लोकसंख्या वाढ हे देखील एक प्रमुख कारण आहे असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. भारतातील बहुतांशी लोकसंख्या ही कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील निर्धारित वाटा जर या लोकांपर्यंत पोहचवून त्यांची क्रयशक्ती वाढली नाही तर आज महाग का होईना मिळणारे खाद्दान्न पुढे मिळेलच की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहायची शक्यता नाकारता येणार नाही. लोकसंखेच्या वाढीमुळे सर्व संसाधने सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे सरकारला शक्य होत नाही.

Population Slogans

लोकसंख्येचे आव्हानं पेलू या, छोट्या कुटुंबातून भविष्य घडवूया

देशाला भेडसावत असलेल्या या समस्येचे निराकरण करायचं असेल तर आपण सर्वांनी मिळून लोकसंख्या वाढीचं समर्थन केलं पाहिजे. ज्या ज्या देशाची लोकसंख्या मर्यादित आहे त्या देशाची उन्नती दिवसांदिवस होत असते. शिवाय महागाई दर सुद्धा संतुलित राहतो. महागाई वाढल्याने आपण सर्वजण सरकारला दोष देत असतो परंतु,  थोड्या प्रमाणात का असेना आपण सुद्धा त्याकरिता थोडेफार कारणी भूत असतो.

  • अन्नधान्याचा तुटवडा:

Slogan on Population Education

छोटा परिवार सुखी परिवार”

आजची पिढी ही सुशिक्षित असल्याने आपल्या भविष्या बद्दल ते आधीच विचारशील असतात.  वास्तविक पाहता आपली जुनी पिढी ही अज्ञानी होती शिवाय त्यांना परिवार नियोजना बद्दल योग्य माहिती न मिळाल्यामुळे पूर्वीचे कुटुंब हे मोठे आसायचे. परिवारातील व्यक्तींची संख्या जास्त असल्याने त्यांना कठीण परिस्थितीचा सामना देखील करावा लागला होता.

Slogan on Population

दोन मुल सुगंधी फुल”

कुटुंबात माणसे जास्त असल्यास सर्वाना नीट आहार देणे अशक्य होते. तसेच दुष्काळ पडला तर, अन्नधान्य महाग होते व त्याचा पुरवठा करणे शासनाला देखील कठीण जाते.

दुष्काळामुळे शेतीसाठी योग्य पाणी मिळत नाही, परिणामी उत्पादन देखील कमी प्रमाणत होते.

या सर्व कारणांमुळे न कळत महागाईला आमंत्रण मिळते. महागाईची समस्या वाढली की सर्वांचे संगोपन योग्यरीत्या करणे कठीणच असते.

त्यामुळे  यातून उद्भवणाऱ्या कुपोषणाच्या समस्ये सोबतच अनेक रोगांचा सामना करावा लागतो.

या सर्व बाबींचे प्रमुख कारण एकचं असून ते म्हणजे लोकसंख्या वाढ होय.

  • अपुरा निवारा – Insufficient shelter

Loksankhya Marathi Ghosh Vakya

सुखी जीवनाचा खरा आधार,लहान आणि स्वस्थ परिवार

लोकसंख्या वाढीमुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपैकी ही देखील एक प्रमुख समस्या आहे.

मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रमुख गरजा आहेत. आपल्या या गरजा पूर्ण करण्यासाठी तो रात्रदिवस कष्ट करत असतो.

लहान कुटुंब असणाऱ्या व्यक्तींच्या या गरजा लवकर पूर्ण होतात. परंतु प्रश्न पडतो तो मोठे कुटंब असणाऱ्या व्यक्तींना!

अन्न वस्त्र तर ठीक आहे परंतु, निवाऱ्याचे नियोजन करण्यासाठी त्यांना जंगलाची मोठ्या प्रमाणात कत्तल करावी लागते.

त्याचा परिणाम हा वसुंधरेवर होतो व ऋतू चक्र बदलते. अश्या प्रकारे पुन्हा अनेक समस्यांना समोर जावे लागते.

  •  स्थलांतर – Migration

लोकसंख्या वाढीमुळे रोजगारीची समस्या प्रचंड प्रमाणत वाढली आहे.

छोट्या शहरात हाताला काम मिळत नसल्याने तेथील  कारागीर कामाकरिता मोठया शहरात स्थलांतर करीत आहेत.

कामाच्या शोधात स्थलांतर करून शहरात आल्याने त्या ठिकाणच्या लोकसंख्येत आणखी भर पडते. या संपूर्ण गोष्टीचा ताण शहरातील यंत्रणावर पडत असतो.

दुसऱ्या शहरातून स्थलांतर करून आल्याने पुन्हा त्या लोकांच्या समोर अन्न वस्त्र आणि निवारा या समस्या उद्भवतात.

वरील प्रकारच्या समस्यांपासून आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर त्याची सुरवात आपण आपल्या कुटुंबापासून सुरु केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here