“झाडे लावा, झाडे जगवा” या विषयी काही घोषवाक्य

Save Tree Slogan in Marathi

संत तुकाराम महाराज यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वनाचे महत्व पटवून देतांना म्हटलंच आहे की,

“वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती”

या त्यांच्या पंक्तीतून त्यांनी लोकांना निसर्गाचे महत्व का आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्यावर आपल्याप्रमाणेच इतर प्राणिमात्रे देखील राहतात. निसर्गाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जाते. निसर्गामुळेच आपल्या वसुंधरेचे संतुलन टिकून राहते. पर्यावरण शुद्ध राहते, वायुप्रदूषण होण्यापासून झाडे आपल्याला मदत करतात.

झाडांची कत्तल जर होतचं राहली तर जंगलाचे प्रमाण कमी होईल. त्याचा परिणाम हा पर्यावरणावर होतो आणि त्यामुळे हवामानाचे ऋतू चक्र बदलते. जंगलाच्या हानीने जंगलात राहत असलेल्या प्राण्याची संख्या कमी झाली आहे. शिवाय बऱ्याच जातीच्या प्राण्याचे अस्तित्व नाहीशे झाले आहे.

दिवसांदिवस वाढणारी लोकसंख्या, शहरीकरण, आणि इतर सुख सुविधान करता जंगलाची मोठया प्रमाणात कटाई करण्यात येत आहे. त्यामुळे झाडांचे प्रमाण कमी झाले. त्याचा परिणाम हा आपल्यालाच भोगावा लागणार आहे याची आपल्याला जाणीव व्हावी या करिता हा लेख लिहिण्यात आला आहे.

“झाडे लावा, झाडे जगवा” या विषयी काही घोषवाक्य – Save Tree Slogan in Marathi

Zade Lava zade Jagva

 जंगल करा घनदाट सळसळेल रक्त मनगटात.

झाडे लावा सृष्टी हिरवीगार करा 

जेव्हां होईल झाडांमधे वृध्दी, तेव्हांच वाढेल जीवनात समृध्दी    

Jhade Lava Jhade Jagva

 वृक्ष लावा अंगणात पसरेल समृद्धी जीवनात.

आपण सगळे मिळुन ठरवु, प्रत्येक अंगणात झाड लावु 

आज आपल्या हातुन झाडे लागतील, ते उद्या आपल्याच कामाला येतील 

Ghosh Vakya in Marathi for Tree

Save Tree Slogan in Marathi

 वृक्ष लावा दारोदारी पसरेल समृद्धी घरोघरी.

एकत्र येउन नवा विचार पेरू, अधिकाधीक झाडे लावुन धरतीला सजवु

झाडाची आणि पावसाची अनोखी मैत्री, ती तुटल्यास नाही जीवनाची खात्री

Save Tree Slogan

 वातावरण राहील प्रदूषण मुक्त तर जीवन होईल आरोग्ययुक्त

प्रत्येकाच्या दारात झाडाने सजेल अंगण, मग कसे बिघडेल पर्यावरणाचे संतुलन

आपण मिळुन आपला धर्म निभाऊं, झाडे वाचवुन आपले कर्तव्य बजाऊं

Save Tree Quotes in Marathi

मनुष्य स्वतःच्या हव्यासापायी आणि स्वार्थाकरता वृक्षांची वारेमाप कत्तल करीत सुटला आहे. पर्यावरणाशी त्याने चालवलेला हा खेळ उद्या त्याच्याच अंगाशी येणार आहे. झाडे नष्ट झाल्यामुळे ग्लोबल वाॅर्मिंग च्या समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे . वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन न केल्यास सगळीकडे हाहाकार उडेल व मनुष्यासोबतच पृथ्वीवरील सगळया जीवजंतुंचे अस्तित्वच धोक्यात येईल . हे होउ द्यायचे नसेल तर जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत .

वृक्षाचे संगोपन करण्याकरता दिलेल्या घोषवाक्यांचा वापर करून लोकांना झाडे लावण्याकरता प्रेरीत करू शकता . शिवाय या घोषवाक्यांना सोशल मिडीया साईटस् वरून शेयर केल्यास कित्येक लोकांना झाडे लावण्याकरता प्रेरणा मिळु शकते .

Save Tree Slogans

 वृक्षाला सुद्धा मानवा प्रमाणे भावना असतात.

ऊन्हात गाडी झाडाखाली लावा, निदान गाडीकरता तर एक झाड लावा 

गाडी उन्हात लावतांना इतका विचार करतोस, त्या ठिकाणी एक झाड लावायला मागेपुढे का बघतोस?     

Save Tree Slogans in Marathi

 वृक्ष देती मानवाला छाया मानवाने करावी त्यांच्यावर माया.

हा निसर्ग करी एकच आकांत, वृक्ष तोडुन होईल का सुखांत ?

या मुलांनो सांगतो तुम्हाला, गोष्ट एक ज्ञानाची, झाडांमुळेच मीळते जीवन, रक्षा होते प्राणांची . . . 

मराठी वृक्षारोपण घोषवाक्य – Plantation Slogans in Marathi

वृक्ष हे आपले खूप जवळचे मित्र असतात, अगदी आपल्या जन्मापासून तर मरे पर्यंत आपली साथ देतात. वाचून आपल्याला खोट वाटेल, परंतु हे सत्य आहे. आपला जन्म होतो तेंव्हा आपला पाळणा हा लाकडापासून बनविलेला असतो, आणि जेंव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळी सुद्धा लाकडेच कमी येतात. मग आपला इतका जवळील मित्र असल्यावर सुद्धा आपन त्याची कत्तल का करतो? या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे.

शुद्ध हवा, शुद्ध पर्यावरण या सारखं बरच काही वृक्षांपासून आपल्याला मिळते. वृक्ष तोडण्यात काही चूकीचे नाही, परंतु एक झाड तोडण्या पूर्वी दोन झाडांची लागवड आपण केली पाहिजे. याची जाणीव आपण स्व:ता करून, तसे करण्यास इतरांना देखील संगीतलं पाहिजे. अश्याने आपले पर्यावरण शुद्ध राखण्यात सहकार्य मिळेल.

Marathi Slogans on Save Trees

  झाडे लावा, झाडे वाचवा, मानवी जीवन आनंदी खुलवा.

आपल्या वृक्षाचे संरक्षण, आपल्या भविष्याचे संरक्षण 

धरतीमाते करता आपण करूया हा प्रचार, मुलं हवीत कमी पण वृक्ष हजार 

Marathi Slogans on Trees

 वृक्ष असती वसुंधरेचे जीवन वृक्ष लावून करा तिचे रक्षण.

झाडे लावा देश वाचवा, झाडे लावा जीवन वाचवा, जीवनाला आनंदी उत्साही बनवा ! 

या! सगळे मिळुन वृक्ष लावुया,   वातावरण स्वच्छ प्रसन्न बनवुया 

Marathi Slogans on Save Trees

Marathi Slogans on Tree

 वृक्ष लावा वृक्ष,  नाहीतर होईल धरती रुक्ष.

असंख्य पशु पक्षी वाढवतात निसर्गाचा मान आणि झाडा वृक्षांमधे अडकलाय आमचा प्राण 

लहानात लहान मुल सुध्दा उठेल, वृक्ष लागवड करून धरतीला सजवेल 

Marathi Slogans on Save Tree

 मुलांना द्यावे एकचं शिक्षण,वसुंधरे मुळे आहे आपलं रक्षण. 

करावीच लागेल वृक्षांची रक्षा, तेंव्हाच निश्चित जिवन सुरक्षा 

जसे पाणी आहे प्रत्येक जीवा सजीवाचा श्वास, तसे झाडावेलींना पाहुन मनी जन्म घेते जगण्याची आस! 

झाडांवर आधारित घोषवाक्ये – Slogans on Save Trees

झाडांच्या संख्येत होत असलेल्या घटीमुळे वातावरणात प्रदूषणाचे जाळे पसरले आहे. त्याच्यामुळे बऱ्याच आजारांना चालना मिळाली आहे. वायुप्रदूषण, ही सर्वात मोठी समस्या आज आपल्याला जाणवत आहे. श्वास घेण्यास शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि हवेतील कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होते.

Slogan on Tree in Marathi

 नका करू वृक्ष तोडण्याची घाई नाहीतर होईल मानवी जीवन लाहीलाही.

झाडांमुळेच तर पाऊस येतो, घाम आणि गरमीला दुर पळवतो 

वृक्षांवर कुऱ्हाड चालवायला तयार आहात?   श्वासांवर तलवार चालणार आहे तयार राहा. 

Slogan on Tree

 झाडे असती वसुंधरेचे रक्षक कत्तल करून नका बनू त्यांचे भक्षक.

झांडामुळेच तर आहे आपल्या जीवनात हिरवळ, यांनाच कापले तर कसा पसरेल दरवळ ?

झाडे वेली नका करू नष्ट, श्वास घेण्यास होतील कष्ट 

Zade Lava Zade Jagva Slogans

Slogan on Trees in Marathi

 वृक्षामुळे मिळते शुद्ध हवा आणि पाणी मग का करता वृक्ष तोडण्याची घाई.

वृक्षच तर जीवनाचा आधार, यांना नका तोडु यार  

जेथे जेथे हिरवळ, पसरतो आनंदाचा दरवळ 

Slogan on Trees

 वृक्षांची कत्तल करून आपले आयुष्य कमी करण्यापेक्षा वृक्ष लाऊन आपले आयुष्य वाढवा.

या जगात मुनष्य हा एकमेव असा प्राणी आहे जो झाडे कापतो , त्याचा कागद बनवतो , आणि त्यावर लिहीतो ’’झाडे वाचवा’’

मराठी घोषवाक्ये झाडांसाठी – Marathi Slogans On Tree 

वृक्ष हे ओझोनची पातळी वाढविण्यास मदत करतात. ओझोनची पातळी वायुप्रदूषणामुळे कमी होत आहे. सूर्यापासून येणारे अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर न पडू देता ते ओझोनच्या माध्यमातून पडतात. अश्या प्रकारे ओझोन आपली सुरक्षा करीत असतो. जर त्याची पातळी कमी झाली तर पृथ्वीवरील तापमानाच्या प्रमाणात वाढ होईल. आपणास उन्हाळ्यात या गोष्टीची जाणीव होत असेल.

Vriksh Slogan in Marathi

  झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊसपाणी.

Vriksh Slogan

 वृक्ष तोडण्याची करू नका घाई नाहीतर होणार श्वास घेण्यास काठीणाई.

Slogan on Tree in Marathi

Vriksh Slogans

 आता करा फक्त एकच चळवळ लावा वृक्ष पसरवा हिरवळ.

Save Tree Quotes in Marathi

 आपण लावलेलं एक वृक्ष येणाऱ्या पिढीसाठी वरदान ठरू शकते.

Jhade Lava Jhade Jagva

Save Tree Quotes

 कर्म करा लाख मोलाचे स्वरक्षण करा वृक्षांचे.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here