Sunday, September 24, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

छत्रपती शिवरायांच्या द्वितीय पत्नी: सोयराबाई

Soyarabai Bhosale Mahiti

सत्तेचा ध्यास, हव्यास, महत्वाकांक्षा, माणसाला काय करायला लावेल याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई ! असं त्यांच्याकडे पाहिल्यावर…त्यांच्या विषयी वाचल्यावर लक्षात येतं. सोयराबाईंचे मोहिते घराणे हे सरदारांचे मातब्बर घराणे म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.

सोयराबाई या अत्यंत सुंदर, देखण्या, रूपवान, आणि लावण्यवती होत्या. आणि तितक्याच मनाने कुरूप, कावेबाज, कटकारस्थान करणाऱ्या, विषप्रयोग करणाऱ्या म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाल्या. त्यांना असलेला सत्तेचा ध्यास आणि त्यामुळे स्वराज्याचं झालेलं नुकसान इतिहासानं अनुभवलंय.

छत्रपती शिवरायांच्या द्वितीय पत्नी: सोयराबाई – Soyarabai Information in Marathi

Soyarabai

नाव (Name): सोयराबाई
वडील (Father Name): संभाजी मोहिते
बंधू (Brother Name): हंबीरराव मोहिते
घराणे :तळबीडचे मोहिते घराणे
विवाह (Marriage): 1650 पूर्वी
पती (Husband Name): छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी
पुत्र (Son):राजाराम महाराज, संभाजी महाराजांच्या सावत्र आई
मृत्यू (Death): 1681 च्या उत्तरार्धात रायगडावर

 सोयराबाई या अत्यंत महत्वाकांक्षी आणि सत्तापिपासू होत्या. आपला मुलगा राजाराम याला अष्टप्रधानांच्या मदतीने गादीवर बसविण्याकरता त्यांनी अनेक षड्यंत्र रचलीत. छत्रपती शिवाजी महाराजांवर दोनदा विषप्रयोग केला. संभाजी महाराजांवर देखील विषप्रयोग केला…परंतु तो यशस्वी झाला नाही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमध्ये गैरसमज पसरविण्यात कोणतीही कसूर केली नाही.

त्यामुळे पिता-पुत्रात अनेक गैरसमज निर्माण झाले. आपला मुलगा राजाराम हा गादीवर बसावा याकरता त्यांनी जी जी कारस्थानं करता येतील ती केली.

1680 मध्ये महाराजांच्या मृत्युनंतर कनिष्ठांना जवळ करून राजारामाला गादीवर बसविले. संभाजी महाराजांना हे सगळे समजल्यानंतर त्यांनी अष्टप्रधानांना एकवेळ माफ देखील केले.

सोयराबाईंचे बंधू हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांचे सेनापती होते…त्यांना शिवाजी महाराजांनी खाजगीत सांगितले होते कि संभाजीला छत्रपती करा.

त्यामुळे सोयराबाईंचे बंधू असून देखील हंबीरराव मोहित्यांनी आधी स्वराज्याचा विचार केला आणि संभाजी महाराजांना छत्रपती करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला.

संभाजी महाराज सिंहासनाधीश्वर झालेत. सर्व विसरून दगा दिलेल्या मंत्र्यांना मंत्रिपदं बहाल केलीत.

परंतु त्यांना सुधारण्याची संधी देणे म्हणजे आपली चूक होती हे संभाजी महाराजांच्या लक्षात आले आणि अखेर त्या सर्वांना हत्तीच्या पायी देण्यात आले.

या मंडळींनी हा सर्व कारभार सोयराबाईंच्या सांगण्यावरून केल्याचे समजल्या नंतर संभाजी महाराज सोयराबाईंना शासन करू शकत होते पण शेवटी काहीही झाले तरी आई होती. त्यामुळे महाराज त्यांना कठोर शासन करू शकले नाहीत.

Soyarabai Bhosale Mahiti

सोयराबाई फार करारी आणि ताठ मानेच्या होत्या. त्यांना देहदंड जरी मिळाला असता तरी देखील त्यालाही त्या तितक्याच ताठ मानेने सामोऱ्या गेल्या असत्या.

त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांचा त्यांना कधी पश्चाताप देखील झाला नाही. त्यांनी रचलेले मनसुबे एक-एक करत ढासळले.

अखेर त्या पूर्णतः एकट्या पडल्या… सगळे मार्ग बंद झाले…विष घेऊन सोयराबाईंनी आत्महत्या केली…सत्ताहव्यासाची अखेर अशी झाली.

सईबाईंच्या जाण्यानंतर जर पोटच्या मायेने सोयराबाईंनी संभाजीराजांचा सांभाळ केला असता तर स्वराज्याचं चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं. सोयराबाई प्रचंड ताकदीच्या…हुशार…सामर्थ्यवान महिला होत्या.

परंतु त्यांनी त्यांची सगळी गुणवत्ता वाईट विचारांमध्ये…कट कारस्थानामध्ये…विष प्रयोगांमध्ये वाया घालवली.

या गोष्टींनी त्या काहीही प्राप्त करू शकल्या नाहीत आणि त्यांच्या या कार्याने स्वराज्याला काहीही लाभ झाला नाही उलट झालं ते नुकसानच…

Previous Post

“मद्यपान विरोधी काही घोषवाक्ये”

Next Post

“रीझ्युम (Resume) बनवायचा मग वाचा ह्या टिप्स!”

Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
“रीझ्युम (Resume) बनवायचा मग वाचा ह्या टिप्स!”

"रीझ्युम (Resume) बनवायचा मग वाचा ह्या टिप्स!”

Funny Railway Station Name in India

विचित्र नावांची रेल्वे स्थानके!

Ajit Pawar

अजित पवार बायोग्राफी मराठींमध्ये

Inspirational Bollywood Movies

५ प्रेरणादायी हिंदी चित्रपट

Most Useful Websites

"दैनिंदिन जीवनात वापरात येणाऱ्या काही विशिष्ट वेबसाईट”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved