स्वामी समर्थ मंत्र

Swami Samarth Mantra

 मित्रांनो,  आपल्या महाराष्ट्र राज्यास लाभलेले आणि आपल्या पायाच्या पावन स्पर्शानी या महाराष्ट्राच्या भूमीस पवित्र करणारे करणारे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज आपण सर्वांनाच परिचित आहेत. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाटीशी आहे’ हा त्यांचा मंत्र आज देखील आपल्या कानी सतत पडत असतो.

एकोणिसाव्या शतकाच्या भितरी चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट (गाणगापूर) या गावी प्रकट झालेले संत स्वामी समर्थ महाराजा यांच्या बद्दल अशी मान्यता आहे की,  संत श्रीपाद वल्लभ व संत श्रीनृसिंहसरस्वती महाराज यांच्यानंतर प्रकट झालेले भगवान श्री दत्तात्रेय यांचे ते तिसरे अवतार होते.

अक्कलकोट गाणगापूर येथील श्री नृसिंह सरस्वती महाराज हेच स्वामी समर्थ यांच्या रूपाने पुन्हा प्रकट झाले आहेत अशी लोकांची धारणा आहे. कारण, सामी समर्थ यांनी उद्गारलेले वाक्य “मी नृसिंह भान असून श्रीशैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे” या वाक्यावरून ते नृसिंह सरस्वती महाराज यांचा अवतार असल्याचे निष्पन्न होते.

याचप्रमाणे, स्वामी समर्थ यांच्या प्रकट होण्याबद्दल ग्रंथ कथा देखील प्रचलित आहेत. त्या कथांमध्ये स्वामी समर्थ यांच्या जीवन चरित्राचे वर्णन करण्यात आलं आहे. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येणारे संत आहेत. गाणगापूर या ठिकाणी राहून त्यांनी आपल्या भक्तांच्या दु:खांचा नाश केला.

तसचं भक्तांनी इच्छेलेली सर्व मनोकामना पूर्ण केली. स्वामीच्या निवास स्थानामुळे गाणगापूर हे गाव पावन झाले होते. स्वामीची कीर्ती ऐकूण भाविक स्वामीच्या दर्शनाकरिता दूर दुरून येत असतं. स्वामींची मूर्ती नेहमीच दिगंबर अवस्थेत राहत असून ते आपल्या भक्तांना नेहमीच “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असा कान मंत्र देत असतं.

मित्रांनो, आज आपण देखील या लेखाच्या माध्यमातून स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्तांना दिलेल्या सिद्ध मंत्राचे लिखाण करणार आहोत. स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्तांना दिलेला मंत्र एक सिद्ध मंत्र असून त्यासंबंधी आपण एक कथा देखील पाहणार आहोत.

स्वामी समर्थ मंत्र – Swami Samarth Mantra

Shri Swami Samarth Mantra
Shri Swami Samarth Mantra

“श्री स्वामी समर्थ!!”

बाळप्पा नावाचे एक महान समर्थ भक्त होऊन गेले आहेत. त्यांनी ‘श्री स्वामी समर्थ’  या सहा अक्षरी समर्थ मंत्राची उत्त्पती केली आहे अशी मान्यता आहे. बाळप्पा यांचे नेहमीच पोट दु:खत असे, कारण त्यांच्या नाभी स्थानी विषाची एक छोटीशी पुडी अडकली होती. तेव्हा स्वामिनी त्यांना आपल्या कुलदेवतेच्या नावाचा सव्वा लाख वेळा जप करण्याचा सल्ला दिला.

जेणेकरून जपाच्या उच्चाराने ती विषाची पुडी बाहेर पडेल. परंतु, बाळप्पा व त्यांच्या पत्नी यांना कोणत्या देवतेच्या नावाचा जप करावा हा प्रश्न त्यांच्या डोक्यात गोल गोल घुमू लागला. त्यांना माहिती होत की, यापूर्वी अनेक लोकांनी अनेक देवी देवतांच्या नामाचा जपतप केला आहे. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही.

ऐके दिवशी भल्या पहाटे पहाटे समर्थ भक्त बाळप्पा स्वामी समर्थांच्या समोर येऊन बसले आणि आपल्या मनातल्या मनात ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा जप करू लागले. त्यांच्या मंत्राच्या उच्चाराने स्वामी प्रसन्न होवून त्यांनी आपली मान हलवून बाळप्पांना इशारा केला की, काळ्या मारुतीच्या गुहेत एकांतात बसून या मंत्राचा सव्वा लाख वेळा जप कर, त्यामुळे तुझी प्रकृत्ती चांगली होईल.

बाळप्पा स्वामीजींच्या आदेशानुसार समर्थ रामदास स्वामी यांनी अक्कलकोट येथे स्थापन केलेल्या हाफक्याच्या काळ्या मारुती मंदिराच्या गुहेत श्री. बाळप्पा गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी एकांतात राहून एक रकमी सव्वा लाख समर्थ मंत्राचा जप केला. परिणामी, त्यांच्या नाभिस्थानी अडकलेली विषाची पुडी बाहेर आली. म्हणून, या स्वामी समर्थ मंत्राला शास्त्र शुद्ध आणि स्वयंभू मंत्र म्हटलं जाते.

स्वामी समर्थ मंत्र – Swami Samarth Mantra Benefits

‘श्री स्वामी समर्थ’ मंत्र हा स्वामींची अनुमती असलेला मंत्र असल्याने आपण यान मंत्राचे नियमित एकशे आठ वेळा जप करायला पाहिजे.

स्वामींची आपल्या भक्तांवर नेहमीच द्या असते. आज देखील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाकरिता येत असतात. अनेक समर्थ भक्त आपणास आलेल्या अनुभव व्यक्त करतात. आपल्या राज्याच्या अनेक भागात स्वामी समर्थ केंद्रांची स्थापना केली असून त्या ठिकाणी नियमित स्वामी समर्थ प्रकट महोत्सव साजरा केला जातो. आपल्या भक्तांच्या नेहमीच पाठीशी उभा असलेल्या या संतानी चैत्र वद्य त्रयोदशीला शके १८०० साली म्हणजे,  ३० एप्रिल १८७८ साली वटवृक्षा खाली समाधी घेतली.

स्वामी समर्थ महाराजांनी वऱ्हाडातील प्रसिद्ध संत गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांना त्र्यंबकेश्वर या स्थळी दीक्षा दिली होती, अशी लोकांची धारणा आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ माऊली म्हणजे साक्षात दत्तात्रेय यांचे अवतार असल्याने आपण मनोभावे त्यांची भक्ती करून समर्थ मंत्राचा जप करावा जेणेकरून त्यांची कृपा आपल्यावर कायम राहील. आश्या आहे तुम्हांला आमचा हा लेख आवडला असेल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top