जिवंत लोकांना भिंतीत गाडून टाकणारा एक क्रूर शासक, पहा कोण होता

Timur History

बऱ्याच राजांचे आपण वेगवेगळे रूप पहिले असेल कोणी मनाने एवढे चांगले कि दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःजवळ असलेल्या गोष्टी सुद्धा देऊन टाकत, पण काही एवढे क्रूर होते जिवंत माणसांना मरणाच्या दारात पोहचवत.

जिवंतपणी माणसांना मरणाच्या दारात पोहचविण्याचे काम करणारे एका प्रकारचे माणसाच्या रूपातील राक्षसच होते, असेही म्हटले तरीही कमीच कारण एखाद्या माणसाचे मन दुखावणे म्हणजे पाप समजल्या जात, मग एखाद्या माणसाचा जीव घेणे कशात मोजल्या जाईल? आपणच ठरवा.

आजच्या लेखात आपण अश्याच एका मानवी रूपातील राक्षस असलेला एक क्रूर शासक तो म्हणजे तैमुर लंग, तर चला जाणून घेऊया,

हजारो जिवंत लोकांना भिंतीत गाडून टाकणारा जगातील एक क्रूर शासक. कोण आहे पहा – Timur History

Timur History
Timur History

कोण होता तैमुर लंग? – Who Was Timur Lang

तैमुर लंग हा चौदाव्या शतकातील उझबेकिस्तान च्या समरकंद चा राजा होता, वडिलांच्या मृत्यू नंतर तैमुर त्यांच्या गादीवर बसला. तेव्हाची वेळ होती, इसवी सन १३६९. त्यानंतर तो संपूर्ण जगाला जिंकण्यासाठी निघाला,

बऱ्याच देशांवर विजय मिळविल्या नंतर त्याने इसवी सन १३९८ मध्ये भारतावर आक्रमण केले, त्याने आपल्या देशाची राजधानी दिल्ली वर सुद्धा आक्रमण केले, बऱ्यापैकी लुट पाट केल्यानंतर त्याने १५ दिवस दिल्लीला मुक्काम केला,

यादरम्यान त्याने दिल्लीला पूर्णपणे लुटले, आणि १५ दिवसानंतर तो सर्व मालमत्ता लुटून आपल्या प्रांतात परत निघून गेला. संपूर्ण जगात भारताच्या वैभवाची ख्याती एवढी जास्त होती कि कोणताही शासक सर्वप्रथम आपल्या देशावर आक्रमण करण्याचा विचार करायचा, त्याचप्रमाणे तैमुर लंग ने सुद्धा भारतावर आक्रमण करून भारताला लुटले.

या सर्व गोष्टींसोबत त्याने हिंदू धर्माच्या मंदिरांना हानी पोहोचविली आणि मंदिरातील मूर्तींना तोडून टाकले. अनेक लोकांना त्याने मारून टाकले, अनेकांना आपले गुलाम बनविले.

जेव्हा तो परत जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याने देशातील काही लोकांना गुलाम बनवून, तसेच अनेक स्त्रियांना आणि आपल्या देशातील काही विशिष्ठ कलाकृतींना तो आपल्या सोबत घेऊन गेला.

भारतातील ज्या कारागिरांना तो आपल्या सोबत घेऊन गेला त्यांच्या हातून त्याने समरकंद ला अनेक इमारती बनून घेतल्या त्यापैकी त्याने स्वतः नियोजित केलेली एक मस्जिद आहे,

इतिहास कारांनी तैमुर लंग ला एक मानवी रूपातील दानव म्हटले आहे, कारण त्याच्या जवळ कोणतीही दया याचना चालत नव्हती, तो लोकांना किड्या मुंग्यांसारखे मारून टाकत असे.

इतिहासात काही ठिकाणी तर त्याने जिवंत लोकांची एक भिंत उभारली आणि त्या भिंतीला विटा आणि मातीच्या मिश्रणाने त्याने त्या जिवंत लोकांना भिंतीमध्ये गाडून टाकले. जेव्हा तो भरतात आला तेव्हा तो लोकांना मारून टाकून एखाद्या मोठ्या मैदानाच्या ठिकाणी त्यांचा मृतदेह नेऊन टाकायचा.  म्हणजे कोणाचाही अंतिम संस्कार होता कामा नये,

तैमुर कसा बनला तैमुर लंग – Timur to Taimur Lang

तैमुर चा तैमुर लंग बनण्यामागे एक छोटीशी स्टोरी आहे, तैमुर ला लंग यामुळे म्हटले जाऊ लागले कारण तो अपंग बनला होता त्याच्या शरीराचा उजवा हिस्सा हा लहानपणी एका घटनेदरम्यान जखमी झाला होता,

तेव्हापासून तो अपंग झाला होता, सीरियाच्या काही इतिहासकारांनी असेही लिहिले आहे कि तैमुर ला बकऱ्यांची चोरी करताना पाहून एका बकऱ्या चारणाऱ्या ने आपल्या बाणांनी तैमुर च्या मागील बाजूवर व उजव्या खांद्यावर बाण मारला होता आणि तेव्हापासून तैमुर च्या काही शरीराचा भाग काम करत नव्हता.

म्हणून त्याला तैमुर लंग म्हटल्या गेले, लंग म्हणजे लंगडा.

हाच तैमुर लंग स्वतःला चंगेज खान चा वंशज म्हणत होता, पण तैमुर लंग चंगेज खान चा वंशज नव्हता, तैमुर हा एक तुर्की होता. आणि त्याला कृरतेमध्ये चंगेज खान पेक्षाही मोठे व्हायचे होते, एवढच नाही तर त्याला सिकंदर सारखा संपूर्ण जगावर विजय मिळवायचा होता.

पण शेवटी जेव्हा त्याने भारतानंतर चीन वर आक्रमाची योजना करण्याचे ठरविले तेव्हा त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला, आणि इसवी सन १४०५ मध्ये त्याचा मृत्यू झाला,

अनेक निरपराध लोकांना मृत्यू देणारा स्वतः मृत्यू च्या दारात गेला. आणि तैमुर लंग च्या मृत्यू नंतर जगातील अनेक देशवासीयांनी ईश्वराजवळ एकच प्रार्थना केली असेल कि दुसरा तैमुर लंग कधीही जन्माला येऊ नको देऊ, तर असा होता हा क्रूर शासक.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरु नका सोबतच अश्याच नवनवीन लेखनासाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top