“वदनी कवळ घेता” श्लोक

Vadani Kaval Gheta Shlok

लहानपणी आपली आजी, आई किवां आपल्या घरातील वडीलधारे लोक आपल्याला जेवतांना काय करावे आणि काय करू नये हे नेहमी सांगत असत, जेवणाआधी वेगवेगळे श्लोक, मंत्र म्हणायला लावत असत आणि ते पाठही करायला लावत त्यामागे कारण ही होती कारण आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अन्नाला पुर्णब्रह्म असा संबोधण्यात आलेलं आहे.

परंतु आजच्या या धावपळीच्या आयुष्यात पालक आपल्या मुलांना ह्या श्लोकांबद्द्दल सांगायचे विसरतात किवां कदाचित त्यांनाच ते येत नसतील, म्हणून या श्लोकांच महत्व कमी झाल असं नाही.

म्हणून आम्ही आजच्या या लेखात तुमच्या साठी जेवण आधी म्हणण्यात येणारा श्लोक “वदनी कवळ घेता” घेवून आलेलो आहोत तो वाचून तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकाल आणि त्यांच्या संस्कारा मध्ये आजून थोडी भर घालू शकाल.

“वदनी कवळ घेता” श्लोक – Vadani Kaval Gheta lyrics in Marathi

Vadani Kaval Gheta lyrics in Marathi

“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे।।
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।”
जनीं भोजनी नाम वाचे वदावे । अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥

Vadani Kaval Gheta in English

“Vadani kaval gheta naam ghya shree hariche |
Sahaj havan hote naam gheta phukache |
Jivan kari jivitva anna he purna bramha |
Udar bharan nohe janije yadnya karma ||
Jani Bhojani Nam Vache Vadave |
Ati Aadare Gadyaghoshe Mhanave |
Hari Chintane Anna Sevit Jave |
Tari shree hari Pavije to Swabhave ||”

तर अश्या प्रकारे वदनी कवळ घेता हा श्लोक तुमच्या समोर सदर करायचा हा छोटासा प्रयत्न आशा करतो तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडल्यास तुमच्या मित्रमंडळी ला शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top