वैदिक गणित काय आहे?

वैदिक गणित ही प्राचीन गणित सोडवण्याची पद्धत आहे. वैदिक गणितातील सूत्रांचा उपयोग करून आपण गणितातील मोठे मोठे हिशोब अचूक व जलद गतीने करू शकतो. स्वामी भारती कृष्ण तीर्थ जी यांनी वैदिक गणिताचा अभ्यास अथर्ववेदतून केला व तो जगा समोर मांडला. स्वामी कृष्ण तीर्थ जी नी वैदिक गणितावर एक पुस्तक लिहिले त्यामध्ये १६ सूत्र आणि १३ उप-सूत्र आहे.

वैदिक गणित काय आहे? – Vedic Maths in Marathi

Vedic Maths in Marathi
Vedic Maths in Marathi

वैदिक गणिताची संपूर्ण अभ्यास १६ सूत्र आणि १३ उप-सूत्र मध्ये समाविष्ट आहे. श्री भारती कृष्ण तीर्थ यांना वैदिक गणिताचे जनक मानले जाते. १९११ ते १९१८ या कालखंडात श्री जगद्गुरू शंकराचार्य स्वामी भारती कृष्णा तीर्थजी हे संन्यासी जीवन जगत होते या काळात त्यांनी वेदांताचा अभ्यास केला आणि वैदिक गणिताचे १६ सूत्र शोधून काढले. वैदिक गणिता वर श्री कृष्ण तीर्थजी आणखी अभ्यास करणार होते पण त्याच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाला आणि १९६० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

वैदिक गणिताचे महत्त्व – Importance of Vedic Maths

  1. वैदिक गणिताच्या मदतीने आपण गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ इत्यादी गणितातले प्रकार सहज सोडवू शकतो.
  2. वैदिक गणिताचा उपयोग करून आपण गणितातील हिशोब १० ते १५ पटीने जलद गती ने करू शकतो.
  3. तुम्ही वैदिक गणिताचा उपयोग करून गणित करायची गती वाढवू शकता आणि उत्तर पण अचूक येते.
  4. वर्ग १ला ते १२वी पर्यंत सर्वच वर्गाचे विद्यार्थी म्हणजे जिथे जिथे अंकगणिताचा वापर येतो तिथे वैदिकगणिताचा उपयोग करू शकतो.
  5. वैदिक गणित जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला पाळे फक्त ९ पर्यंत पाठ करावे लागतील. तुम्हाला जास्त पळे पाठ कार्याची गरज नाही कारण वैदिक सूत्रांचा उपयोग करून तुम्ही मोठे मोठे गणित short cut method ने तुम्ही सोडवू शकता.
  6. वैदिक गणिताचे ज्ञान असेल तर तुम्हाला हिशोब करताना बोटावर मोजत बसण्याची गरज राहणार नाही आणि कागदावरचे rough work सुद्धा कमी होणार.
  7. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यास वैदिक गणित मदत करते.
  8. तर्क शक्तीचा विकास होण्यात वैदिक गणित मदत करते.
  9. वैदिक गणित शिकण्यास सोपी आणि गमत शीर आहे.

सर्व विध्यार्थिनी वैदिक गणित का शिकावे? – Vedic Maths for Kids

आपण सर्व स्पर्धेच्या जगात जगतो. आजकाल कोणत्याही शासकीय नोकरीसाठी आपल्याला स्पर्धा परीक्षा देणे अनिवार्य आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत गणिताचा विषय असतो आणि या विषयाला कमीत कमी एकूण परीक्षेच्या २०% ते २५% गुण असतात.

स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जर गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा उपयोग केला तर आपले उत्तर बरोबर येते पण आपला पुष्कळ वेळ खर्च होतो. त्यामुळे उरलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ मिळत नाही.

पण जर आपण वैदिक पद्धतीचा उपयोग करून गणित सोडवले तर आपले उत्तर लवकर व अचूक येते आणि आपला बराच वेळ वाचतो. हा उरलेला वेळ आपण दुसरे प्रश्न सोडवण्यासाठी वापरू शकतो. गणित हा स्पर्धा परीक्षेचा सर्वाथ जास्त गुण प्राप्त करून देणारा विषय आहे फक्त त्याला वैदिक गणिताचे सूत्रे वापरून सोडवले तर आपल्याला नक्कीच चांगले गुण मिळतील.

वैदिक गणितातील सूत्रे – Vedic Maths Sutras

१६ मुख्य सूत्रांची यादी – 16 Sutras of Vedic Maths

सूत्र १ एकाधिकेन पूर्वेण
सूत्र २ निखिलं नवत: चरमं दशत:
सूत्र ३ उर्ध्व-तिर्यग्भ्याम
सूत्र ४ परावार्त्या योजयेत
सूत्र ५ शून्यं साम्यासमुच्चये
सूत्र ६ शून्यंमन्यत
सूत्र ७ संकलन व्यवकलनाभ्याम
सूत्र ८ पुराणापुराणाभ्याम
सूत्र १ चलनकलनाभ्याम
सूत्र १० यावदूनम
सूत्र ११ व्यष्टिसमष्टि:
सूत्र १२ शेषाण्यङ्केन चरमेण
सूत्र १३ सोपान्त्यद्वयमन्त्यम्
सूत्र १४ एकन्युनेन पूर्वेण
सूत्र १५ गुणितसमुच्चयः
सूत्र १६ गुणक समुच्चयः

१३ उप-सूत्रांची यादी – 13 Sub Sutras of Vedic Maths

सूत्र १ आनुरुप्येण
सूत्र २ शिष्यते शेषसंज्ञः
सूत्र ३ आद्यं आद्येन् अन्त्यम् अन्त्येन
सूत्र ४ केवलैः सप्तकं गुण्यात्
सूत्र ५ वेष्टनम्
सूत्र ६ यावदूनं तावदूनम्
सूत्र ७ यावदूनं तावदूनीकृत्य वर्गं च योजयेत्
सूत्र ८ अन्त्ययोर्दशकेऽपी
सूत्र १ अन्त्ययोरेव
सूत्र १० समुच्चयगुणितः
सूत्र ११ लोपनस्थापनाभ्याम्
सूत्र १२ विलोकनम्
सूत्र १३ गुणितसमुच्चयः समुच्चयगुणितः

निष्कर्ष:-

शालेय दिवसात आपल्याला गणित विषय नेहमी कठीण जातो कारण आपले गणिताचे पाळे पाठ नसतात त्यामुळे गणित सोडवताना आपल्याला बरेच अडचणी जातात. पण जर आपण शालेय जीवनातच जर वैदिक गणिताची सूत्रे आपण शिकून घेतली तर आपल्याला ९ च्या पुढे पाळे पाठ करण्याची गरज राहणार नाही.

आणि आपल्या मनातून गणिताची भीती सुद्धा निघून जाणार. शालेय जीवनात जर आपण वैदिक गणित शिकलो तर पुढे चालून आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा देऊ तेव्हा आपल्याला नकीच त्याचा फायदा होणार.

वैदिक गणिता बाबतीत नेहमी विचारले जाणारे प्रश्न – Maths Questions and Answers

१. वैदिक गणित काय आहे? (What is Vedic Maths?)
उत्तर: वैदिक गणित ही गणितातील आकडेमोड करण्याची प्राचीन पद्धत आहे.

२. वैदिक गणित कोणी शोधले? (Who Invented Vedic Maths?)
उत्तर: जगद्गुरू शंकराचार्य स्वामी भारती कृष्णा तीर्थजी महाराज यांनी वैदिक गणित वेदांचे अध्यन करताना शोधून काढले.

३. वैदिक गणित कोणत्या वर्गासाठी उपयोगी आहे?
उत्तर: वैदिक गणित ३ री ते १२ वी वर्गाच्या विध्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.

४. वैदिक गणिताचे सूत्र वापरून आपण गुणाकार आणि भागाकार करू शकतो का?
उत्तर: हो वैदिक गणिताचे सूत्र वापरून आपण गुणाकार आणि भागाकार पण सहज करू शकतो.

५. वैदिक गणित अबकॅस पेक्षा उपयोगी कसे उपयोगी आहे?
उत्तर: स्पर्धा परीक्षे मध्ये तुम्हाला परीक्षा केंद्रावर कोणत्यापण प्रकारचे मोजण्याचे यंत्र नेण्याची अनुमती नसते त्यामुळे स्पर्धा परीक्षाच्या विध्यार्थ्यानसाठी वैदिक गणित हे अबकॅस पेक्षा जास्त उपयोगी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here