वरळी किल्ला इतिहास

Worli Fort Information in Marathi

आपल्या राज्यात इतिहास काळात बांधल्या गेलेले अनेक किल्ले प्रसिद्ध आहेत. तसचं, त्या किल्ल्यांबाबत ऐतिहासिक माहिती सुद्धा मिळते. त्यांपैकी मुंबई येथील वरळी हा किल्ला.

वरळी किल्ला इतिहास – Worli Fort Information in Marathi

Worli Fort Information in Marathi
Worli Fort Information in Marathi

स्वातंत्र्यापूर्वी मुंबई हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. त्यामुळे या किल्ल्याची निर्मिती सन १५६१ साली पोर्तुगीजांनी केली असल्याची माहिती मिळते. मुंबई या शहराची निर्मिती सात बेटे मिळून झाली असल्याने समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूंपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने या किल्ल्याची निर्मिती केली गेली होती.

किल्ल्याची रचना पोर्तुगीजकालीन स्थापत्य कलेत केली असून समुद्राच्या लाटांपासून किल्ल्याचे संरक्षण व्हावे याकरिता किल्ल्याच्या तळाशी जाड तटबंदीच्या भिंतीची उभारणी करण्यात आली आहे. तसचं, किल्ल्यावर एक त्रिकोणाकृती बुरुज असून त्यावर घंटा बांधण्यासाठी मनोरा रचण्यात आला आहे.

या सर्व गोष्टी पाहून या किल्ल्याची निर्मिती पोर्तुगीजांनी केली असल्याचे निष्पन्न होते. कालांतराने मुंबई हे बेट इंग्रजांनी पोर्तुगीजांकडून जिंकल्यानंतर या किल्ल्याचा ताबा इंग्रज सरकारकडे आला. इंग्रज आणि फ्रांस यांच्यात झालेल्या सप्तवार्षिक युद्धाच्या वेळी इंग्रज सरकारने वरळी किल्ल्याचा वापर शिबंदी आणि तोफा ठेवण्यासाठी केला होता.

किल्ल्याबाबत सविस्तर माहिती – Worli Fort History in Marathi

वरळी येथील कोळीवाडा परिसरात हा किल्ला स्थित असून, कोळीवाड्यातील अरुंद रस्त्याने जेंव्हा आपण किल्ल्याच्या समोर येतो तेंव्हा आपले लक्ष  सर्वप्रथम जाते किल्ल्याच्या तटबंदीकडे. किल्ल्याची निर्मिती साधारणपणे १.५० मीटर उंचीच्या ज्योत्यावर केली असून, ज्योत्याच्या भिंती सुद्धा तटबंदी सारख्याच उताराच्या आहेत.

किल्ल्यावर चढण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्या सुरुवातीला ज्योत्याच्या उंचीपर्यंत जात असून, नंतर त्या दरवाज्याच्या उंचीपर्यंत जातात. किल्ल्याचा दरवाज्याची निर्मिती खूपच अरुंद स्वरुपात केली असल्याने, चार मीटर रुंदीच्या तटबंदीच्या भिंतीतून तो एखाद्या बोगद्यासमान दिसतो.

दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर दोन कौलारू खोल्या आहेत. उत्तरेकडे असलेल्या खोलीलगतच्या तटबंदीमध्ये आनखी एक खोली असून, त्या खोलीच्या समोर गोड्या पाण्याची विहीर आहे. विहिरीसमोरून तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये असलेल्या खोलीचा वापर बहुधा दारुगोळा आणि बंदुका ठेवण्यासाठी केला जात असावा.

किल्ल्याच्या तटबंदीला लागून असलेल्या पायऱ्यां चढून वर गेल्यानंतर आपण गस्तीमार्गावर पोहोचतो. या गास्तीमार्गाची निर्मिती किल्ल्याला असलेल्या चार मीटर रुंदीच्या तटबंदीमुळे झाली आहे. त्यामुळे किल्ल्याला चार मीटर रुंदीचा गस्तीमार्ग सुद्धा आहे.

तसचं, या गस्तीमार्गाला एक मीटर उंचीचा कठडा आहे. या कठड्यावर सुमारे १५ ठिकाणी खाचा पाडून त्यांचा  तोफा ठेवण्यासाठी केला जात असे.  या सर्व खाचांच्या खालील भागात पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे.

त्याचप्रमाणे खाचांच्या दोन्ही बाजूला आयताकृती कट्ट्यांची उभारणी केली गेली असून, खाचांच्या मधल्या भागात अर्धवट झाकलेले कोनाडे असून त्यांचा वापर दिवे ठेवण्यासाठी केला जात असे. या कोनाड्यांची रचना अश्या प्रकारे करण्यात आली होती की, या कोनोड्यांमध्ये लावण्यात आलेल्या दिव्यांच्या प्रकाशाचा फायदा फक्त पहाऱ्यावर असणाऱ्या शिपायांनाच होईल, किल्ल्याच्या बाहेरील बाजूस दिव्याचा प्रकाश दिसणार नाही.

अश्या स्वरुपात या खाचांची निर्मिती करण्यात आली होती. किल्ल्याच्या पूर्व बाजूला त्रिकोणाकृती बुरुज असून या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी दगडी मनोरा बांधण्यात आला आहे.

किल्ल्याची वैशिष्ट्ये – Worli Killa Chi Mahiti

किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात चौकोनी आकाराची विहीर असून या विहिरीचा आतील भाग चेहऱ्यांच्या आकारापेक्षा थोडा मोठा आहे.  तसचं, या विहिरीला वर्षभर गोड पाणी असते. त्यामुळे पोर्तुगीजांनी मुंबई बेट आणि त्याच्या आसपासच्या परिसरात बांधलेल्या किल्ल्यांपैकी गोड पाण्याची विहीर असलेला हा एकमेव किल्ला आहे.

वरळी किल्ला छोट्या चौकीसमान असून, पोर्तुगीजांनी त्यांची स्थापना मोक्याच्या ठिकाणी केली असल्याने या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त होते. तसचं, मुंबई परिसरात असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांपैकी हा एकमेव किल्ला आहे ज्याची तटबंदी आणि किल्ल्यावर असलेले पोर्तुगीजकालीन अवशेष दिमाखात उभे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here