Monday, June 30, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

 1 April Dinvishesh

या लेखात आपण १ एप्रिल या दिनी घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या दिनी आधुनिक काळात संशोधकांनी केलेले शोध कार्य, तसेच महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन वार्ता आदी बाबीची माहिती आपण येथे पाहणार आहोत.

तसचं, १ एप्रिल हा ओडिसा राज्याचा राज्य दिन आहे. बिहार प्रांतातून ओडिसा राज्याला वेगळे करून स्वतंत्रित राज्य बनवण्यात आलं. या स्मरणार्थ तेथे ओडिशा दिन साजरा करण्यात येतो.

जाणून घ्या १ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 1 April Today Historical Events in Marathi

1 April History Information in Marathi

१ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 April Historical Event

  • इ.स. १६६९ साली मुघल काळात मुघल बादशाहा औरंगजेब यांनी उत्तर भारतातील मंदिरे तोडण्यासाठी विशेष फौज तैनात केली.
  • सन १८८२ साली ब्रिटीश कालीन भारतात पोस्ट खात्याची बचत सेवा योजना सुरु करण्यात आली.
  • इ.स. १८८७ साली मुंबई येथील अग्निशमन दलाची स्थापना झाली.
  • सन १८९५ साली भारतीय लष्कर स्थापन झाले.
  • इ.स. १९२८ साली पुणे येथील वेधशाळेच्या कामकाजास सुरुवात झाली.
  • सन १९३३ साली पहिल्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या एसी विमानाचे उड्डाण कराची येथे करण्यात आले.
  • इ.स. १९३५ साली मुंबई येथे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
  • सन १९३६ साली भारतीय ओडिसा राज्याची स्थापना झाली.
  • इ.स. १९३७ साली न्यूझीलंड देशांत रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन करण्यात आले.
  • सन १९५७ साली भारतात सर्वप्रथम दशमान पद्धतीचा वापर करण्यात आला.
  • इ.स. १९६९ साली महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प प्रारंभीत करण्यात आला.
  • सन १९७६ साली स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझ्नियाक यांनी ‘एपल इंक. ‘ कंपनीची स्थापना केली.
  • इ.स. १९९२ साली आठव्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली.
  • सन २००४ साली गुगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरु केली.

१ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १५७८ साली मानवी रक्तभिसरण संस्थेचा शोध लावणारे महान इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वे यांचा जन्मदिन.
  • सन १६२१ साली शिख धर्मियांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिन.
  • सन १८९१ साली भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक प्राण कृष्ण पारिजा यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२० साली पंडित रविशंकर यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली आसाम राज्याचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९३७ भारतीय राजकारणी आणि निवृत्त भारतीय विदेश सेवा अधिकारी तसचं, देशाचे माजी उपराष्ट्रपती डॉ. हम्मिद अन्सारी यांचा जन्मदिन.
  • सन १९४१ साली भारतीय क्रिकेट संघाचे निवृत्त क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचा जन्मदिन.

१ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 1 April Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९८४ साली हिंदुस्थानी संगीताचे ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन.
  • इ.स. १९८९ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता, समाजवादी व कामगार नेते श्रीधर महादेव जोशी यांचे निधन.
  • सन १९९९ साली भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’  प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.
  • इ.स. २००० साली महाराष्ट्रीयन कवयित्री संजीवनी मराठे यांचे निधन.
  • सन २००३ साली गायक व नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.
  • इ.स. २००६ साली बालसाहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचे निधन.
  • सन २०१६ साली प्रसिद्ध हिंदी मालिकेतील कलाकार प्रत्युषा बनर्जी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved