जाणून घ्या 1 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

1 February Dinvishesh

१ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 February Today Historical Events in Marathi

1 February History Information in Marathi
1 February History Information in Marathi

१ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 February Historical Event

 • १६८९ ला आजच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के च्या मदतीने मुघलांचा सरदार शेख नजीब खान याने कैद केले.
 • १७९० ला न्यूयोर्क मध्ये पहिल्यांदा “सुप्रीम कोर्ट ऑफ़ द यूनाइटेड स्टेट्स’ चे आयोजन केल्या गेले.
 • १८२७ ला कोलकता येथे बंगाल क्लब ची स्थापना झाली.
 • १८३५ ला मोरेशियेश मध्ये गुलामगिरीचा अंत झाला.
 • १८८४ ला आजच्या दिवशीच ऑक्सफर्ड च्या डिक्शनरी ची पहिली आवृत्ती प्रकशित करण्यात आली होती.
 • १८८४ ला देशात पोस्टल विमा योजना सुरु करण्यात आली.
 • १९६४ ला आजच्या दिवशी युनिटी ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली.
 • १९७७ ला ‘इंडियन कोस्ट गार्ड चे स्थापना करण्यात आली.
 • १९७७ ला आजच्या दिवशी देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची दिल्ली येथे स्थापना करण्यात आली.
 • १९९२ ला आजच्या दिवशी केंद्राशाशित प्रदेश दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून दर्जा मिळाला.
 • १९९८ ला पीटर कोरडा यांनी मार्सिलो रियोस यांना हरवून ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली
 • २००२ ला अमेरिकेचे प्रसिद्ध पत्रकार डेनियल पर्ल यांचे अपहरण करून त्यांची आजच्या दिवशी हत्या करण्यात आली.
 • २००३ ला अवकाशातून परत येत असताना कोलंबिया यान क्रॅश झाले आणि दुर्घटना होऊन कल्पना चावला यांच्या मिळून सात जणांचा मृत्यू.

१ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १९१४ ला भारतीय प्रसिद्ध चित्रपट कलाकार अवतार किशन हंगल यांचा जन्म.
 • १९१५ ला हैज या विषाणूवर संशोधन करणारे भारतीय शास्त्रज्ञ शंभूनाथ दे यांचा जन्म.
 • १९५५ ला प्रसिद्ध कुश्ती पैलवान सतपाल सिंह चा जन्म.
 • १९५६ ला दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार ब्रम्हानंद यांचा जन्म.
 • १९५७ ला बॉलीवूड चे प्रसिद्ध अभिनेते जॉकी श्रॉफ यांचा जन्म.
 • १९७१ ला माजी भारतीय क्रिकेटर अजय जडेजा यांचा जन्म.

१ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 1 February Death / Punyatithi / Smrutidin

 • १८८२ ला ब्रिटीशांसाठी हिमालयाला एकस्फ्लोर करणारे भारतीय नैन सिंह रावत यांचे निधन.
 • १९९५ ला प्रसिद्ध मराठी लेखक मोतीराम गजानन रांगणेकर यांचे निधन.
 • २००३ ला पहिली महिला भारतीय अंतराळवीर कल्पना चावला यांचे अपघातात निधन.
 • २०१२ प्रसिद्ध गायक अनिल मोहिते यांचे निधन.

१ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • भारतीय तटरक्षक दल दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top