जैकी श्रॉफ यांची कहाणी

जयकिशन काकुभाई श्रॉफ म्हणजेच “जैकी श्रॉफ” / Jackie Shroff  हे एक भारतीय चित्रपट अभिनेता आहेत.

त्यांना आज जवळपास तीन दशकांपेक्षा जास्त काळ हिंदी सिनेमात काम करून झाले आहेत.

2015 पर्यंत त्यांनी 9 भाषांमध्ये एकूण २०७ चित्रपट केले आहेत. 9 भाषांमध्ये हिंदी, मराठी, पंजाबी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ तेलगु आणि ओरिया या भाषांचा समावेश आहे.

Jackie Shroff

जैकी श्रॉफ यांची कहाणी – Jackie Shroff Biography in Marathi

जैकी श्रॉफ यांचा जन्म महाराष्ट्रातील लातूर येथील उदगीर येथे झाला. त्यांचे वडील काकुभाई हरिभाऊ श्रॉफ गुजराती होते. त्यांची आई तुर्कस्थानी होत्या. जाकी मुंबईमध्ये मालाबार हिल एरिया मध्ये तीन – बत्ती मध्ये राहत होते. काही जाहिराती व छोट्या भूमिका केल्यावर डिरेक्टर /प्रोडुसर सुभाष घई यांनी जय किशन यांना “जैकी” हे नाव दिले आणि “हिरो” चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम बद्ध केले.

आयेशा दत्त यांच्याशी प्रेम संबंधात असतांना त्यांच्याच वाढदिवशी ५ जून १९८७ रोजी विवाह बंधनात अडकले. आयेशा लग्नानंतर चित्रपट निर्माती बनल्या.

दोघांनी मिळून एक मिडिया कंपनी पण चालवली, जिचे नाव जैकी श्रॉफ एन्टरटेनमेट लिमिटेड असे होते. त्यांनी “सोनि टीव्ही” चे १०% शेयर्स पण खरेदी केले होते.

२०१२ सालापर्यंत ते त्याचे मालक पण होते १५ वर्षे सोनी टीव्ही चा एक भाग म्हणून काम केल्यावर त्यांनी ते शेअर्स विकून टाकले. ते इंटरन्याशनल फिल्म & टेलीव्हिजन क्लब ऑफ एसियान अकॅडेमी ऑफ फिल्म & टेलीव्हिजन चे लाईफ मेंबर पण आहेत.

जैकी श्रॉफ यांना दोन मुल आहेत. एक बॉलीवूड अभिनेता “टायगर” आणि मुलगी “कृष्णा” आहे

१९८२ :- श्रॉफ यांनी “देव आनंद” यांचा चित्रपट “स्वामी दादा” मध्ये सर्वप्रथम काम केले नंतर १९८३ मध्ये सुभाष घई यांच्या “हिरो” या चित्रपटात हिरो म्हणून मीनाक्षी शेषाद्री या अभिनेत्री सोबत काम केले. हा चित्रपट हिट झाला.

त्यानंतर त्यांनी सुभाष घई यांच्या लगातार येणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले. त्यांना जी पण भूमिका मिळत होती ती खुशीने करायचे. त्यांनी बरेच हिट चित्रपट दिले. जसे कि, अंदर-बाहर, जानु आणि युद्ध तसेच १०० डेज जे खूप यशस्वी ठरले.

१९८६ मध्ये रिलीज झालेली त्यांची “कर्मा” हि फिल्म फारच लोकप्रिय झाली. त्यांच्या अलोचकांनी त्यांच्या अभिनयाची खूप तारीफ केली.

त्यांचे काश,दहलीज आणि सच्चे का बोलबाला हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाही परतू त्यांच्या अभिनयाची चर्चा बरीच झाली.

अवार्ड्स – पारितोषिके

  • १९९० :- उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर अवार्ड जिंकला. चित्रपट – परिंदा
  • १९९४ :- अवार्डसाठी नामांकन झाले. गर्दिश
  • १९९५ :- उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर अवार्ड जिंकला. चित्रपट – १९४२-ए लव्ह स्टोरी
  • १९९६ :- उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर अवार्ड जिंकला. चित्रपट – रंगीला
  • १९९७ :- उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर अवार्ड जिंकला. चित्रपट – अग्निसाक्षी
  • २००२ :- बेस्ट सहाय्यक अभिनेताचे फिल्म फेअरचे नामांकन . चित्रपट – यादे
  • २००१ :- नकारात्मक भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्म फेअर अवार्डमध्ये नामांकन. चित्रपट – मिशन काश्मीर
  • २००३ :- उत्कृष्ट सहाय्यक अभिनेतासाठी फिल्म फेअर अवार्डसाठी नामांकन. चित्रपट – देवदास
  • २००७ :- भारतीय सिनेमात अमूल्य योगदानासाठी विशेष सन्माननीय जुरी अवार्ड मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here