जाणून घ्या १ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

 1 September Dinvishes

मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून आपण १ सप्टेंबर या दिनाचे दिवसाचे संपूर्ण दिनविशेष जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असलेलं सामान्य ज्ञान आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती करुन घेवू शकता. या लेखात आपण आजच्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 1 September Today Historical Events in Marathi

2 September History Information in Marathi
1 September History Information in Marathi

१ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 September Historical Event

  • सन १९११ साली पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.
  • सन १९३९ साली जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. त्यातूनच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली.
  • सन १९५१ साली अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ‘द ओल्ड मैन एंड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
  • सन १९५६ साली भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी) ची स्थापना करण्यात आली.

१ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८९६ साली भारतीय अध्यात्मिक शिक्षक व हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभुपाद यांचा जन्मदिन.
  • सन १९०८ साली भारतीय हिंदी चित्रपट सुरुष्टीतील खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते के. एन. सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय पुरोगामी चळवळीचे उर्दू लेखक, नाटककार , चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संवाद लेखक राजिंदर सिंह बेदी यांचा जन्मदिन.
  • सन १९२१ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली भारतीय राजकारणी व लोकसभेचे माजी अध्यक्ष तसचं, मेघालय राज्याचे माजी मुख्यमंत्री पी. एम. संगमा यांचा जन्मदिन.

१ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 1 September Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १५७४ साली शीख धर्मियांचे तिसरे गुरु गुरु अमरदास यांचे निधन.
  • इ.स. १५८१ साली शीख धर्मियांचे चौथे गुरु गुरु राम दास यांचे निधन.
  • इ.स. १८९३ साली प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन.
  • सन २००८ साली बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top