Saturday, May 3, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १० ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

10 August Dinvishes

मित्रांनो, आज जागतिक जैवइंधन दिन.  दरवर्षी 10 ऑगस्ट या दिवशी हा दिवस साजरा केला जातो, ज्याचा हेतू पारंपारिक जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून गैर-जीवाश्म इंधनांच्या महत्त्वविषयी जागरूकता वाढविणे आणि जैवइंधन क्षेत्रातील सरकारने केलेल्या विविध प्रयत्नांना उजाळा देणे आहे.

याशिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १० ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 10 August Today Historical Events in Marathi

10 August History Information in Marathi
10 August History Information in Marathi

१० ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 August Historical Event

  • इ.स. १८०९ साली स्पेन पासून इक्वेडोर देशाला स्वतंत्र मिळाले.
  • इ.स. १८२१ साली मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.
  • इ.स. १८४६ साली युनायटेड स्टेट्स सरकारद्वारे प्रशासित संग्रहालये आणि संशोधन केंद्रांचा एक गट असलेल्या ‘स्मिथसोनियन संस्थेची’ स्थापना करण्यात आली.
  • सन १९७९ साली प्रथम भारतीय प्रायोगिक उपग्रह प्रक्षेपण वाहन एसएलवी-3 प्रक्षेपित करण्यात आले.
  • सन १९९९ साली ‘इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ‘डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर करण्यात आला.
  • सन २००० साली श्रीलंकेचे माजी पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

१० ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७५५ साली मराठा साम्राज्याचे नववे पेशवा व पेशवा बालाजी बाजीराव यांचे धाकटे पुत्र नारायणराव पेशवे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८५५ साली राजस्थान मधील जयपूरच्या अतरौली घराण्याचे संस्थापक व भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक अल्लादिया खान यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६० साली भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पहिल्या आधुनिक ग्रंथाचे लिखाण करणारे भारतीय संगीतशास्त्रज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७४ साली अमेरिकन अभियंता, व्यापारी व  राजकारणी तसचं, अमेरिकेचे माजी ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट क्लार्क हूवर(Herbert Hoover) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९४ साली भारतरत्न पुरस्कार सन्मानित भारताचे माजी चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य व माजी केंद्रीय मंत्री वी. वी. गिरी यांचा जन्मदिन.
  • सन १९०२ साली  कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री एडिथ नोर्मा शियरर (Norma Shearer) यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्मदिन.
  • सन १९६२ साली भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्मदिन.

१० ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 August Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९४२ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारक शिरीष कुमार यांचे निधन.
  • सन १९५० साली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन.
  • सन १९७७ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय ध्वज गीत “विजयी विश्व तिरंगा प्यारा” गीताचे रचनाकार, कवी व गीतकार श्यामलाल गुप्ता यांचे निधन.
  • सन १९९५ साली भारतीय हिंदी साहित्याचे प्रख्यात व्यंग्यकार आणि विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा जन्मदिन.
  • सन १९८६ साली भारतीय लष्कराचे 13 वे प्रमुख जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य यांचे निधन.
  • सन १९९९ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदी, संस्कृत अभ्यासक, साहित्यिक इतिहासकार, निबंधकार आणि समालोचक बलदेव उपाध्याय यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved