Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १० सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

 10 September Dinvishes

मित्रांनो, आज “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” दरवर्षी १० सप्टेंबर या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा एक जागरूक दिवस असून याची सुरुवात सन २००३ सालापासून करण्यात आली. जगभरातील विविध क्रियाकलापांसह आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक वचनबद्धता आणि कृती प्रदान करण्यासाठी प्रत्येक वर्षी 10 सप्टेंबर रोजी हा दिन साजरा केला जातो. याशिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवासाचे दिनविशेष देखील जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १० सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 10 September Today Historical Events in Marathi

10 September History Information in Marathi
10 September History Information in Marathi

१० सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 September Historical Event

  • इ.स. १८४६ साली अमेरिकन संशोधक इलियस होवे(Elias Howe) यांनी शिलाई मशीनचे पेटंट शोधले.
  • सन १९३५ साली देहरादून येथील प्रसिद्ध दून विद्यालयाची स्थापना सतीश रंजन दास यांच्या द्वारे करण्यात आली.
  • सन १९३९ साली कॅनडाने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
  • सन १९६६ साली संसदेने पंजाब आणि हरियाणा या दोन राज्याच्या स्थापनेला मान्यता दिली.
  • सन १९७६ साली भारतीय विमानसेवेच्या बोईंग 737 या विमानाचे अपहरण करून लाहोर येथे नेण्यात आले.
  • सन २०१६ साली ब्राझीलच्या रियो दी जेनेरियो या शहरात सुरु असलेल्या रिओ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पॅरा ऑलम्पिक पटू मारीयाप्पन थंगावेलू यांनी सुवर्णपदक आणि वरुण भाटीया यांनी कांस्य पदक जिंकले.

१० सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७२ साली नवानगर राज्याचे शासक व इंग्लिश क्रिकेट संघासाठी खेळलेले नामांकित भारतीय कसोटीपटू महाराज रणजितसिंहजी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८७ साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि आधुनिक भारताचे शिल्पकार तसचं, उत्तरप्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९२ साली दक्षिण आफ्रिकेतील भारतीय हिंदी संस्थापक व महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी व आर्यसमाजी भवानी द्याल संन्यासी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९५ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय तेलगू भाषिक लेखक व साहित्यकार विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्मदिन.
  • सन १९१२ साली भारताचे कार्यवाही राष्ट्रपती व भारताचे पाचवे उपराष्ट्रपती बासप्पा दनप्पा जत्ती यांचा जन्मदिन.
  • सन १९४३ साली भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय आधुनिक हिंदी साहित्यातील अग्रगण्य साहित्यिक व लेखिक तसचं, कादंबरीकार चित्रा मुद्गल यांचा जन्मदिन.

१० सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 September Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९१५ साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसैनिक व बेंगा येथील क्रांतीकारकांची मध्यवर्ती संस्था असलेल्या युगांतर पक्षाचे प्रमुख जतींद्रनाथ मुखर्जी यांचे निधन.
  • सन १९२३ साली प्रसिद्ध भारतीय बंगाली भाषिक कवी, लेखक व चित्रकार सुकुमार रे यांचे निधन.
  • सन १९६४ साली भारतीय व्हायोलिन वादक श्रीधर पार्सेकर यांचे निधन.
  • सन १९७५ साली नोबल पारितोषिक विजेता ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉमसन(George Paget Thomson) यांचे निधन.

मित्रांनो, आम्ही या लेखाचे लिखाण स्पर्धात्मक परीक्षेच्या उद्देशाने केले आहे. तरी आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे व आपल्या मित्रांना देखील पाठवा. धन्यवाद.

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved