Tuesday, May 6, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ११ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

 11 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज आपल्या देशाच्या इतिहास काळात खूप वाईट घटना घडली होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात भरतील पश्चिम बंगाल प्रांतातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांनी इंग्रज सरकारविरुद्ध आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना ब्रिटीश सरकारने फाशी दिली होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ १८ वर्ष होते. खुदिराम बोस यांची वीरता आणि निडरता पाहून इंग्रज सरकार देखील हतबल झाली होती.

कमी वयाचे असतांना देखील त्यांनी खुदिराम बोस यांना फाशीची शिक्षा दिली. खुदिराम बोस फाशीच्या शिक्षेला ना घाबरता आपल्या हातात गीता घेऊन आनंदाने फासावर गेले. त्यांची देशभक्ती खरच खूप प्रखर होती. त्यांनी विदेशी मालाचा बहिष्कार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली बंगालमधील अनके युवक धोतर नेसून आंदोलनांत सहभागी झाले होते.

जाणून घ्या ११ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 11 August Today Historical Events in Marathi

11 August History Information in Marathi
11 August History Information in Marathi

११ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 August Historical Event

  • इ.स. १८७७ साली अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल (Herbert Hall Turner) यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.
  • सन १९०८ साली क्रांतिकारक खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली.
  • सन १९५२ साली हुसैन बिन तलाल जॉर्डन देशाचे राजा बनले.
  • सन १९६० साली चाड देशाला फ्रांस देशाकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • सन १९६१ साली दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला.
  • सन १९७९ साली गुजरात मधील मोर्वी येथील धारण फुटून हजारो लोक मृत्युमुखी पडले होते.
  •  सन १९८७ साली ‘युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह’च्या अध्यक्षपदी अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड करण्यात आली.
  • सन १९९९ साली शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.

११ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७७८ साली जर्मन व्यायामशाळेचे शिक्षक आणि राष्ट्रवादी फ्रेडरिक लुडविग जॉन (Friedrich Ludwig Jahn) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९७ साली लंडन येथील प्रसिद्ध बालसाहित्यिक इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन (Enid Blyton) यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रतिष्ठीत संगीतकार, संगीतकार, अभ्यासक आणि शिक्षक रामाश्रेय झा यांचा जन्मदिन.
  • सन १९४३ साली पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख व राजकारणी तसचं, पाकिस्तानचे माजी दहावे राष्ट्रपती सय्यद परवेझ मुशर्रफ यांचा जन्मदिन.
  • सन १९४४ साली फेडएक्स कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रेडरिक स्मिथ(Frederick W. Smith) यांचा जन्मदिन.
  •  सन १९४९ साली भारतीय अर्थशास्त्रज्ञ, सेंट्रल बँकर आणि निवृत्त आयएएस अधिकारी तसचं, भारतीय रिझर्व्ह बँकचे माजी 22 वे गव्हर्नर दुव्वरी सुब्बाराव यांचा जन्मदिन.
  • सन १९५० साली अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, प्रोग्रामर, समाजसेवी आणि तंत्रज्ञान उद्योजक तसचं, एपल इंक. कंपनीचे सहसंस्थापक स्टेवी व्होज्नियाक(Steve Wozniak) यांचा जन्मदिन.
  • सन १९७४ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू व कर्णधार अंजू जैन यांचा जन्मदिन.

११ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 August Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९०८ साली प्रख्यात भारतीय क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन.
  • सन १९७० साली भारतीय महाराष्ट्रीयन मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे यांचे निधन.
  • सन १९९९ साली माजी भारतीय क्रिकेटपटू रामनाथ धोंडू पारकर यांचे निधन.
  • सन २००० साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता पैदी जयराज यांचे निधन.
  • सन २००३ साली स्वीझ गणितज्ञ आर्मांड बोरेल (Armand Borel) यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved