Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १३ मे रोजी येणारे दिनविशेष

13 May Dinvishes

मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आजच्या दिवशी घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांबाबत माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या दिवशी सन १९५२ साली स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देशांतील संसदेचे प्रथमच अधिवेशन भरण्यात आले होते. भूतकाळात घडलेला हा दिवस एक अविस्मरणीय असा दिवस आहे. या अविस्मरणीय क्षणाची इतिहासत नोंद केली आहे.

तसचं आज आपल्या देशातील लष्करी दलाने राजस्थानमधील पोखरण या लष्करी प्रशिक्षण स्थळी परमाणु शस्त्रांची यशस्वी चाचणी केली होती. याशिवाय आणखी काही ऐतिहासिक घटनांची माहिती आपण या लेखाच्या द्वारे जाणून घेणार आहोत.तसचं, काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन, त्यांचे शोधकार्य आदी घटनांची माहिती आपण या लेखात पाहूया.

जाणून घ्या १३ मे रोजी येणारे दिनविशेष – 13 May Today Historical Events in Marathi

13 May History Information in Marathi
13 May History Information in Marathi

१३ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 May  Historical Event

  • सन १९६२ साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशाच्या राष्ट्रपती पदाची शपत घेतली. राष्ट्रपती पदावर विराजमान होणारे ते दुसरे भारतीय नागरिक होते.
  • इ.स. १९५२ साली स्वातंत्र्य भारतातील संसदेच्या पहिल्या सत्रास सुरुवात करण्यात आली.
  • सन १९९५ साली ब्रिटीश गिर्जारोहक अ‍ॅलिसन हॅग्रीव्हस या ऑक्सिजन आणि शेरपा संघाचा पाठिंबा न घेता एकट्या माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
  • इ.स. १९९८ साली भारतीय लष्करी दलाने राजस्थान मधील पोखरण या लष्करी प्रशिक्षण स्थळी दोन परमाणु शस्त्रांची चाचणी केली.
  • सन २००० साली भारतातील प्रसिद्ध मॉडल्स आणि मिस इंडिया विजेता लारा दत्ता यांनी विश्वसुंदरी चा किताब आपल्या नावे केला.

१ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८५७ साली मलेरिया जंतूचा शोध लावणारे नोबल पारितोषिक विजेते ब्रिटिश शरीरशास्त्रज्ञ व वैद्यकीय डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांचा जन्मदिन.
  • सन १९०५ साली भारतीय वकील व राजनीतिज्ञ आणि भारताचे पाचवे राष्ट्रपती तसचं, राष्ट्रपती पदावर विराजमान असतांना निधन पावणारे दुसरे भारतीय राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९१६ साली साहित्य क्षेत्रांतील भारतीय नोबल पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार तसचं, पद्मश्री व ओरिया साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय ओडिया कवी, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक सच्चिदानंद राऊतराय यांचा जन्मदिन.
  • सन १९१८ साली भरतनाट्यम नृत्य क्षेत्रांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय भरतनाट्यम नृत्यागणा बालासरस्वती यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९५१ साली मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमीमधील प्रख्यात मराठी चित्रपट संगीतकार व संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्मदिन.
  • सन १९५६ साली भारतीय अध्यात्मिक नेता व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’ चे संस्थापक “श्री श्री” रविशंकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९८४ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, गुजराती आणि मराठी भाषेतील चित्रपट संगीताचे पार्श्वगायक बेनी द्याल यांचा जन्मदिन.

१३ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13  May Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १६२६ साली मध्यकालीन भारतातील अहमदनगर येथिल निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण व सिद्दी लष्करी नेता मलिक अंबर यांचे निधन
  • इ.स. १९४७ साली भारतीय बंगाली भाषिक कवी व नाटककार सुकांत भट्टाचार्य यांचे निधन.
  • सन १९५१ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी आणि उर्दू भाषेचे प्रख्यात कवी हसरत मोहनी यांचे निधन.
  • इ.स. २००१ साली भारतीय पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी यांचे निधन.
  • सन २००६ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय वैद्यकीय डॉक्टर हेमलता गुप्ता यांचे निधन.
  • इ.स. २०११ साली बंगाली चित्रपट क्षेत्रांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक बादल सरकार यांचे निधन.
  • सन २०१३ साली सुप्रसिद्ध भारतीय छायाचित्रकार जगदीश माली यांचे निधन.
  • इ.स. २०१६ साली संत निरंकारी मिशनचे अध्यात्मिक गुरु बाबा हरदेव सिंह यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved