14 September Dinvishes
मित्रांनो, आजचा दिवस हा इतिहास काळात घडलेल्या अनेक घटनांची माहिती संपादन करतो. आजच्या दिवशी इतिहासात तसचं, आधुनिक जगात घडलेल्या संपूर्ण घटनांची माहिती आपण या लेखाच्या साह्याने जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महान व्यक्ती, तसचं, निधन वार्ता याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
नित्रांनो, आजचा दिवस आपल्या देशांत हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात सन १९४८ साली आपली राष्ट्रभाषा हिंदी म्हणून घोषित केल्यापासून दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या भारत देशांत अनेक भाषा बोलल्या जातात शिवाय, आपल्या देशाच्या संविधानाचे लिखाण हे हिंदी या भारतीय देवनागरी लिपीत व आधिकारिक रित्या इंग्रजी या दोन भाषेत केलं गेल आहे. म्हणून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या दिवसाचे महत्व समजून १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवील. सन १९५३ साली पहिला हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
जाणून घ्या १४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 14 September Today Historical Events in Marathi
१४ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 September Historical Event
- सन १९४९ साली हिंदी ही राष्ट्रीय भाषा घोषित करून हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
- सन १९५९ साली सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती. यामुळे सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेत अंतराळ स्पर्धेची सुरूवात झाली.
- सन १९६० साली ‘ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज’ (OPEC) ची स्थापना बगदाद येथे करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएना येथे आहे.
- सन २००० साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज मिलेनियम एडिशन किंवा विंडोज एम.ई ही ग्राफिकल ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली.
- सन २००३ साली उत्तर युरोपमधील एस्टोनिया या देशाला युरोपियन युनियन मध्ये समाविष्ट करण्यात आलं.
- सन २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आज संयुक्तपणे भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली.
१४ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८६७ साली भारतीय महाराष्ट्रीयन वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णुबुवा जोग यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९८ साली महाराष्ट्रीयन मराठी नाट्य-चित्र अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नाट्यसंस्था स्थापक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्मदिन.
- सन १९१४ साली भारतीय हिंदी चित्रपत सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक जी. पी. सिप्पी यांचा जन्मदिन.
- सन १९२३ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व कायदेपंडित तसचं, माजी भारतीय बार कौन्सिलचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष राम जेठमलानी यांचा जन्मदिन.
- सन १९४८ साली प्रख्यात भारतीय ग्वाल्हेर व जयपूर येथील किराणा घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील गायक व संगीतकार वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्मदिन.
- सन १९६३ साली माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रॉबिन सिंह यांचा जन्मदिन.
१४ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 September Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९०१ साली अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचे माजी २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्ली (William McKinley) यांचे निधन.
- सन १९७१ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय बंगाली भाषिक कादंबरीकार, लेखक व साहित्यकार ताराशंकर बंद्योपाध्याय यांचे निधन.
- सन १९८५ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार रामकृष्ण शिंदे यांचे निधन.
- सन १९८९ साली पद्मश्री पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, इंडीयन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च (ICAR) चे पहिले संचालक बेन्जामिन पिअरी पाल (Benjamin Peary Pal) यांचे निधन.
- सन २०११ साली ध्यानचंद पुरस्कार सन्मानित भारतीय कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र माधवराव बिराजदार यांचे निधन.