जाणून घ्या १५ मार्च रोजी येणारे दिनविशेष

15 March Dinvishesh

१५ मार्च हा दिवस सर्वच लोकांसाठी विशेष महत्व आहे कारण, या दिवशी ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ असतो. १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेत भाषण करून तेथील लोकांना सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्व अश्या प्रकारचे चार अधिकार बहाल केले होते.

यानंतर ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्तराष्ट्र संघांशी चर्चा करून लोकांचे मूलभूत गरजा पुरविण्याचे हक्क, तक्रार निवारण्याचे हक्क, ग्राहक शिक्षणाचे हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचे हक्क अश्या प्रकारच्या हक्कांवर शिका उमठवण्यात आला. आणखी चार हक्क नागरिकांना बहाल करण्यात आले होते. दोन्ही हक्क मिळवून एकूण आठ हक्क आपल्याला देण्यात आले आहेत. तसेच, या दिवशी नियोजन दिन आणि जागतिक अपंगत्व दिन देखील असतो.

जाणून घ्या १५ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 15 March Today Historical Events in Marathi

15 March History Information in Marathi

१५ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 March Historical Event

जगात सर्वप्रथम कसोटी क्रिकेटला सुरुवात आजच्या दिवशी म्हणजे १५ मार्च १८७७ साली मेलबर्न या ठिकाणी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघा दरम्यान झाली होती. ऑस्ट्रेलिया देशाने हा सामना ४५ धावानी जिंकला होता. अश्या प्रकारे अनेक काही घटनांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत.

  • इ.स. १५६४ साली सुलतान मोहम्मद बिन कासीम यांनी लावलेला जिझिया कर मुघल सम्राट अकबर यांनी रद्द केला.
  • सन १६८० साली शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांचा विवाह प्रतापराव गुजर यांची कन्या ताराबाई यांच्या सोबत करण्यात आला होता.
  • इ.स. १८२७ साली टोरोंटो विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
  • सन १८३१ साली मुंबईतील आद्दय छापखानदार गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु केले.
  • इ.स. १८६९ साली सिनसिनाटी रेड स्टॉकिंग्स प्रथम प्रो बेसबॉल संघ बनला.
  • सन १८७७ साली जगातील पहिला कसोटी सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन देशाच्या क्रिकेट संघात खेळण्यात आला होता.
  • इ.स. १८९२ साली लिव्हरपूल एफ. सी. ची स्थापना करण्यात आली.
  • सन १९०६ साली युनायटेड किंगडम मधील मॅनचेस्टर शहरात रोल्स रोयस या आलिशान कार कंपनीची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १९१९ साली हैदराबाद येथे उस्मानिया विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९३७ साली अमिरिकेत पहिली रक्तपेढी(ब्लड बँक) सुरु करण्यात आली.
  • इ.स. १९४६ साली इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमेंट अ‍ॅटली यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली.
  • सन १९८५ साली पहिले इंटरनेट डोमेन symbolics.com चे पंजीकरण करण्यात आले.
  • इ.स. २०११ साली सिरीयन युद्ध सुरु झाले.

१५ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १७६७ साली अमेरिकन सैनिक, राजकारणी व अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्मदिन.
  • ई.स. १८६० साली प्लेग व कॉलरा या सारख्या रोगांची प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा जन्मदिन.
  • सन १८६६ साली पेपर क्लिप चे संशोधक जॉन वालेर यांचा जन्मदिन.
  • ई.स. १९०१ साली भारतीय पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम तथा गुरु हनुमान यांचा जन्मदिवस.
  • सन १९३४ साली बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांचा जन्मदिन.
  • ई.स.१९४७ साली भारतीय पूर्व हॉकी खेळाडू अजित पाल सिंग यांचा जन्मदिन.
  • सन १९८५ साली भारतीय भारतीय रॅपर, संगीत निर्माता, गायक आणि चित्रपट अभिनेता हिरदेशसिंग तथा हनी सिंग यांचा जन्मदिन.

१५ मार्च या दिवशी झालेले मृत्यू  / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15 March Death / Punyatithi / Smrutidin

  • ई.स. १२३६ मध्ये विश्व प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह यांचे निधन.
  • सन १९३७ साली मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर यांचे निधन.
  • ई.स. १९८५ साली भारतीय इतिहासकार व लेखक राधा कृष्ण चौधरी यांचे निधन.
  • सन १९९२ साली हिंदी आणि उर्दू भाषिक कवी डॉ. राही मासूम रझा यांचे निधन.
  • ई.स. २००० साली रवींद्रनाथ टागोर यांच्या जवळील सहकारी, विचारवंत आणि कलासमीक्षक लेडी राणी मुखर्जी यांचे निधन.
  • सन २००२ साली इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.
  • ई.स. २००३ साली मुंबई शहरातील कायदेतज्ञ रवींद्रनाथ टागोर यांचे निधन.
  • सन २००९ साली प्रथम भारतीय विमान चालक महिला सरला ठकराल यांचे निधन.
  • ई.स. २०१३ साली डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन.
  • सन २०१५ साली भारतीय गांधीवादी लेखक नारायण देसाई यांचे निधन.

आजच्या दिवसाला किती महत्व आहे हे आपल्याला हा लेख वाचून कळलच असेल, शिवाय आजच्या दिवशी इतिहासात काळात घडलेल्या ऐतिहासिक घटना वाचून त्यांची माहिती सुद्धा आपल्याला झाली असेल.

धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top