जाणून घ्या १५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

15 September Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा इतिहास काळात घडलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा दिवस आहे. आज आपल्या देशाचे महान अभियंता एम.विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन. यानिमित्ताने आपल्या देशांत अभियंता दिवस साजरा करण्यात येतो. तसचं, आज जागतिक लोकशाही दिन देखील आहे. या शिवाय आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जन्मदिन, तसचं निधन पावणाऱ्या महान व्यक्तींबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 15 September Today Historical Events in Marathi

15 September History Information in Marathi
15 September History Information in Marathi

१५ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 September Historical Event

 • सन १९१६ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान पहिल्या रणगाड्यांचा वापर करण्यात आला.
 • सन १९४० साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटनच्या वायुसेनेने जर्मनच्या वायुसेनेला पराभूत केल्याचं जाहीर केलं.
 • सन १९४८ साली स्वतंत्र भारतातील पहिले ध्वजवाहक जहाज आई. एन. एस मुंबईच्या बंदरावर दाखल झाले.
 • सन १९५९ साली रशियन नेता निकिता खुश्चेव(Nikita Khrushchev) हे अमेरिकेची यात्रा करणारे सोव्हियत संघाचे पहिले नेता बनले.
 • सन १९५९ साली देशांत राष्ट्रीय प्रसारण सेवा दूरदर्शन ची सुरुवात करण्यात आली होती.
 • सन १९७१ साली निसर्गरम्य आणि शांतपूर्ण जग तयार करण्यासाठी ग्रीनपीस या एन. जी. ओ ची स्थापना करण्यात आली होती.
 •  सन २००० साली ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७ व्या ऑलम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
 • सन २००९ साली पेनसुला फाउंडेशन चे चेअरमन सुब्रतो चट्टोपाध्याय यांची ओडीट ब्युरो ऑफ सरकुलेशन च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

१५ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८६० साली भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सन्मानित भारतीय नागरी अभियंता आणि राजकारणी, विद्वान, मुत्सद्दी तसचं, मैसूर संस्थानचे दिवाण सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८७६ साली भारतीय बंगाली कादंबरीकार व लघुकथा लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन.
 • सन १९०५ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार, व्यंगचित्रकार व हास्य कवी  तसचं, हिंदी एकांकिका चे जनक राम कुमार वर्मा यांचा जन्मदिन.
 • सन १९०९ साली तामिळनाडू राज्यातील प्रसिद्ध राजकारणी व माजी पहिले मुख्यमंत्री सी. एन. अन्नादुराई यांचा जन्मदिन.
 • सन १९१५ साली भारतीय सर्वोच्च शोर्य पुरस्कार परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित भूतपूर्व भारतीय लष्कर सैनिक लांस नायक कर्म सिंह यांचा जन्मदिन.
 • सन १९२७ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी, स्तंभलेखक व नाटककार सर्वेश्वर द्याल सक्सेना यांचा जन्मदिन.
 • सन १९३९ साली भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शैक्षणिक आणि राजकारणी, सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्मदिन.

१५ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15 September Death / Punyatithi / Smrutidin

 • सन २००८ साली म्हराष्ट्रीयन मराठी लेखक, साहित्यिक, समिक्षक व अर्थतंज्ञ तसचं, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ यांचे निधन.
 • २०१२  साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदू संघटनेचे पाचवे सरसंघचालक, लेखक, अर्थतज्ञ व समीक्षक के. एस. सुदर्शन यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here