जाणून घ्या १६ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

16 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य या बद्दल जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आजच्या दिवशी सन १९४६ साली भारताच्या पश्चिम बंगाल प्रांताच्या कलकत्ता शहरात विनाशकारी दंगली उसळल्या होत्या. सगळीकडे जाळपोळ सुरु होती. ७२ तास चाललेल्या या दंगलीमध्ये सुमारे ४००० नागरिक ठार झाले होते. तर, २०००० हजार पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते. या दंगलीमुळे लाखो लोक बेघर झाले होते. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देशांत उसळलेली ही सर्वात मोठी घटना होती.

जाणून घ्या १६ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 16 August Today Historical Events in Marathi

16 August History Information in Marathi
16 August History Information in Marathi

१६ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 August Historical Event

 • सन १९१३ साली स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.
 • सन १९४६ साली पश्चिम बंगाल मधील कलकत्ता शहरात वांशिक दंगली उसळून ७२ तासात सुमारे ४००० नागरिक ठार झाले होते.
 • सन १९६० साली सायप्रस देशाला युनायटेड किंग्डम कडून स्वातंत्र्य मिळालं.
 • सन १९९० साली चीन ने लोप नॉर येथे आपली पहिली अणुचाचणी घेतली.
 • सन २०१० साली जपानला मागे टाकून चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

१६ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८७९ साली ‘महाराष्ट्र कविचरित्रमाला” ही ३००० पृष्ठांची, ११ पुस्तकांची माला सिद्ध करणारे महाराष्ट्रीयन मराठी संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्मदिन.
 • सन १९०४ साली  “झांसी की राणी” या कवितेच्या रचनाकार प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्मदिन
 • सन १९१३ साली नोबल पारितोषिक विजेता इस्त्रायल राजकारणी, लिकुडचे संस्थापक आणि इस्रायलचे सहावे पंतप्रधान मेनाकेम बेगिन (Menachem Begin) यांचा जन्मदिन.
 • सन १९५० साली माजी ऑस्ट्रेलियन क्रीकेटपटू व जलदगती गोलंदाज जेफ थॉमसन (Jeff Thomson ) यांचा जन्मदिन.
 • सन १९५२ साली महाराष्ट्रीयन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका व मराठी संगीत नाटक अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्मदिन.
 • सन १९५४ साली भारतीय हिंदी चित्रपट पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्मदिन.
 • सन १९५८ साली सुप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका, गीतकार आणि अभिनेत्री मॅडोना लुईस सिककोन (Madonna Louise Ciccone) यांचा जन्मदिन.
 • सन १९७० साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांचा जन्मदिन.
 • सन १९७० साली सुप्रसिद्ध नेपाळी भारतीय चित्रपट अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्मदिन.

१६ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 August Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १७०५ साली स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली(Jacob Bernoulli) यांचे निधन.
 • इ.स. १८८६ साली महान संत, आध्यात्मिक गुरु व विचारक तसचं, स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे निधन.
 •  सन १९७७ साली प्रसिद्ध अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेते एल्व्हिस प्रिस्टले(Elvis Presley) यांचे निधन.
 • सन १९९७ साली सुप्रसिद्ध पाकिस्तानी गायक, संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक नुसरत फतेह अली खान यांचे निधन.
 • सन २००० साली सर्वोत्कृष्ट संपादना करिता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट संपादक रेणू सलूजा यांचे निधन.
 • सन २००३ साली युगांडा देशाचे माजी सैन्य अधिकारी व राष्ट्राध्यक्ष इदी अमीन दादा ओमी (Idi Amin Dada Oumee) यांचे निधन.
 • सन २०१० साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन.
 • सन २०१८ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, कवी, प्रखर वक्ते व देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top