Tuesday, July 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १६ मार्च या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटना

16 March Dinvishesh

१६ मार्च या दिवसाला विशेष महत्व आहे कारण, हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. सन १६ मार्च १९९५ साली प्रथमच तोंडावाटे पोलिओ लस देण्यात आली होती. संपूर्ण विश्वामधून पोलिओचे निर्मुलन करण्यासाठी व लोकांमध्ये त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याकरिता या दिवशी राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून घोषित करण्यात आला.

अश्याच प्रकारच्या अनेक घटनांची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. आजच्या तारखेला  इतिहासात तसेच आधुनिक काळात झालेले बदल तसेच शोध व मिळालेले पुरस्कार या सर्व बाबींची माहिती आपण येथे घेणार आहोत.

जाणून घ्या १६ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 16 March Today Historical Events in Marathi

16 March History Information in Marathi

 

१६ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 March Historical Event

  • सन १५२१ साली पोर्तुगीज अन्वेषक फर्डिनांड मॅगेलन जग प्रदक्षिणा करीत असतांना फिलिपाईन्स या ठिकाणी जाऊन पोहचले.
  • इ.स.१५२७ साली मुघल सम्राट बाबर यांनी खानवा येथील युद्धात राणा सांगा यांचा पराभव केला होता.
  • सन १६४९ साली शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शाहजहान यांचा मुलगा शहजादा मुराद यांच्या सोबत पत्र व्यवहार केला.
  • इ.स. १८४६ साली प्रथम इंग्रज- सिख युद्धाच्या माध्यमातून अमृतसर ची संधी झाली होती.
  • सन १९११ साली भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक उदारमतवादी राजकीय नेते व समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव मांडला.
  • इ.स.१९३७ साली महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दलितांना देण्याचा अधिकार मुंबई येथील उच्च न्यायालयाने दिला.
  • सन १९४५ साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान रॉयल एअर फोर्सने जोरदार बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहर २० मिनिटात पूर्णपणे विनाश केले.
  • इ.स. १९६६ साली अमिरीकेने पहिले मानवरहित अंतरीक्ष यान ‘जेमिनी ८’ चे प्रक्षेपण केले.
  • सन १९९२ साली भारतीय चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, संगीतकार, ग्राफिक कलाकार, गीतकार आणि लेखक सत्यजित रे यांना ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • इ.स. २००० साली हॉकीचे जादूगार म्हणून ओळख निर्माण करणारे भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांना के.के. बिर्ला पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • सन २००० साली भारतीय मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकंदर यांना के.के.बिड़ला पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • इ.स.२००१ साली दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी क्रांतिकारक, राजकीय नेते आणि समाजसेवक तसेच दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ देण्यात आला.
  • सन २०१२ साली अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतक बनवणारे क्रिकेट विश्वातील पहिले क्रिकेट पटू म्हणजेच भारतीय मास्तर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे होत.

१६ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 March Birthday/ Jayanti/ Birth Anniversary

  • सन १६९३ साली भारतातील मराठा साम्राज्याचे उदगाते, मध्य भारतातील माल्वाचे पहिले मराठा सुभेदार व इंदूर राज्यावर राज्य करणारे पहिले होळकर घराण्याचे शासक मल्हारराव होळकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १७५० साली जर्मन खगोलशास्त्रज्ञ कॅरोलीन ल्युक्रेटिया हर्शेल यांचा जन्मदिवस.
  • सन १७५१ साली अमेरिकन राजकारणी, वकील, मुत्सद्दी, तत्ववेत्ता आणि अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १७८९ जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्मदिन.
  • सन १९०१ साली भारतीय क्रांतिकारक आणि महात्मा गांधी यांचे अनुयायी पोट्टी श्रीरामुलु यांचा जन्मदिवस.
  • इ.स. १९०१ साली भारताचे माजी सरन्यायाधीश पी.बी. गजेंद्रगडकर यांचा जन्मदिन.
  • सन १९१० साली भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व क्रिकेटपटू नवाब मोहम्मद मन्सूर अली खान सिद्दीकी पटौडी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९३६ साली अमेरिकन चिकित्सक, वैद्यकीय व्यवसायीक आणि पहिल्या एम. आर. आय. स्कॅनिंग मशीनचे शोधक रेमंड वहान दामादियन यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली आधुनिक भारतीय चित्रकलेचे प्रणेते प्रभाकर बर्वे यांचा जन्मदिन.

१६ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 March Death/ Punyatithi/ Smrutidin

  • सन १९४५ साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रवादी आणि अभिनव भारत सोसायटीचे संस्थापक बाबाराव सावरकर उर्फ गणेश दामोदर सावरकर यांचे निधन.
  • इ.स. १९४६ साली हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक तसेच जयपूर-अतरौली घराण्याची स्थापना करणारे भारतीय संगीत सम्राट उस्ताद अल्लादिया खान यांचे निधन.
  • सन १९९० साली स्वातंत्र्यसैनिक वि. स. पांगे यांचे निधन.
  • इ.स. १९४७ साली हिदी साहित्य लेखक अयोध्या सिंह उपाध्याय ‘हरि औंध’ यांचे निधन.

इतिहासकालीन तसेच आधुनिक काळात जगात घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत. आजच्या दिनी अनेक घटना घडून गेल्या आहेत त्यापैकी काहीच घटना आपल्याला माहिती असतील, परंतु येथे आपण सर्वच घटनांची माहिती घेणार आहोत.

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved