जाणून घ्या १६ मे रोजी येणारे दिनविशेष

16 May Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा विज्ञानाच्या दृष्टीने खूप महत्वाचा दिवस आहे, आजच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिक एका मानवी भ्रूणाच्या शरीरातून स्टेन पेशी काढण्यास यशस्वी झाले होते. वैद्यकीय क्षेत्रातील ही सर्वात मोठी सफलता होती असे म्हणने चुकीचे ठरणार नाही.  त्यांच्या या शोधामुळे अनेक आजारांचे उपाय शोधण्यास मदत मिळणार होती.

याव्यतिरिक्त आज मुघलकालीन भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठा हिंदवी साम्राज्याचे शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू मावळे व पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार वीर मोरारबाजी यांची पुण्यतिथी. राजपूत राजा मिर्झा जयसिंग यांचे सेनापती दिलेरखान यांनी जेंव्हा पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता तेव्हा तो वेढामोडून काढत असतांना शत्रून सोबत लढतांना ते शहीद झाले. अश्या या महान मराठी मावळ्याची आज पुण्यतिथी.

शिवाय, आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी असणाऱ्या काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन तसचं त्यांचे शोधकार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १६ मे रोजी येणारे दिनविशेष – 16 May Today Historical Events in Marathi

16 May History Information in Marathi
16 May History Information in Marathi

१६ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 May  Historical Event

 • इ.स. १६६५ साली राजपूत राजा मिर्झा जयसिंह यांचे सेनापती दिलेरखान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला वेढा दिला तो वेढा तोडण्याच्या प्रयत्नात किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी यांचे निधन झाले.
 • १९२९ साली हॉलिवूड चित्रपट सुष्टीमध्ये सर्वोत्कृष्ट वार्षिक चित्रपट पुरस्कार ऑस्कर देण्यास सुरुवात झाली.
 • सन १९६९ साली सोवियत संघाचे अंतराळ यान व्हेनेरा ५ शुक्र ग्रहावर उतरले.
 • १९७५ साली भारतीय राज्य सिक्कीम ला भारतात समाविष्ट करण्यात आले.
 • सन १९९६ साली भारतात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार निवडून आले व त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून सर्व सूत्रे आपल्या घेतली. परंतु, त्याना आवश्यक तितका पाठींबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.
 • २००५ साली कुवैत सरकारने देशातील महिलांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बहाल केला.
 • सन २००५ साली अमेरिकन वैज्ञानिकांनी क्लोन केलेल्या मानवी भ्रूणाच्या शरीरातून स्टेम पेशी काढण्यात पहिल्यांदा यशस्वी झाले.

१६ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 May Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८२४ साली महान महाराष्ट्रीयन गणित-ज्योतिषशास्त्रज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्मदिन.
 • १८५७ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पटना येथील २७ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष रघुनाथ मुधोळकर यांचा जन्मदिन.
 • सन १९२६ साली सुप्रसिद्ध भारतीय आग्रा येथील किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिन.
 • १९३१ साली भारतीय राजनेता व विद्वान तसचं पूर्व केंद्रीय विदेश मंत्री व लेखक नटवर सिंह यांचा जन्मदिन.
 • सन १९४१ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय टक्करवादक बनामाली महाराणा यांचा जन्मदिन.
 • १९५३ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय बायोफिजिकल वैज्ञानिक प्राचार्य रामकृष्ण विजयाचार्य होसूर यांचा जन्मदिन.
 • सन १९५५ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय हातमाग उद्योजक गजम अंजैया यांचा जन्मदिन.
 • १९७० साली अर्जेटिनाच्या माजी व्यावसायिक टेनिसपटू गॅब्रिएला बिएट्रिझ सबातिनी यांचा जन्मदिन.

१६ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 May Death / Punyatithi /Smrutidin

 • इ.स. १६६५ साली मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील शिवाजी महाराज यांचे विश्वासू मावळे व पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांचे राजपूत राजा मिर्झा जयसिंग यांचे सेनापती दिलेरखान यांच्याविरुद्ध किल्ल्याला वाचविताना झालेल्या लढाईत शहीद झाले.
 • १८३० साली  फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जीन-बॅप्टिस्टे जोसेफ फूरियर यांचे निधन.
 • सन १९५० साली महाराष्ट्रातील कोल्हापुर संस्थानाचे दिवाण व सत्यशोधक चवळीचे कार्यकर्ता अण्णासाहेब लठ्ठे यांचे निधन.
 • १९९० साली अमेरिकन कठपुतळी, अ‍ॅनिमेटर, व्यंगचित्रकार, अभिनेता, शोधक, चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक जेम्स मॉरी हेन्सन यांचे निधन.
 • सन १९९४ साली अग्रणी भारतीय हिंदी चित्रपट दिग्दर्शक फानी मजूमदार यांचे निधन.
 • २००० साली महाराष्ट्रीयन बालसाहित्यिक, कवी व लेखक माधव गोविंद काटकर यांचे निधन.
 • सन २०१४ साली रूसी मोडी या नावाने प्रसिद्ध असलेले भारतीय उद्योगपती तसचं, टाटा स्टीलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि टाटा समूहाचे प्रमुख सदस्य रुस्तमजी होमसजी मोदी यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here