Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

2 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी भूतकाळात जमा झालेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आजचा दिवस हा खेळाच्या दृष्टीने खूप महत्वाचा दिवस आहे.

सन १९८७ साली फिलीफिंस देशांत आयोजित विश्व जुनियर बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते पहिले आशियायी खेळाडू ठरले. तसचं, आज आपली देशाच्या राष्ट्रध्वजाची रचना करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक पिंगली वेंकैय्या यांचा जन्मदिन. याव्यतिरिक्त आपण आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण घटना जाणून घेऊया.

जाणून घ्या २ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 2 August Today Historical Events in Marathi

2 August History Information in Marathi
2 August History Information in Marathi

२ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 August Historical Event

  • इ.स. १६७७ साली छत्रपती शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले असतांना त्यांनी तिथे डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
  • इ.स. १७९० साली अमेरिकेत पहिली जनगणना करण्यात आली.
  • इ.स. १८५८ साली ब्रिटीश सरकारने गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट पारित केला.
  • इ.स. १८७० साली जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वे टॉवर सबवे सुरू झाला.
  • सन १९५४ साली भारतीय क्रांतिकारकांनी दादरा व नगर हवेली हा प्रांत पोर्तुगीजांकडुन परत मिळविला.
  • सन १९७९ साली महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोर गरिबांसाठी आरोग्य सेवा सुरु करणारे दापत्य डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीस रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  •  सन २००१ साली ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कारासाठी निवड.

२ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८२० साली एकोणिसाव्या शतकातील प्रमुख आयरिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडल(John Tyndall) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८३५ साली  अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता वेस्टर्न इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची सह-संस्थापक इलिशा ग्रे(Elisha Gray) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६१ साली प्रख्यात भारतीय बंगाली रसायनशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, उद्योगपती आणि परोपकारी तसचं, भारतातील रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७६ साली भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे निर्माता व रचनाकार, भारतीय स्वातंत्र्य सेनानी पिंगली वेंकैया यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७७ साली मध्यप्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित रवी शंकर शुक्ल यांचा जन्मदिन.
  • सन १९१० साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व समिक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती जी. पी. बिरला उर्फ गंगाप्रसाद बिरला यांचा जन्मदिन.
  • सन १९५६ साली गुजरात राज्याचे राजकारणी व विद्यमान मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा जन्मदिन.

३ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 August Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १७८१ साली मराठा पेशवाई साम्राज्यातील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखाराम बापू बोकील यांचे निधन.
  • सन १९२२ साली दूरध्वनी यंत्राचे जनक अमेरिकन वैज्ञानिक व अभियंता अलेक्झांडर ग्राहम बेल(Alexander Graham Bell) यांचे निधन.
  • सन १९३४ साली जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व माजी लष्कर प्रमुख आणि राजकारणी पॉल वॉन हिंडेनबर्ग(Paul von Hindenburg),  यांचे निधन.
  • सन १९७९ साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व गायक करन दिवाण यांचे निधन.
  • सन १९७८ साली मोनॅको ग्रँड प्रिक्सचे संस्थापक अँटनी नोगेस(Anthony Noges) यांचे निधन.
  • सन १९८० साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय शिल्पकलेचे प्रणेते भारतीय शिल्पकार आणि चित्रकार रामकिंकर बैज यांचे निधन.
  • सन २०१० साली भारतीय हिंदी, पंजाबी आणि गुजराती भाषिक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते व चित्रपट निर्माता कमल कपूर यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved