20 April Dinvishesh
मित्रानो, आजचा दिवस हा विविध ऐतिहासिक घटनेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आजचा दिवस हा इतिहासकालीन महान शासकांचा जन्मदिवस आहे. जर्मन क्रूर शासक एडोल्फ हिटलर यांचा जन्मदिन. याच बरोबर काही महत्वपूर्ण घटनांपूर्ण असलेला आजचा दिवस आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन तसचं त्यांचे शोधकार्य याबद्दल संपूर्ण माहिती (20 April Today Historical Events in Marathi) जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या २० एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 20 April Today Historical Events in Marathi
२० एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 April Historical Event
- इ.स. १७१३ साली मुघल शासक जहांदार शाह दिल्लीच्या गाद्दीवर बसले.
- सन १७७७ साली न्यूयार्कने ब्रिटन देशाकडून आपल्या स्वता:च्या स्वातंत्र्याची घोषणा करून एक स्वतंत्रित राज्याच्या रूपाने आपले नवीन संविधान स्वीकारले.
- इ.स. १९४० साली आरसीए द्वारा पहिला इलेक्ट्रोनिक्स माईक्रोस्कोप दाखवण्यात आला होता.
- सन १९९७ साली भारतीय क्रांतिकारक व राजनेता इंद्रकुमार गुजराल भारताचे १२ वे पंतप्रधान बनले.
- इ.स. २०११ साली भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आपल्या उपग्रह प्रक्षेपण वाहन ‘पीएसएलव्ही’ च्या साह्याने तीन उपग्रह यशस्वीपणे अवकाशात पाठवले.
२०एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 April Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८७० साली पाकिस्तानी विद्वान आणि भाषाशास्त्रज्ञ तसचं, उर्दू भाषेचे जनक मौलवी अब्दुल हक यांचा जन्मदिन.
- सन १८८९ साली जर्मन शासक व ‘राष्ट्रीय समजवादी जर्मन कामगार पक्ष’ नेता एडोल्फ हिटलर यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९७ साली भारतीय वैदिक अभ्यासक, इंडोलॉजिस्ट पंडित सुधाकर चतुर्वेदी यांचा जन्मदिन.
- सन १९१४ साली राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त करणारे पहिले ओडिया सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक व कादंबरीकार गोपीनाथ मोहंती यांचा जन्मदिन.
- इ.स. १९२० साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय भजन गायिका ज्योतिका रॉय यांचा जन्मदिन.
- सन १९२४ साली हिंदी साहित्याचे प्रसिद्ध समीक्षक आणि पीपल्स राइटर्स असोसिएशनचे संस्थापक व सरचिटणीस चंद्रबली सिंह यांचा जन्मदिन.
- इ.स. १९५० साली भारतीय राजकारणी व आंध्रप्रदेश राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू यांचा जन्मदिन.
- सन १९६५ साली मेघालय राज्याचे माजी मुख्यमंत्री व मेघालय राज्यातील विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते मुकुल एम. संगमा यांचा जन्मदिन.
२० एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20 April Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९१२ साली गॉथिक भयपट कादंबरी ड्रेकुलासाठी प्रख्यात असलेले आयरिश लेखक अब्राहम “ब्रैम” स्टोकर यांचे निधन.
- इ.स. १९६० साली “भारतीय शास्त्रीय बासरीचे उद्गाते”, बासरीवादक व संगीतकार अमन्नाज्योती घोष उर्फ पन्नालाल घोष यांचे निधन.
- सन १९७० साली भारतीय उर्दू कवि, गीतकार तसचं भारतीय हिंदी चित्रपट गीतलेखक शकील बदायुनी यांचे निधन.
- इ.स. २००२ साली राधाकृष्ण: एक जीवनी आणि जवाहरलाल: एक जीवानीचे लेखक व प्रसिद्ध भारतीय इतिहासकार सर्वपल्ली गोपाल यांचे निधन.
- सन २००४ साली भारतीय पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय लोक कलाकार आणि शास्त्रीय गायक कोमल कोठारी यांचे निधन.