जाणून घ्या २० सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

20 September Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या मध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. हा लेख आपणास २० सप्टेबर या दिवशी घडलेल्या घटनांचा इतिहास दर्शवित असल्याने आपण सर्वांनी या लेखाचे आवश्य वाचन करावे.

जाणून घ्या २० सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 20 September Today Historical Events in Marathi

20 September History Information in Marathi
20 September History Information in Marathi

२० सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 September Historical Event

 • इ.स. १८५७ साली भारतीय क्रांतिकारकांनी पुकारलेला स्वातंत्र उठावाच्या वेळी ताब्यात घेतलेली दिल्ली येथील सत्ता इंग्रजाच्या इस्ट इंडिया कंपनीने पुन्हा आपल्या ताब्यात घेतली.
 • इ.स. १८७८ साली भारतातील सर्वाधिक प्रचलित इंग्रजी भाषिक वृत्तपत्र द हिंदू चे प्रकाशण साप्ताहिक वृत्तपत्राच्या रूपाने सुरु करण्यात आलं.
 • सन १९३० साली महाराष्ट्रीयन मराठी नाटककार वीर वामनराव जोशी यांच्या ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे सादर करण्यात आला.
 • सन १९४६ साली पहिला वार्षिक कान्स फिल्म महोत्सव फ्रांस देशांत आयोजित करण्यात आला.
 • सन १९७७ साली व्हिएतनाम राष्ट्राचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश करण्यात आला.

२० सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८५६ साली  भारतातील आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक नारायण गुरु यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९८ साली महाराष्ट्रीयन मराठी वृत्तपत्र सकाळ चे संस्थापक व संपादक तसचं, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया चे माजी अध्यक्ष नारायण भिकाजी उर्फ नानासाहेब परुळेकर यांचा जन्मदिन.
 • सन १९०९ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गुजराती लेखक व समीक्षक तसचं, गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्मदिन.
 • सन ११९११ साली अखिल भारतीय गायत्री परिवाराचे संस्थापक  आध्यात्मिक गुरु श्रीराम शर्मा आचार्य यांचा जन्मदिन.
 • सन १९२२ साली महाराष्ट्रीयन वाङ्मयाचे गाढे अभ्यासक व संशोधनकार द. न. गोखले यांचा जन्मदिन.
 • सन १९३४ साली प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री सोफिया लॉरेन(Sophia Loren) यांचा जन्मदिन.
 • सन १९४८ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक महेश भट्ट यांचा जन्मदिन.

२० सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20 September Death / Punyatithi / Smrutidin

 •  इ.स. १३३८ साली दिल्ली येथील तुघलक वंशीय सत्तेचे सम्राट शासक फिरोज शाह तुगलक तृतीय यांचे निधन.
 • सन १९२७ साली पॅन-इस्लामिक चळवळीबद्दल सहानुभूती असलेले भारतीय क्रांतिकारक अब्दुल हाफिज मोहम्मद बराकतउल्ला यांचे निधन.
 • सन १९३३ साली ब्रिटीश कालीन भारतातील आयरिश वंशीय पहिल्या भारतीय क्रांतिकारक महिला व ऑल इंडिया होमरूल लीगच्या संस्थापिका ऐने बेसेंट(Annie Besant) यांचे निधन.
 • सन १९४२ साली भारत छोडो आंदोलनाच्या वेळेला राष्ट्रध्वज घेऊन निघालेल्या मिरवणूकीचे नेतृत्व करीत असतांना केलेल्या गोळीबारात थोर भारतीय क्रांतिकारक महिला कनकलता बरुआ यांचे निधन झाले.
 • सन २०१२ साली प्रख्यात भारतीय नाट्य दिग्दर्शक, रंगमंच, दूरदर्शन आणि हिंदी चित्रपट अभिनेते दिनेश ठाकूर यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top