• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 7, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या २१ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

21 August Dinvishes 

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २१ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 21 August Today Historical Events in Marathi

21-August-History-Information-in-Marathi
21-August-History-Information-in-Marathi

२१ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 August Historical Event

  • सन १९११ साली लिओनार्डो दा विंची यांनी रेखाटलेल जगप्रसिद्ध चित्र “मोनालिसा” हे पॅरिस मधील लुव्र या संग्रहालयातून चोरीला गेले.
  • सन १९१५ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान इटलीने तुर्की विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
  • सन १९३८ साली इटली देशांतील शाळांमध्ये ज्यू शिक्षकांवर बंदी घालण्यात आली.
  • सन १९७२ साली वन्यजीव संरक्षण कायद्यास मान्यता मिळाली.
  • सन १९८८ साली भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर आलेल्या तीव्र स्वरूपाच्या भूकंपामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले.
  • सन १९९३ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहाच्या शोधमोहिमेसाठी पाठवलेल्या ‘मार्स ऑब्झर्व्हर’ या यानाचा पृथ्वीशी (NASA) संपर्क तुटला.

२१ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७६५ साली ब्रिटन आणि आयर्लंड देशांच्या युनायटेड किंग्डम चे राजा विलियम चौथे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १७८९ साली फ्रांस महान गणितज्ञ ऑगस्टिन लुई कौशी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७१ साली थोर भारतीय समाजसेवक व महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील प्रसिद्ध ‘सेवासदन’ संस्थेचे शिल्पकार गोपाल कृष्ण देवधर यांचा जन्मदिन.
  • सन १९०९ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी नागोराव घनश्याम देशपांडे उर्फ ना. घ. देशपांडे यांचा जन्मदिन.
  • सन १९१० साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित चित्रकलेच्या अनेक शैली आत्मसात करणारे महान भारतीय चित्रकार व बडोदा समूहाचे संस्थापक सदस्य नारायण श्रीधर बेंद्रे यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कादंबरीकार, लघुकथा लेखक, आणि चित्रपट निर्माता इस्मत चुग़ताई यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली अमेरिकन खजिनदार शोधक आणि मेल फिशर मरीन हेरिटेज म्युझियमचे संस्थापक मेल फिशर यांचा जन्मदिन.
  • सन १९२७ साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी राजकारणी आणि उत्तरप्रदेश, उडीसा आणि पश्चिम बंगाल राज्याचे माजी राज्यपाल बी. सत्य नारायण रेड्डी यांचा जन्मदिन.
  • सन १९३४ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य तसचं, महाराष्ट्र राज्याचे माजी १३ वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन.
  • सन १९७१ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा जन्मदिन.
  • सन १९८६ साली जमैकाचा माजी धावपटू उसैन बोल्ट यांचा जन्मदिन. यांनी अनेक विश्व विक्रम आपल्या नावे केली आहेत.

२१ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 August Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९३१ साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन शास्त्रीय गायक, संगीतज्ञ व संगीत प्रसारक तसचं, गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन.
  • सन १९४० साली सोव्हिएत क्रांतिकारक, मार्क्सवादी सिद्धांताकार आणि राजकारणी लिओन ट्रोत्स्की यांचे निधन.
  • सन १९७६ साली भारतीय चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध छायाचित्रकार पांडुरंग सातू नाईक यांचे निधन.
  • सन १९७८ साली प्रसिद्ध भारतीय सेवानिवृत्त क्रिकेटपटू विनू हिम्मतलाल मांकड यांचे निधन.
  • सन १९८१ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते, समाजसुधारक, पत्रकार महात्मा गांधीं यांच्या तत्वज्ञान आणि पद्धतींचे अनुयायी दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर यांचे निधन.
  • सन २००६ साली भारत रत्न, पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ यांचे निधन.
  • सन २००७ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखिका क़ुर्रतुलऐन हैदर यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved