जाणून घ्या २१ जुलै रोजी येणारे दिनविशेष

21 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आदि त्यांचे कार्य या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यामतून जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज भारताच्या इतिहास घडलेली सर्वात महत्वाची घटना म्हणजे आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदावर भारताच्या इतिहासात पहिल्यांदा एक महिलेला स्थान देण्यात आलं होत. मित्रांनो, आज पासून बारावर्षापुर्वी ठीक आजच्या दिवशी सन २००७-२०१२ सालापर्यंत भारताच्या राष्ट्रपती पदी प्रतिभा ताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्वतंत्र भारताच्या त्या बाराव्या राष्ट्रपती होत्या, तर भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. सन २५ जुलै २००७ साली त्यांनी आपल्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

भारताच्या राजकीय इतिहासात घडलेली ही देखील एक सर्वात मोठी घटना होय. भारतातील महिलांनी राजकारणात प्रवेश करण्याच्या उद्देशाने सरकारने घेतलेला हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे असेच म्हणावं लागेल.

जाणून घ्या २१ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 21 July Today Historical Events in Marathi

21 July History Information in Marathi
21 July History Information in Marathi

२१ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 July Historical Event

 • इ.स. १८८३ साली ब्रिटीश कालीन भारतात सर्वसाधारण नागरिकांसाठी सर्वप्रथम कलकत्ता या ठिकाणी सार्वजनिक चित्रपट गृह सुरु करण्यात आले.
 • इ.स. १८८४ साली इंग्लंड देशांतील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्डस च्या मैदानावर पहिला कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया देशाच्या क्रिकेट संघामध्ये झाला.
 • इ.स. १८८८ साली स्कॉटिश शोधकर्ता आणि पशुवैद्यकीय सर्जन जॉन बॉयड डनलॉप(John Boyd Dunlop) यांनी रबराचे टायर आणि ट्यूब तयार करून परिवहन करण्यास गती निर्माण करून दिली.
 • सन १९४७ साली भारतीय संविधानाने राष्ट्रध्वज अंगिकारला.
 • सन १९६२ साली भारत आणि चीन यांच्यात भारतीय सीमा रेषेजवळ युद्ध झाले.
 • सन १९६३ साली कशी विद्यापीठाला विश्वविद्यालयाचा दर्जा मिळाला.
 • सन २००७ साली भारताच्या राष्ट्रपती पदी प्रतिभाताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.

२१ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८१६ साली ब्रिटीश वर्तमानपत्र समूह राईटर चे संस्थापक ज्युलियस राईटर (Julius Writer)यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९९ साली नोबल पारितोषिक विजेता प्रख्यात अमेरिकन पत्रकार कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि क्रीडापटू अर्नेस्ट मिलर हेमिंग्वे (Ernest Miller Hemingway) यांचा जन्मदिन.
 • सन १९११ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गुजराती साहित्यकार उमाशंकर जोशी यांचा जन्मदिन.
 • सन १९३० साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी लेखक व सांस्कृतिक संशोधक डॉ. रा. चि. ढेरे यांचा जन्मदिन.
 • सन १९३० साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट संगीतकार व गायक आनंद बक्षी यांचा जन्मदिन.
 • सन १९३४ साली पद्मभूषण व अर्जुन पुरस्कास सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांचा जन्मदिन
 • सन १९४७ साली माजी भारतीय क्रिकेटपटू चेतन प्रतापसिंह चौहान यांचा जन्मदिन.
 • सन १९५१ साली अमेरिकन हास्य अभिनेते रॉबिन विलियम्स (Robin Williams) यांचा जन्मदिन.

२१ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 July Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९०६ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रथम अध्यक्ष व राजकारणी उमेशचंद्र बनर्जी यांचे निधन.
 • सन १९७२ साली भूतानचे राजा इग्मे दोरजी वांगचुक(Jigme Dorji Wangchuck) यांचे निधन.
 • सन १९९४ साली महाराष्ट्रीयन मराठी बखर वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. र. वी. हेरवाडकर यांचे निधन.
 • सन १९९५ साली भारतीय चित्रपट संगीतकार व मेंडोलीनवादक सज्जाद हुसेन यांचे निधन.
 • सन १९९७ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन.
 • सन २००१ साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय दाक्षिणात्य तमिळ चित्रपट अभिनेते व निर्माता विल्लुपुरम चिन्नैया मनर्यर गणेशमूर्ती यांचे निधन.
 • सन २००२ साली ज्येष्ठ महाराष्ट्रीयन मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.
 • सन २००९ साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्यातील कर्नाटकी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ख्याल प्रकारातील प्रसिद्ध भारतीय गायिका गंगूबाई हंगल यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top